पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक करण्यासाठी वापरल्या जातात या चलाख ट्रिक्स !
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारतातील सामान्य वाहनचालक नेहमी एका समस्येचा सामना करत असतात. असे अनेक पेट्रोल पंप भारतात आहेत जे दिलेल्या पैश्याचा मोबदल्यात कमी इंधन देऊन तुमची फसवणूक करत असतात.
जर तुम्ही सतर्क नसाल तर ते तुमची हमखास फसवणुक करतात. तर आम्ही आज तुम्हाला अश्या घोटाळ्याबद्दल सांगणार आहोत ज्याचा मदतीने पेट्रोल पंपाचे मालक सामान्य चालकांची फसवणुक करतात.
सोबतच या फसवणुकीपासून स्वतःला कस वाचवलं जाऊ शकतं याबद्दल देखील माहिती देणार आहोत.
ग्राहकांना फसवण्याच्या काही पद्धती :
१ ) The Long Long Hose –
ही खरंतर ग्राहकांची फसवणूक नाही आहे, हा डिस्पेन्सरच्या डिझाईन मधला दोष आहे. अनेक इंधन डिस्पेन्सर मध्ये hoses अर्थात नलिका ह्या गरजेपेक्षा जरा जास्तच लांब असतात. जेव्हा गाडीत आपण इंधन भरतो तेव्हा बरचसं इंधन त्या नलिकेतच मध्येच राहून जातं.

जवळ जवळ १०० ते १५० मिली इंधन त्या नलिकेत राहून जात असतं. त्यामुळे शेवटचा थेंब टाकीत पडेपर्यंत लक्ष दिलं पाहिजे.
२ ) The Sleight of Hand , Shortchanging Trick:-
बऱ्याचदा वाहनचालक हा घाईत असतो आणि कमी दराचे इंधन गाडीत भरतो म्हणजे ५०-६०-१०० रुपयांपर्यंतचे इंधन तो गाडीत भरतो. बऱ्याचदा सुट्टे पैसे नसल्याने तो ५०० ची नोट देतो. मग उरलेले पैसे परत करण्याचा वेळी पेट्रोल पंपावरचा कर्मचारी बहुतांश वेळी कमी पैसे परत करतो आणि ५०-१०० रुपये परत करतच नाही.

आधीच घाईत असलेला वाहनचालक पैसे न मोजताच खिशात ठेवून निघून जातो. अश्या प्रकारची फसवणूक पेट्रोल पंप चलकांकडून मोठ्या प्रमाणात होत असते. सामन्यत: मोटरसायकल चालक याचे शिकार होतात.
३ ) The Diversionary Trick :
बऱ्याचदा पेट्रोल पंपवर जेव्हा आपण जातो आणि विशिष्ट किंमतीचं इंधन गाडीत टाकायला तिथल्या कर्मचाऱ्याला सांगतो, त्याचवेळी दुसरा कुठला पेट्रोल पंपावरील कर्मचारी आपल्या जवळ येतो आणि आपल्याला वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती सांगू लागतो.
कुठल्यातरी भलत्याच विषयावर आपल्याशी संवाद साधतो. जेणेकरून आपलं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं आणि दुसरा कर्मचारी ज्याला गाडीत इंधन भरायला सांगितलं असतं तो शिताफीने पूर्ण इंधन भरायच्या आधीच डिस्पेन्सर बाजूला करतो.

जर समजा तुम्ही १००० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरायला सांगितले तर फक्त ९५० रुपयांचे पेट्रोल प्रत्यक्षात गाडीत भरले जाते. अश्याप्रकारे पेट्रोलपंप चालक वाहन धारकांची फसवणूक आधी करायचे पण आता पेट्रोलचं बिल लोकांना दिलं जातं.
हा प्रकार बऱ्यापैकी थांबला असला तरी ज्याठिकाणी अशी बिलिंग यंत्रणा नाही तिथे सामान्यांची फसवणूक आजूनही केली जात आहे.
४ ) The Double Start Trick :
जर तुम्ही १००० रुपयांचे इंधन पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याला भरायला सांगितले तर तो व्यवस्थित ऐकू न आल्याचं कारण देत फक्त ३०० रुपयांचं पेट्रोल भरेल. जेव्हा तुम्ही त्याला १००० रुपयांचं पेट्रोल भरायला सांगाल तेव्हा तो मशीन रिसेट करण्याचं कारण देत तुमचं लक्ष भरकटवेल आणि ७०० पर्यंतच पेट्रोल गाडीत भरेल.

