या समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही?’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जर कुठली मुलगी लग्नाआधी आई झाली तर? आपल्या इथे तर ह्याला पाप म्हटलं जातं, हे आपल्या संस्कृती, परंपरेच्या विरोधात आहे. लग्नाआधी आई होणे तर खूप दूर राहिलं इथे तर एखाद्यावर लग्नाआधी प्रेम करणे हाच गुन्हा मानला जातो.

आता त्यात बऱ्यापैकी सुधारणा होऊन आपला समाज आता हळूहळू प्रेम विवाहांना मान्य करू लागला आहे. पण तरी जे लोक विवाहाआधी सोबत राहतात त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेने आजही बघितले जाते. आणि का? तर ती आपली संस्कृती नाही म्हणून.

 

garatia-tribe-woman-inmarathi05
scoopwhoop.com

असो. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या समाजाबाबत सांगणार आहोत ज्यांच्यामध्ये लग्नापूर्वी सोबत राहणेच नाही तर मुलं जन्माला घालणे देखील वैध समजलं जातं. तशी परंपराच आहे त्यांची.


आणि बर का, ही परंपरा पाश्चात्य देशांची नाही! आपल्याच देशातील आहे. आपल्याच देशातील एका समाजात लग्नापूर्वी मुलं-मुली सोबत राहतात मुल-बाळ जन्माला घालतात आणि मग ठरवितात लग्न करायचं की नाही.

 

garatia-tribe-woman-inmarathi01
ohmyrajasthan.com

ह्या समाजात विवाहपूर्व मुल जन्माला घालणे शुभ मानले जाते. जर लग्नाआधी मुल जन्माला घातलं नाही तर तो अपशकून मानला जातो.

ही परंपरा आहे आपल्या देशातील राजस्थान येथील. राजस्थान येथील उदयपुरच्या सिरोही आणि पाली येथे राहणारा गरासिया समाज मागील १००० वर्षापासून ही परंपरा निभावत आलेला आहे.

ही परंपरा म्हणजे आजच्या लिव्ह इन रिलेशनशिप सारखीच आहे. ह्या समाजात २ दिवसांचा विशेष विवाह मेळा भरविण्यात येतो. ह्या मेळ्यात मुलगा आणि मुलगी दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि लग्नाशिवाय एकत्र राहू लागतात.

त्यानंतर ते मुलांना जन्म देतात आणि त्यानंतर लग्न करायचं की नाही हे ठरवितात. हे सर्वस्वी त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. इथे त्यांना स्वतःचा सोबती निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.

 

garatia-tribe-woman-inmarathi
youtube.com

गरासिया समाजाच्या मान्यतेनुसार, खूप वर्ष आधी ह्या समाजातील चार भावंड दूर कुठेतरी जाऊन राहू लागले. ह्यापैकी तिघांनी लग्न केले तर चवथ्या भावाने लग्न न करता मुलीसोबत राहण्यास पसंती दिली. त्यानंतर जो भाऊ लिव्हइन मध्ये राहत होता त्याला तर मुले झाली पण इतर विवाहीत  भावांना मात्र मुले झाली नाहीत.

तेव्हापासूनच हे लोक ह्या परंपरेला निभावत आले आहेत. ह्या प्रथेला “द्रापा प्रथा” म्हटले जाते.

 

garatia-tribe-woman-inmarathi03
flickr.com

गरासिया समाजाच्या स्त्रियांना जर दुसऱ्या मेळ्यात आणखी कुठला तरुण आवडला तर त्यांना त्या तरुणासोबत राहण्याचे स्वातंत्र्य देखील असते. म्हणजे ती स्वतःसाठी दुसरा लिव्ह इन पार्टनर देखील निवडू शकते.

पण ह्यासाठी त्या तरुणाला पहिल्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. येथील काही लोक तर वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर उभे असताना लग्न करतात, तर काहींचे लग्न हे त्यांच्या मुलांसोबत होते. एवढचं नाही तर ह्या विवाहाचा संपूर्ण खर्च हा मुलाच्या घरचे करतात आणि लग्नही मुलाच्याच घरून होते.

 

garatia-tribe-woman-inmarathi02
ohmyrajasthan.com

आपलाच देश जिथे एकीकडे प्रेमविवाह हा अमान्य, अनैतिक समजला जातो. लग्नाआधी जर समजा कुठली मुलगी गरोदर झाली तर ती चारित्र्यहीन असल्याचं मानले जाते, जिथे लिव्ह इन रिलेशनशिप आजही संस्कृतीचा अपमान मानला जातो. तिथेच दुसरीकडे एक असा समाज आहे जो ह्या सर्व गोष्टी वैधच मानत नाही तर त्याचं स्वातंत्र्यही देतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *