जगभरातील कोणताही पासपोर्ट या चार रंगांमध्येच का असतो?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
जगभरातील पासपोर्ट फक्त चारच रंगात उपलब्ध होतात ही माहिती बऱ्याच जणांना माहितही नाही. पण हे अगदी खरं आहे. चला जाणून घेऊया असं का?
संयुक्त राष्ट्रांमध्ये समावेश असलेल्या १९३ देशांचे पासपोर्ट हे केवळ चार रंगात उपलब्ध असतात. त्यावर वेगवेगळ्या छटा असू शकतात, पण मुख्य रंग हा लाल, निळा , हिरवा किंवा काळा या चार रंगापैकी एकच असतो. हा नियम International Civil Aviation Organization (ICAO) यांनी घालून दिलेला आहे.
प्रत्येक देशाला रंग निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि प्रत्येक देशाचे ठराविक रंग निवडण्यामागचे कारण देखील वेगळे आहे.
लाल रंग
जगभरातील बहुतांश पासपोर्ट याचा रंगाचे दिसतात, कारण बहतेक देशांनी याच रंगाची निवड केलेली आहे. युरोप खंडातील सहसा सर्वच देशांचा पासपोर्ट याच रंगाचा आहे. लाल रंग हा साम्यवादी विचारधारेचा रंग म्हणून प्रसिद्ध आहे. या देशांनी हा रंग निवडण्यामागचे असे कारण सांगितले जाते की या काही देशांचा इतिहास हा साम्यवादी आहे तर काहींची सध्याची यंत्रणा ही साम्यवादी आहे, त्याचेच प्रतिक म्हणून या रंगाचा पासपोर्ट हे देश देतात. युरोपियन देश वगळता चीन, सर्बिया, रशिया, पोलंड आणि कोलंबिया या देशाचे पासपोर्ट देखील लाल रंगाचे आहेत.
निळा रंग
लाल रंगा खालोखाल निळा रंग हा पासपोर्टवर सर्वात जास्त दिसतो. अमेरिकेपासून भारतापर्यंत अनेक देशांनी आपल्या पासपोर्टसाठी निळ्या रंगाची निवड केली आहे. (भारताचा पासपोर्ट काळ्या रंगाचा नसून नेव्ही ब्ल्यू रंगाचाआहे.) सोबत १५ कॅरेबियन देशांमध्ये देखील याच रंगाचे पासपोर्ट आढळतात. असे म्हटले जाते की निळा रंग हा नवीन जगाचे नव्या युगाचे प्रतिक आहे. त्यामुळे जे देश नव्या युगाची आस धरतात ते निळ्या रंगाच्या पासपोर्टला प्राधान्य देतात. या व्यतिरिक्त ब्राझील, अर्जेन्टिना आणि पॅराग्वे या देशांचे पासपोर्ट देखील निळ्या रंगाचे आहेत.
हिरवा रंग
पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि मोरोक्कोसह बहुतेक सर्वच इस्लामिक देशांचे पासपोर्ट हिरव्या रंगाचे आहेत. मुहम्मद पैगंबर याचा हिरवा रंग आवडता होता, तसेच हा रंग निसर्ग आणि शांततेचे प्रतिक आहे, म्हणून इस्लामिक देशांनी आपल्या पासपोर्टसाठी हिरव्या रंगाची निवड केली आहे. त्यांच्या झेंड्यावर पण हाच रंग दिसतो यो देखील याच कारणामुळे! सोबतच नायजेरिया, आयव्हेरी कोस्ट, बुर्कीना फासो आणि सेनेगल या देशांनी देखील पश्चिम आफ्रिकी देशांसोबतचे आपले संबंध दर्शवण्यासाठी पासपोर्टवर हिरव्या रंगला स्थान दिले आहे.
काळा रंग
या रंगाचा पासपोर्ट क्वचितच आढळतो. विविध कारणांमुळे जगभरातील देशांनी या रंगाला दूरच ठेवले आहे. परंतु झांबिया, कोंगो, चाड, मालवी यांसारख्या देशांनी आपल्या पासपोर्टसाठी काळ्या रंगाची निवड केली आहे. न्यूझीलँड देशाचा राष्ट्रीय रंग काळाच असल्याने त्यांचा पासपोर्ट देखील काळ्या रंगाचा आहे.
परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की, सर्वच देश आपल्या नागरिकांच्या वर्गानुसार वेगवेगळ्या रंगाचे पासपोर्ट देऊ शकते. उदा. भारताकडून सामान्य पासपोर्ट म्हणून निळ्या रंगाचा पासपोर्ट, अधिकृत पासपोर्ट म्हणून पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट, तर डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणून मरून रंगाचा पासपोर्ट दिला जातो.
काय? आहे की नाही रंजक माहिती? अहो मग शेअर करा आणि इतरांनाही सांगा.
(हे देखील वाचा: भारतीय पासपोर्ट बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात!)
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.