मेंदू तल्लख ठेवायचाय? ह्या 5 गोष्टी खात रहा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

स्मरणशक्ती वाढवायचीये? सकस आहार ठेवायचाय?

एक्सपर्ट्सच्या मते, पुढील गोष्टी तुमच्या आहारात नेहेमी असायला हव्या.

मासे

हेल्थ एक्स्पर्ट म्हणतात की पेडवे, रावस, बांगडा ह्या माश्यांमध्ये omega-3 fatty acids भरपूर प्रमाणात असतं. ह्या acids मुळे मेंदू तल्लख राहतो. आठवड्यातून दोनदा हे मासे खाल्ल्याने अनेक मेंदूचे विकार दूर रहातात, शिवाय स्मरणशक्ती तीक्ष्ण रहाते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या संपूर्ण शरीराच्याच आरोग्याला अत्यंत हितकारी आहेत. पण त्यांचा मेंदूवर विशेष परिणाम होतो. विशेषतः पालक आणि ब्रोकोली भरपूर खा – त्यातील antioxidants, folate, beta-carotene आणि vitamin C मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवेल.

संडे हो या मंडे – !!!

अंड्याचं बलक मेंदूसाठी उपकारक आहे. त्यातील विटामिन्स आणि मिनरल्स मेंदू तल्लख ठेवतात. शिवाय भरपूर प्रमाणातील आयर्नमुळे लाल रक्तपपेशी तयार होतात, ज्याने मेंदूला ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो. अंड्यातील विटामिन B12 आणि आयोडीनमुळेसुद्धा मेंदू तल्लख रहातो.

ग्रीन टी

आपला मेंदू ७०% पाण्याने बनलाय!!! आश्चर्य वाटलं ना! ह्यावरूनच पाण्याचं महत्व लक्षात येतं. पण सारखं सारखं किती पाणी पिणार ना? म्हणून ग्रीन टी प्या. त्यातल्या antioxidantsमुळे मेंदू शांत, स्थिर होण्यास मदत होते, anxiety कमी होते.

डार्क चॉकलेट 🙂

डार्क चॉकलेटमधल्या flavonoids मुळे मानसिक कौशल्य वाढीस लागतं. Flavonoids मुळे नवीन न्युरॉन्स तयार व्हायला मदत होते ज्याने नवनवीन गोष्टी लक्षात ठेवण्याची मेंदूची क्षमता वाढते. ह्याशिवाय, flavonoids मुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारण्याचासुद्धा फायदा होतो.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 204 posts and counting.See all posts by omkar

2 thoughts on “मेंदू तल्लख ठेवायचाय? ह्या 5 गोष्टी खात रहा!

 • September 9, 2018 at 4:31 pm
  Permalink

  छान आहे

  Reply
 • September 12, 2018 at 2:53 pm
  Permalink

  nice

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?