गेट टॉवर बिल्डींग: एक अशी बिल्डींग ज्यामधून हायवे जातो!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जपानच्या ओसाका शहराचा उल्लेख आला की सगळ्यात पहिला प्रश्न विचारलो जातो तो म्हणजे- “तुम्हाला गेट टॉवर बिल्डींग माहित आहे का?” जगातील सर्वात क्युरीयस अर्थात कुतुहूलयुक्त इमारत म्हणून या गेट टॉवर बिल्डींगकडे पाहिले जाते. नावावरून तर या बिल्डींगबद्दल तसं काही ग्रेट वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही ही बिल्डींग पाहता तेव्हा मात्र तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाहीत. अहो, कारण या इमारतीमधून चक्क एक हायवे जातो.

InMarathi Android App

gate-tower-building-marathipizza01

स्रोत

१६ मजले उंच असलेल्या या इमारतीच्या ५ व्या, ६ व्या आणि ७ व्या मजल्यामधून एक्सप्रेस हायवे जातो. या बिल्डींगच्या तळमजल्यावर लावलेल्या फलकावर हे तीन मजले म्हणजे ‘हॅनशीन एक्सप्रेसवे’ असल्याचा स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो. या इमारतीची लिफ्ट ४ थ्या मजल्यावरून थेट ८ व्या मजल्यावर जाऊन थांबते.

gate-tower-building-marathipizza02

स्रोत

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गेट टॉवर बिल्डींगला हे अद्भुत वैशिष्ट्य लाभलं ते मात्र एका वादामुळे! हा वाद होता जमिनीचा मालक आणि जपानी सरकार यांच्यामधला. ज्या जमिनीवर गेट टॉवर बिल्डींग उभी आहे ती जमीन मेईजी काळापासून ही जमीन लाकूड आणि कोळसा यांच्यावर प्रक्रिया करणाऱ्या एका कंपनीच्या मालकीची होती.

gate-tower-building-marathipizza03

स्रोत

१९८३ साली पुनर्विकास योजनेमध्ये या जागेचा देखील समावेश करण्यात आला होता. परंतु बिल्डींगचे परमीट मात्र सरकार तर्फे नाकारण्यात आले, कारण जपानी सरकारने ही जागा हायवे साठी निश्चित केली होती, म्हणजेच या जमिनीवरून हायवे जाणार होता. मात्र जमिनीच्या मालकाने सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले आणि हार न मानता हायवेसाठी जमीन देण्याचे नाकारले. त्याने ‘हॅनशीन एक्सप्रेसवे कोर्पोरेशन’ला यावर तोडगा काढण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला आणि त्यातून निर्माण झाला हा बिल्डींगमधून जाणारा हायवे.

हा हायवे जरी गेट टॉवर बिल्डींगमधून जात असला तरी त्याचा बिल्डींगमधील कार्यालयांच्या कामकाजावर काहीही परिणाम होत नाही, खासकरून तशी काळजीच इंजिनियर्सनी घेतलेली आहे. हा हायवे बिल्डींगला अगदी चिटकून वगैरे जात नाही आणि हायवेच्या आसपास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारलेलं स्ट्रक्चर आवाज बिल्डींगमध्ये येऊ देत नाही.

gate-tower-building-marathipizza04

स्रोत

आधुनिक युगातील इंजिनियरिंगचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणून गेट टॉवर बिल्डींग आणि हॅनशीन एक्सप्रेसवेकडे पाहिले जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *