मदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराला त्याने दिली चित्रपटातून श्रद्धांजली

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

गौतम लेविस त्याचं नाव…हावडा मधल्या एका ठिकाणी या असहाय्य बालकाला मदर तेरेसांनी आपल्या उराशी कवटाळलं आणि त्याचं जीवन बदलून गेलं.

पोलियोच्या विकाराने ग्रस्त असणारा हा मुलगा आज सर्व कठीण प्रसंगावर मात करीत स्वत:चे कर्तुत्व सिद्ध करत आहे.

पोलियोमुळे पाय गमावून सुद्धा त्याने जिद्द सोडली नाही. मदर तेरेसांनी त्याला आपल्या कोलकाता इथल्या अनाथाश्रमात आसरा दिला.

स्वत: जातीने त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायच्या. पोटाच्या पोराप्रमाणे त्यांनी त्याची काळजी घेतली.

gautam lewis marathipizza

पुढे गौतमला एका ब्रिटीश अणु शास्त्रज्ञाने दत्तक घेतलं आणि तो UK ला राहायला गेला. तिथेच त्याचं अत्यंत प्रसिद्ध अश्या Bedales Prep School ह्या शाळेत शिक्षण झालं.

पुढे गौतमने संगीत क्षेत्रात, मोठाल्या brands सोबत काम केलं. नंतर त्याने आपला मोर्चा “हवाई” क्षेत्राकडे वळवलं!

 

kolkata_2983605g

 

आपण चालू शकत नाही, मात्र उडू तर शकतो – या विचाराने त्याला विमानाचा छंद जडला आणि त्याचेच फलित म्हणून की काय एक ‘तज्ञ फ्लाईंग इंस्ट्रक्टर’ म्हणूनची त्याची ओळख आहे…!

 

gautam_ade_adepitan

 

३९ वर्षीय गौतम हा आज उत्तम स्थितीतलं जीवन जगतोय. पण अजूनही त्याला त्याच्या प्रारंभिक जीवनाचा विसर पडलेला नाही.

मदर तेरेसांना आज अख्ख जग मानतं, पण आणखी एक पाऊल पुढे जाऊन त्याच्या विचारांचा प्रसार चित्रपटाच्या माध्यमातून करण्याचा विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हता

??????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

आणि त्यातूनच निर्मिती झाली…मदर तेरेसांसोबत त्याने घालवलेल्या अमुल्य क्षणांच्या आठवणपटाची…!

कोणताही स्वार्थ मनात नं ठेवता केवळ माणुसकीच्या नात्याने लोकांना आसरा देणाऱ्या ‘मदर’ला एका मानसपुत्राने वाहिलेली श्रद्धांजली नक्कीच कौतुकास्पद आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?