तुम्हाला वाटेल की त्याने पूर्ण १००० रुपयांचं पेट्रोल गाडीत भरले आहे. परंतु त्याने तुमची फसवणूक करून केवळ ७०० रुपयांचे पेट्रोल गाडीत भरले असेल आणि तुमचे ३०० रुपये लुबाडले असतील. हा सुद्धा ध्यान भरकटवण्याचा प्रकार आहे. यात देखील २ लोक सामील असतात.
५ ) The Jerky Stop Start Trick :

पंपावरचे कर्मचारी पेट्रोल भरताना पूर्ण पणे समोरील नलिका लॉक करत नाहीत. याऐवजी ते पेट्रोल गाडीच्या टाकीत भरत असतांना बंद चालू करत असतात. जेव्हा ते दाबतात तेव्हा काही इंधन गाडीत टाकतात आणि काहीवेळाने पुन्हा बंद करतात नंतर पुन्हा चालू करतात अश्याने ते जवळ प्रत्येक १० लिटर मागे १५०-२०० ml इंधन कमी गाडीत भरतात.
६ ) The Continuity Trick :
हे अनेकदा कमी पेट्रोल गाडीत भरणाऱ्या बाईकचालकांसोबत होत असते. जेव्हा आधीचा बाईक १०० रुपयांचे इंधन गाडीत टाकतो. तेव्हा तो कर्मचारी तुमच्या जवळ येतो आणि मशीन रिसेट करण्याच नाटक करतो.

तुम्ही त्याला ५०० चं इंधन भरायला लावलं तर तो आधीच्या १०० पासून सुरवात करून फक्त ४०० च पेट्रोल गाडीत भरतो आणि १०० रुपयांची फसवणूक तुमची तो करत असतो. ही सुद्धा एक लक्ष भरकटवून केली जाणारी ट्रिक आहे.
७ ) Dispenser Tampering :
पेट्रोल डिस्पेन्सर यंत्रणा दिवसेंदिवस tampering करणं कठीण होत आहे त्यामुळे हा धोका टाळला जात आहे आणि ही एक चांगली बाब आहे. तरी सुद्धा अश्या अनेक पद्धती आहे ज्याने डिस्पेन्सर tampering केली जाते.
याद्वारे प्रत्यक्ष दिलेल्या रकमे इतकीच रक्कम मीटर दाखवते पण पेट्रोल मात्र कमी भरलं जातं आणि ग्राहकांची फसवणूक केली जाते.

सध्या असंच एक प्रकरण पंजाब मध्ये उघडकीस आलं ज्यात एका मशीनच्या मदतीने वेगळेच आकडे पेट्रोल पंपावरच्या मीटर वर दाखवले जात होते आणि कमी इंधन भरलं जात होतं.
अश्याप्रकारे आपण फसवणूक कशी होते याची माहिती तर घेतलीच तर आता आपण जाणून घेऊयात या फसवणुकी पासून स्वतःला कसं वाचवायचं :-
१ ) नेहमी छापील बिलाची मागणी चालकाकडे करत जा.
२ ) इंधन नेहमी प्रसिद्ध आणि मान्यताप्राप्त पंपावरूनच भरा
३ ) इंधन भरताना नेहमी वाहनावरून उतरून मीटर व्यवस्थित चेक करा.
४ ) नेहमी वाहनासोबत राहा. नेहमी मीटरवर भरण्याच्या प्रक्रियेवेळी बारीक लक्ष ठेवा. लक्ष भरकटू देऊ नका.
५ ) तुम्ही आधीच सेट केलेल्या किंमतीच इंधन भरत असाल तर कर्मचाऱ्याला ते डिस्पेन्सर मध्ये लोड करायला लावा. नोझल ( नलिका ) गाडीत टाका व्यवस्थित लॉक करा आणि बाजूला सरकुन घ्या, ते स्वयंचलित यंत्र आहे भरल्यावर ते आपोआप थांबेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.