ह्या देशात १९९३ सालापासून नागरिकांना पाणी, गॅस आणि वीज अगदी मोफत दिले जाते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपला भारत देश प्रगतीशील देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला नेहमीच गॅस, पाणी आणि वीज यांची उणीव भासते. आपल्याला सुद्धा या गोष्टी मिळवण्यासाठी नेहमीच मोठी किंमत मोजावी लागते, पण विचार करा की, या तिन्ही गोष्टी तुम्हाला मोफत मिळाल्या तर??? पण आपण तेवढे नशीबवान कुठे? आणि तुम्ही म्हणाल या महागाईत आपल्याच काय कुठल्याच देशात असा चमत्कार होणार नाही, पण मंडळी तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. तुम्ही न होण्याच्या गोष्टी करताय, पण इथे १९९३ सालामध्येच असा चमत्कार घडलाय आणि अजूनही तेथील नागरिकांना गॅस, पाणी आणि वीज या गोष्टी जवळपास फुकटच मिळतायत. चला जाणून घेऊया हे चमत्कारिक प्रकरण!

turkeministan-marathipizza01
operationworld.org

पाणी, नैसर्गिक गॅस आणि वीज या तीन गोष्टी नागरिकांना मोफत देणाऱ्या या देशाचे नाव आहे तुर्कमेनिस्तान. तुर्कमेनिस्तान हे जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात जास्त नैसर्गिक गॅसचे साठे असलेला देश आहे. तसेच या देशातील बहुतांश प्रदेश हा कराकुमच्या वाळवंटाने आच्छादलेला आहे. या देशाचे सरकार १९९३ पासून देशातील नागरिकांना मोफत पाणी, वीज आणि नैसर्गिक गॅस प्रदान करत आहे.

turkeministan-marathipizza02
eurasianet.org


या देशाची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे, तुर्कमेनिस्तान मध्ये वाहन धारकांना दर महिन्याला १२० लिटर पेट्रोल मोफत देण्याची परवानगी आहे. या मर्यादेनंतर समजा कोणाला अधिकच्या पेट्रोलची गरज भासली तर त्याला अगदी नगण्य किंमतीत म्हणजेच प्रती लिटरमागे फक्त ०.२५ सेंट (अमेरिकन करन्सी) मध्ये पेट्रोल उपलब्ध होते.

turkeministan-marathipizza03
autocarpro.in

तुर्कमेनिस्तान मधील बहुतेक लोक गॅस स्टोव्ह बंद करत नाहीत, तर ते तसाच स्टोव्ह कमी उष्णतेवर चालू ठेवतात असे ऐकिवात आहे. कारण गॅस हा विनामूल्य असल्याने त्यांना काही फरक पडत नाहीत. त्यामुळे ते स्टोव्ह चालू करण्यासाठी काडीपेटी सुद्धा ते विकत घेत नाहीत. ही गोष्ट किती खरी हे तिथे गेल्याशिवाय कळणार नाही.

असो, तुर्कमेनिस्तान मधील नागरिक बाहेर जाताना सुद्धा घरातील दिवे घालवत नाहीत, कारण बल्ब बंद केल्यानंतर परत चालू केल्यावर पूर्ण प्रकाशित होईपर्यंत सुमारे पाच ते दहा मिनटे लागतात. तसेही येथील नागरिकांना वीज मोफत मिळत असल्याने दिवे चालू ठेवून बाहेर जाण्याने त्यांचे काही नुकसान होत नाही. तुर्कमेनिस्तान सरकारने अजून २०३० पर्यंत नागरिकांना पाणी,वीज आणि नैसर्गिक गॅस मोफत देण्याचे वचन दिले आहे.

अच्छे दिन का काय, ते यालाच म्हणतात काय हो?

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *