शांत झोप लागावीशी वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पूर्वी लोक लवकर उठायचे आणि लवकर झोपायचे, पण सध्याच्या या धावपळीच्या युगात वेळ कधी निघून जाते ते कळत देखील नाही. रात्रीचे बारा-एक वाजले म्हणजे दुसरा दिवस सुरु झाला तरी लोक झोपत नाहीत किंवा त्यांना झोप लागत नाही. ही समस्या म्हणजे काही आजार नाही. अनेकांना उशिरा झोपण्याची सवयच होऊन जाते, त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही.

जर तुम्हाला देखील अशी समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकते.

आज आम्ही तुम्हाला अश्या काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही खाल्ले तर रात्री तुम्हाला सुखाची झोप लागेल.

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza01

स्रोत


चेरी:

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza02

स्रोत

चेरीमध्ये melatonin नामक एक घटक असतो, जो मनुष्याच्या झोपेच्या क्रियेसाठी पोषक ठरतो. जे लोक सतत प्रवास करत असतात ते झोपेसाठी melatonin च्या गोळ्या देखील घेतात. एका निरीक्षणामध्ये हे देखील सिद्ध झाले आहे की चेरीचा ज्यूस पियाल्यामुळे गाढ झोप लागते आणि मुख्य म्हणजे तुमची झोप पूर्ण होते.

 

रताळी:

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza03

स्रोत

झोपेसाठी आवश्यक असणारे सर्वच घटक रताळ्यामध्ये आढळतात. तसेच त्यामध्ये पोटेशियमसुद्धा असते जे शरीराचे मसल्स रीलॅक्स करते. ज्यामुळे रात्री लवकर झोप लागते.

 

हर्बल टी:

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza04

स्रोत

अनेक निरीक्षणांमधून हे सिद्ध झालं आहे की हर्बल टी लवकर झोप येण्यास कारणीभूत ठरू शकते. झोपण्यापूर्वी हर्बल टी घेतल्यास तुमचे डोळे लवकर जड होतात आणि काहीच वेळात तुम्ही झोपेच्या स्वाधीन होता.

 

दुध:

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza05

स्रोत

झोपेपूर्वी आपल्याला नेहमी दुध पिण्यास सांगितले जाते. ते यासाठीच की दुध हे झोप येण्यासाठी चांगलेच परिणामकारक ठरते. दुधामध्ये amino acid tryptophan असतं जे मेंदूमध्ये serotonin नामक द्रव्य तयार करण्याच्या प्रक्रीयेसाठी आवश्यक असतं.

हे serotonin द्रव्यचं लवकर झोप येण्यासाठी कारणीभूत ठरतं. म्हणून यापुढे झोपण्याच्या वेळी दुध नक्की प्या.

 

केळी:

 

foods-to-be-eaten-before-sleep-marathipizza06

स्रोत

केळ्यामध्ये पोटेशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात जे चांगल्या झोपेसाठी आवश्यक असतात. तसेच त्यामधील कार्बोहायड्रेट्स सुद्धा झोप येण्याच्या प्रक्रीयेमध्ये मदत करतात.

या व्यतिरिक्त केळ्याचे आपल्या शरीरासाठी अनके फायदे आहेत. त्यामुळे झोपण्याच्या वेळेस एकतरी केळ जरूर खावं.

तर मग आज रात्री वरीलपैकी एक तरी पदार्थ नक्की try करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *