यशोगाथा: बाग सांभाळणारे रामभाऊ ४ वर्षात झाले Honda Civic कारचे मालक!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण कित्येकदा ‘योग्य संधी नं मिळाल्या’चं रडगाणं गात असतो ना?

करिअर असो वा नातीगोती, आपण नेहेमी excuses – निमित्त शोधतो फक्त – दुसऱ्यांवर, परिस्थितीवर कुणावर किंवा कशावर तरी खापर फोडाण्यासाठी.

पण आपण असेही लोक बघत असतो, ज्यांनी कुठलाही support, कुणीही godfather नसताना फक्त आणि फक्त स्व-कर्तुत्वाच्या बळावर यशाचं साम्राज्य उभं केलेलं असतं. आज अश्याच एका तरुण म्हाताऱ्याची गोष्ट जाणून घ्या.

===

आज रामभाऊ गार्डनिंगचे contractor आहेत. हाताखाली ४-५ लोक आहेत. शिवाय त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय देखील उभा केलाय.

रामभाऊंची कथा निनाद वेंगुर्लेकर ह्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. निनाद नव-उद्योजक आहेत. त्यांनी Sling हे इंग्लिश-स्पिकिंग स्कील सुधारणा करणारं app तयार केलंय. भारतीय उद्योग क्षेत्राबद्दल त्यांचा चांगला अभ्यास आहे.

त्यांना रामभाऊ योगायोगाने ‘सापडले’.

चार वर्षापूर्वी, एकदिवस निनादजींच्या कॉम्प्लेक्समधे माती ठीकठाक करण्याच्या कामात रामभाऊ गुंगले होते. साईट इंजिनीअरने, सहजच रामभाऊना, निनादजींचा बगीचा तयार करण्याबद्दल विचारणा केली.

अचानक आलेली संधी रामभाऊंनी लगेच उचलली.

निनाद लिहितात:

रामभाऊ एकदम उत्साहाने माझ्यासाठी काम करायला तयार झाले. मी जे सांगेन ते, जितक्या पैश्यात म्हणेन तितक्या पैश्यात करायला ते तयार होते. त्यांनी माझा बगीचा जवळजवळ फुकटातच करून दिला.

पण इथून त्यांच्यातला “entrepreneur” जागा झाला.

rambhau marathipizza 02

 

ह्यापुढे निनादजींचा बगीचा एक ‘sample’ म्हणून वापरला गेला!

रामभाऊंनी इतरांना हा बगीचा दाखवायला सुरूवात केली आणि बागकामाची अधिकाधिक कामं मिळवायला सुरूवात केली.

वर्षभरात त्यांच्याकडे २० बगिच्यांची कामं होती!

एव्हाना भाऊंनी बाईक घेतली होती. कामासाठी ३-४ लोक होते (ज्यात त्यांची बायकोदेखील होती), जे रोज बगिच्याच्या देखभालीसाठी येऊन जायचे.

पुढे भाऊंनी स्वतःची टेम्पो सर्व्हिस सुरू केली. त्यांना बिल्डरने स्वतःच्या बंगल्याची अर्धा एकर बाग बनवण्याचं काम दिलं. नंतर अक्ख्या कॉम्प्लेक्सचं कंत्राटही दिलं.

 

rambhau marathipizza 03

 

आता जेव्हा कामाची पाहणी करण्यासाठी रामभाऊ जातात – तेव्हा ते स्वतःची होंडा सिव्हिक घेऊन जातात – अशी गाडी त्या लोकांकडेदेखील नसते ज्यांची बाग रामभाऊ सजवणार असतात!

 

rambhau marathipizza 04

 

ह्या यशोगाथेचा सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे माहितीये? – निनादजींच्या शब्दात :

आज रामभाऊ पन्नाशीत आहेत. चाळीशीच्या मध्यावर ते फक्त contract worker होते. वयाच्या ह्या टप्प्यावर रामभाऊंनी अशी उडी मारली – कारण त्यांच्यातील entrepreneur एका संधी नसलेल्या वातावरणात अडकला होता. संधी मिळताच त्यांनी झेप घेतली – कुठल्याही बँकेच्या मदतीशिवाय!

 

सर्वात शेवटी :

माझ्यासाठी रामभाऊ केवळ माळी नाहीत. माझ्यासाठी ते Entrepreneur of the Year for 2016 आहेत!

निनाद सरांची पोस्ट इथे वाचू शकता:

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 196 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?