मृत्युपूर्वी यमराज देतात हे चार सिग्नल्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ज्याला जीवन आहे त्याला मरण देखील आहे. हाच निसर्गाचा नियम आहे जो सर्वांसाठी सारखा आहे. आपलं शरीर हे नश्वर आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू/अंत देखील होतो. यातून कोणीही वाचू शकत नाही. अगदी १००-१५० वर्ष जगणारे लोकं देखील आपल्या जगात आहेत.

पण तरी देखील ते काही अमरत्व घेऊन आलेले नाहीत.

त्यांना कधी ना कधी त्यांचे प्राण त्यागावे लागणारच.

पण कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्यापैकी कोणालाच ठावूक नाही. असं म्हणतात की मृत्यू पूर्वी यमराज आपल्याला काही संकेत देतात.

 

Yamraj-is-the-God-of-Death-in-Hindu-religion-inmarathi
udtikhabar.com

यमराज आणि त्यांचा भक्त अमृत यांच्या एका प्राचीन कथे अनुसार कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यू पूर्वी यमराज त्या व्यक्तीला चार संकेत देतात. ज्यातून आपण याचा अंदाज बांधू शकतो की आपला शेवट आता जवळ आला आहे. ज्यामुळे ती व्यक्ती जगाचा निरोप घेण्याआधी त्याच्या अपूर्ण कामांना पूर्ण करू शकेल.

यासंबंधी एक प्राचीन कथ खूप प्रचलीत आहे, आणि ती तेवढीच रंजक देखील आहे.

प्राचीन काळी यमुना नदीच्या काठावर अमृत नावाची एक व्यक्ती राहायची. त्याला त्याचा मृत्यूचे अतिशय भय वाटायचे. म्हणून त्याने मृत्यू देवता यमाची दिवसरात्र पूजा करण्यास सुरवात केली. एके दिवशी यमराज अमृतच्या तपस्येला बघून प्रसन्न झाले. यमराज अमृत समोर प्रकट झाले आणि त्याला म्हणाले की,

“मी तुझ्या तपश्चर्येपासून अतिशय प्रसन्न झालो आहे. त्यामुळे तू मला हवे ते वरदान मागू शकतो…”

स्वयं मृत्यूचे देवता यम यांना आपल्या समोर बघून अमृत आश्चर्यचकित झाला. त्याच्या तपस्येला प्रसन्न होऊन यम देवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले, तेव्हा अमृत उत्तरला की,

“मला अमरत्वाचे वरदान हवे आहे…”

त्याचे हे मागणे ऐकून यमराजने त्याल समजावले की,

“या जगात ज्याने कोणी जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू हा अटळ आहे. कोणीही प्राणी आपल्या मृत्युपासून वाचू शकत नाही.”

अमरत्वाचा वरदान यमराजकडून न मिळाल्यानंतर अमृतने यमराजला विचारले की,

“जर मृत्यू ला कोणीही टाळू शकत नाही, तर जेव्हा माझा मृत्यू जवळ असेल तेव्हा मला त्याबाबत माहिती किंवा काही संकेत मिळेल का, जेणेकरून मी माझ्या कुटुंबासाठी तशी सोय करू शकेल.”

त्याची ही मागणी ऐकून यमराजने त्याला त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना देण्याचं वरदान दिलं. त्याबदल्यात यमराजने त्याच्याकडून एक वचन घेतले की, जेव्हा केव्हा त्याला त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना मिळेल तेव्हा तो या जगाचा निरोप घेण्याच्या तयारीत राहिल.

 

yamraj-inmarathi
quoracdn.net

पण काही दिवसांनी अमृत यमाला दिलेलं वचन विसरला. त्याने यमाची पूजा आराधना करणे देखील सोडले. तो पूर्णपणे विलासी जीवनात रमून गेला. आता तर त्याने त्याच्या मृत्यूची चिंता करणे देखील सोडले.

त्याला वाटलं की जेव्हा त्याचं मरण जवळ येईल तेव्हा यमराज त्याला त्याची पूर्व सूचना देईलच. म्हणून तो कशाचीही पर्वा न करता ऐषोआरामात आपले जीवन जगू लागला.

काही काळाने अमृतचे केस पांढरे व्हायला लागले. त्याची प्रकृती बिघडायला लागली. त्याचे सर्व दात पडले. त्याला डोळ्यांनी कमी दिसायला लागले.

अमृत यमराजच्या संकेताची वाट बघत होता. पण त्याला कुठलाही संकेत मिळाला नाही. याचप्रमाणे आणखी काही वर्ष उलटले. आता तर अमृतचे आरोग्य एवढे खालावले होते की, तो पलंगावरून उठू देखील शकत नव्हता.

त्याचे शरीर पूर्णपणे निष्क्रिय झाले होते. पण तरी यमराजने त्याला मृत्यूबाबत कुठलाही संकेत न पाठविल्याबद्दल धन्यवाद केला.

त्याला वाटले की यमराजने अजून त्याला कुठलाही संदेश पाठवला नाही म्हणजे त्याला सध्या मृत्यूची काहीही भीती नाही.

एके दिवशी अमृतच्या घरी स्वयं यमराज प्रकट झाले. त्यांना बघून अमृत आश्चर्यचकित झाला. त्यांना बघून अमृतने संपूर्ण घरात मृत्यूपूर्वी पाठवलेले गेलेले यामराजचे संदेश पत्र शोधले. पण त्याला असले कुठल्याही प्रकारचे पत्र सापडले नाही. तर त्याने यमराजवर कपट केल्याचा त्याला धोका दिल्याचा आरोप केला.

अमृताच्या ह्या आरोपावर यमराजने अतिशय नम्रतेने उत्तर दिले. ते म्हणाले की,

“मी तुला ४ संकेत दिले. तुझे केस पांढरे होणे हा पहिला संकेत होता. तुझे दात पडणे हा दुसरा संकेत होता. तिसरा संकेत मी तेव्हा पाठवला होता जेव्हा तुझ्या डोळ्यांनी तुला कमी दिसायला लागले होते. आणि चवथा संकेत तो होता जेव्हा तुझ्या शरीरातील अवयव निष्क्रिय होत चालले होते.”

 

yamraj-4-letters-inmarathi
dainikbhaskar.com

पण तुझ्या विलासी जीवनात तू एवढा रमला होता की, तू त्या संकेतांकडे लक्षच दिले नाही.

या कथेनुसार कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी यमराज त्याला चार संकेत पाठवतात.

पहिला संकेत – केस पांढरे होणे
दुसरा संकेत – दात पडणे
तिसरा संकेत – डोळ्यांनी कमी दिसू लागणे.
चवथा संकेत – शरीराचे अवयव निष्क्रिय होणे.

माणूस जसा जसा वृद्धत्वाकडे वाटचाल करु लागतो तशा हळूहळू दिसणाऱ्या या खुणा आहेत. यामागे जीवशास्त्रीय कारणे आहेत.

यमराजाने संकेत दिले असे या कथेत सांगितले असले, तरी विज्ञानाच्या दृष्टीने या खुणा दिसणे स्वाभाविक आहे.

याची मुळे जीवशास्त्रात आहेत.

म्हणजे हे वगळे सांगायला नको की यमराजाने संकेत दिले नाही, तरी मृत्युपूर्वी, म्हणजे वृद्धत्व आल्यानंतर या खुणा दिसू लागतात.

आपला मृत्यू जवळ आला आहे हे सांगण्यासाठी यमराज असावेतच आणि त्यांनी संकेत द्यावेतच याची गरज नाही…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?