गौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रांचा अर्थ समजून घ्या.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
‘बुद्ध’… हे काही नाव नाही…ती तर ज्ञानाची उपाधी आहे… ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.
बुद्धांचे विविध मुद्रा, हस्त संकेत यासर्वांतून गौतम बुद्धांनी जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे…
१. धर्मचक्र मुद्रा :
या मुद्रेला “धर्म चक्र ज्ञान” म्हणजेच Teaching of the wheel of the Dharma याचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.
२. ध्यान मुद्रा :
या मुद्रेला समाधी किंवा योग्य मुद्रा म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा “बुद्ध शाक्यमुनी”, “ज्ञानी बुद्ध अमिताभ” आणि “चिकित्सक बुद्ध” इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो.
३. भूमिस्पर्श मुद्रा :
या मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे (Touching The Earth) असे देखील म्हणतात. जी बुद्धांची ज्ञान प्राप्तीला दर्शवते, कारण बुद्ध म्हणायचे की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेऊन त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते.
४. वरद मुद्रा :
ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो.
५. करण मुद्रा :
ही मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही कर्त्याला स्वास सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते.
६. वज्र मुद्रा :
ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू , जल, अग्नी, पृथ्वी आणि धातू यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अश्या प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल.
७. वितर्क मुद्रा :
ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते.
८. अभय मुद्रा :
ही मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे, जी सुरक्षा, शांती, परोपकार आणि भय दूर करणे यांचं प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहुला दुमडून हाताच्या बोटांना वर उचलले जाते.
९. उत्तरबोधी मुद्रा :
ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तर इतर बोट ही आतल्या बाजूने मोडलेली असतात.
१०. अंजली मुद्रा :
याला “नमस्कार मुद्रा” किंवा ” हृदयांजली मुद्रा” देखील म्हणतात. जी अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात.
तर असा आहे गौतम बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Atishay sundar bhudhachya mudrachi mahity sundar kalpana Apalya kadun dhamach kam houdya hi bhagwanta charani prarthana.Atdeepbhav
Veri nice
khup sunder rityaa he kam tumi kart aahat karan barayach manushh jatila mahitch nhi ki Buddha chyaa 10 mudra cha arth tumi he post karun saglyana margdarshan kart ahe ….. Sandhu Sadhu..Sadhu.. namo Buddhay Jay Bhim
Khup sunder mahiti aahey. Namo Buddhaya.
Ajun kahi Buddha badal pustak astil ka.