आपण सर्वांनी “रिंगण” का पहायला हवा? – सांगताहेत प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गणेश मतकरी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारतात “Quality” चित्रपट यशस्वी होत नाही, ही एक सततची अडचण, दुःखाची बाब आहे. ह्या मागे अर्थातच, वितरक मिळण्यापासून प्रमोशनसाठी बक्कळ पैसे खिश्यात नसणं अशी अनेक कारणं आहेत. पण – कित्येक आशयघन चित्रपट एवढे कंटाळवाणे असतात असतात की मोजकेच कलासक्त, रसिक प्रेक्षक सोडले तर “आम आदमी” ला त्यात रूची निर्माण होत नाही – हे सर्वात मोठं कारण आहे. अनेक प्रेक्षक ही बाब उघडउघड बोलतात सुद्धा. परंतु काही चित्रपट आशयघन असतात आणि त्यासोबतच प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटणार नाहीत, असेही असतात.

रिंगण – हा असाच एक चित्रपट येऊ घातलाय.

Ringan_marathipizza

मराठी माणसाने तो आवर्जून बघायला हवा असं आवाहन प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक श्री गणेश मतकरींनी त्यांच्या फेसबुकवरून केलं आहे. ते आवाहन अधिक लोकांपर्यंत पोहोचावं, म्हणून त्यांच्या परवानगीने इथे प्रसिद्ध करत आहोत –

मतकरी सर लिहितात –

===

मी गेल्या वर्षी राज्य पुरस्कारांच्या एलिमिनेशनच्या जुरीवर होतो. एलिमिनेशनचं काम फायनल हून अधिक कठीण म्हणता येणार नाही पण डोकेदुखीचं असतं, कारण त्यांना प्रचंड संख्येने टुकार सिनेमे पहावे लागतात. आम्हीही कायतरी सत्तरहून अधिक सिनेमे पाहिले आणि त्यातल्या दहांची निवड फायनलसाठी केली. रिंगण, हायवे, डबल सीट असे काही सिनेमे मला त्यातही विशेष आवडलेले. रिंगणला फायनल जुरीनेही पसंतीची पावती देत पहिला आणला. त्याला त्यावर्षीचं मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं. पण तो रिलीज होऊ शकला नाही.

रिंगणचा विशेष हा आहे की त्यात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला असून तो सकारात्मक आहे आणि तरीही बाळबोध नाही. अशा चित्रपटाला लागायला, लोकांनी पहायला काय हरकत असावी? पण नाही. आपल्याकडे कंटेंट रिच चित्रपटांचा जो क्रायसिस सुरु आहे, त्यातलं हे अगदी हल्लीचं उदाहरण. राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार मिळालेल्या चित्रपटाला प्रदर्शनासाठी झगडावं लागतं आणि कधी आले कधी गेले कळू नये या प्रकारचे चित्रपट वर्षभर लागत असतात.

रिंगण फायनली प्रदर्शित होतोय असं कानावर आलय. ३० जूनला. सर्वांनी तो अवश्य पहावा. मी स्वत: गेल्या वर्षी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमधला तो एक आहे. प्रेक्षकांच्या ‘वेळा , उपलब्ध चित्रपटगृह’ यांबाबत अडचणी आपण समजू शकतो, पण त्यांनी आपल्याकडून तो पहाण्याचा शक्य तितका प्रयत्न करावा. आमचं बुवा असंय, आम्हाला पारंपरीक करमणूकच लागते, आम्ही हिंदी पाहू पण मराठी पहाणार नाही, असे विचार मधे आणू नयेत. ही एक साधी, अनप्रिटेन्शस आणि प्लेझन्ट फिल्म आहे. जरुर पहावी. आपल्याकडला आशय विरुद्ध नेहमीची करमणूक हा लढा आता टोकाला पोचतोय, पण तसं होऊ नये असच वाटतं. दोन्ही प्रकारच्या सिनेमांना मराठीत स्थान हवं. ते रहायचं, टिकायचं, तर सर्व प्रकारच्या फिल्म्स पाहिल्या जायला हव्या .

लक्ष ठेवा – ३० जून २०१७. रिंगण.

Ringan poster marathipizza

 

====

आम्हाला तर हे मनापासून पटलंय. आमची टीम रिंगण बघायला नक्की जाणार.

तुम्ही?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?