करोडो रुपयांना विकल्या गेलेल्या ह्या पेंटींग्ज पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चित्र हे मनुष्याच्या भावना, त्याची संस्कृती आणि त्याचे प्रेम दर्शवते. चित्र काढण्याची कला अवगत करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. कधी – कधी कितीही चित्र काढण्याचे क्लास लावले, तरी काहीना नीट चित्र काढता येत नाही. चित्र काढण्यासाठी ते मनातून जगावे लागते. थोर चित्रकार नेहमी आपल्या चित्राच्या विश्वामध्येच रमलेले असतात. ते त्यांची चित्रामधून वेगवेगळ्या भावना आणि नवनवीन विषय लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. काही चित्र एवढी अप्रतिम असतात कि, ती पाहिल्यावर त्या कलाकृती जिवंत असल्यासारख्या वाटतात. तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची चित्रे पाहिली असतील, त्यांची भरभरून स्तुती देखील केली असेल. पण काही चित्र समजण्याच्या पलीकडे असतात, कितीही तर्क लावण्याचा प्रयत्न आपण केला तरी ती आपल्याला समजत नाहीत. चित्रकाराला त्या चित्रात नेमके काय दाखवून द्यायचे आहे, याच विचारात आपण असतो. पण शेवटी आपल्याला त्याचे उत्तर काही मिळत नाही.

महान नावजलेल्या चित्रकारांच्या चित्रांची मोठी प्रदर्शने भरवली जातात आणि त्यांच्या चित्रांच्या बोली देखील लावल्या जातात. या चित्रांच्या बोली शेकडो – हजारात नाही, लाखात आणि कोटीमध्ये लावल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला काही अश्याच प्रकारच्या चित्रांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या विक्री किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि ते चित्र पाहून विचार कराल कि, यात नेमके असे काय आहे, ज्यामुळे त्याला एवढी किंमत दिली गेली आहे. चला मग पाहूयात ही चित्रे..

१. गेर्हार्ड रिफ्टर (Gerhard Richter) यांचे ब्लड रेड मिरर हे चित्र १.१ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza
cavemancircus.com


२. लुसीओ फाँटाना (Lucio Fontana) यांचे Concetto spaziale हे चित्र १.५ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza1
cavemancircus.com

३. एल्सवर्थ केली (Ellsworth Kelly) यांचे ग्रीन व्हाईट हे चित्र १.६ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza2
cavemancircus.com

४. जोन मिरो (Joan Miro) यांचे पेंचर (ले चेन) हे चित्र २.२ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza3
cavemancircus.com

५. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे व्हाईट फायर हे चित्र ३.८ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza4
cavemancircus.com

६. एल्सवर्थ केली (Ellsworth Kelly) यांचे काऊबॉय हे चित्र १.७ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza5Ridiculous expensive paintings.marathipizza5
cavemancircus.com

७. क्रिस्तोफर वूल (Christopher Wool) यांचे ब्लू फूल हे चित्र ५ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza6
cavemancircus.com

८. क्रिस्तोफर वूल (Christopher Wool) यांचे रीवोट (१९९०) हे चित्र २९.९ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza7
cavemancircus.com

९. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे वनमेंट वी (Onement Vi) हे चित्र ४३.८ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza8
cavemancircus.com

१०. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे ब्लॅक फायर १ हे चित्र ८४.२ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza9
cavemancircus.com

११. मार्क रोथको (Mark Rothko) यांचे ऑरेंज, रेड, येलो हे चित्र ८६.९ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza10
cavemancircus.com

१२. बार्नेट न्यूमॅन (Barnett Newman) यांचे आना’स लाईट (Anna’s Light) हे चित्र १०५.७ मिलियन डॉलरना विकले गेले.

Ridiculous expensive paintings.marathipizza11
cavemancircus.com

अशी हि चित्रे एवढी जास्त रक्कम मोजून लोकांनी विकत घेतली. मग आता तुम्हीच ठरवा, या किंमती या चित्रांसाठी योग्य आहेत कि नाहीत..

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *