नाश्त्यामध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सकाळी ऑफिसला किंवा कोठेही कामासाठी बाहेर निघताना चांगला नाश्ता करावा, ज्यामुळे दिवसभर शरीर संतुलित राहतं असा सल्ला अनेकदा दिला जातो. हा सल्ला योग्यचं आहे म्हणा. सकाळी जर पोटभर नाश्ता केला तर दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत थकवा जाणवत नाही. तसेच शरीरावर देखील त्याचा वाईट परिणाम होत नाही. परंतु नाश्त्यामध्ये नेमकं काय खावं हे कुणीच सांगत नाही. त्यामुळे सकाळी जे काही समोर येईल ते खाऊन आपण नाश्ता झाला असं म्हणतो. पण तुम्हाला माहित आहे का – असे काही पदार्थ आहेत जे सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्याने त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला अश्याच काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही नाश्त्यामध्ये घेत असाल तर त्वरित थांबवा.

indian-breakfast-marathipizza0

स्रोत

भाज्यांसोबत केलेला पराठा खरं तर पौष्टिकच असतो. तळण्याऐवजी भाजलेला असल्यामुळे उत्तर भारतातील हा पदार्थ खाण्याकडे अनेकांचा भर असतो. मात्र सॉस, बटर, तूप, लोणचं यासोबत पराठा खाऊ नये, नाहीतर तुमचा नाश्ता अनहेल्दी झालाच म्हणून समजा.

indian-breakfast-marathipizza01

स्रोत

उपवासाच्या दिवशी प्रत्येकाची पहिली पसंती असते ती साबुदाणा वड्याला. उपवासही होतो आणि चमचमीत खाण्याची हौसही भागते. मात्र बटाटा, साबुदाणा, कॉर्नस्टार्च आणि तेल असे सगळे पदार्थ मिळून तयार झालेला साबुदाणा वडा नाश्त्याला टाळलेला बरा.

indian-breakfast-marathipizza02

स्रोत

मिसळ हा अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ. मिसळीवर तर्री घेतली की तिची चव ‘भारी’ लागते. मात्र याच नादात तिचं पौष्टिक मूल्य कमी होतं आणि तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.

indian-breakfast-marathipizza03

स्रोत

पावातून कॅन्सरजन्य घटक शरीरात जात असल्याचा अहवाल काहीच दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यामुळे ब्रेड टोस्टवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खाल्ल्यास अधिक पौष्टिक ठरतं. शिवाय बटर टाळल्यास कॅलरीजही कमी होतील.

indian-breakfast-marathipizza04

स्रोत

सामोसा हा नाश्त्याला खाणं सोडायला हवं. सकाळच्या वेळी हलका आहार घेण्याकडे प्रत्येकाचा कल असावा. मात्र मैद्यापासून बनलेला, बटाट्याचं मिश्रण असलेला, तळलेला सामोसा खाल्लात तर तुमची सकाळ आणि पर्यायाने अख्खा दिवसच अनहेल्दी होतो.

indian-breakfast-marathipizza05

स्रोत

बटाटा आणि मैद्याचा पाव असलेल्या वडापावमध्ये २८६ कॅलरीज असतात. त्यामुळे सकाळी नाश्त्याला वडापाव खाताना किमान दोनदा तरी विचार करा

indian-breakfast-marathipizza06

स्रोत

सकाळच्या वेळेत बटाट्याचे सेवन न करणं आरोग्यासाठी हितकारक असतं. तेलकट पुरी आणि बटाट्याच्या भाजीचं कॉम्बिनेशनही तितकंसं चांगलं नाही.

indian-breakfast-marathipizza07

स्रोत

सिरीअल फूडच्या आकर्षक जाहिरातींना भुलून पॅकेज फूडचे डबे घरी आणणाऱ्यांनी सावध रहावं. पॅक्ड केलेलं कॉर्नफ्लेक्स किंवा तत्सम पदार्थ तुमच्या आरोग्याला अपायकारक ठरतात.

indian-breakfast-marathipizza08

स्रोत

मेंदूवडा पचायला जड मानला जातो. चटणी-सांबार वगळले तरी ३३४ कॅलरीज् या मेंदूवड्यात असतात. त्यामुळे नाश्त्याऐवजी हा तेलकट दाक्षिणात्य मेंदूवडा दुपारच्या जेवणात खाल्लात तर बरं.

indian-breakfast-marathipizza09

स्रोत

हे वाचून तुम्ही म्हणत असालं, “आता उरलं तरी काय खाण्यासारखं?” हे पदार्थ जरी जीभेसाठी चमचमीत वाटत असले तरी ते शरीरासाठी अपायकारक आहेत म्हणून ते नाश्त्यासाठी योग्य नाहीत. यापेक्षा नाश्त्यामध्ये अंडी, दही, फळे, सुकामेवा, यांसारखे पौष्टिक पदार्थ खाल्लेले उत्तम!

नाश्ता चविष्ट असावा पण तो पौष्टिक देखील असला पाहिजे नाही का?

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “नाश्त्यामध्ये हे पदार्थ चुकूनही खाऊ नका!

  • January 23, 2017 at 3:44 pm
    Permalink

    काय खाऊ नका हे सांगितलेत,
    आता काय खायचे ते पण सांगा !

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?