Flipkart वरच्या “डिस्काऊन्ट्स” चा परिणाम – २,००० करोडचा वार्षिक तोटा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

हो – ऑनलाईन रिटेल कंपनी Flipkartला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या (amazon, snapdeal इत्यादी) “डिस्काऊन्ट वॉर”मुळे तब्बल २००० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

गेल्या वर्षीसुद्धा Flipkartने तोटाच सहन केला होता. पण तेव्हाची रक्कम बरीच कमी होती – गेल्या वर्षीचा तोटा होता – ७१५ कोटी.

flipkart

Image source: glassdoor

Economic Timesला दिलेल्या मुलाखतीत, Elargir Solutions ह्या रिटेल कंपनीजला कन्सल्टंसी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या director Ruchi Sally म्हणतात की Flipkat चं नुकसान कमी करण्याचा एकच उपाय आहे – अश्या गोष्टींची विक्री सुरु करणं ज्यांच्या delivery मध्ये नुकसान नाहीये. कारण सध्याचं नुकसान – मोठे discounts आणि operational issuesमुळे आहे.


Actually, Flipkartच नाही, भारतातल्या सगळ्याच e-commerce कंपनीजची हीच कथा आहे. सर्वांनी ह्या industryचं “discount based industry” असंच स्वरूप ठेवलं आहे. Snap Deal आणि Flipkart कडे foreign investorsचा प्रचंड पैसा आहे – त्यामुळे कितीही नुकसान सोसून मार्केटचा अधिकाधिक भाग काबीज करण्याची त्यांची व्यूहरचना आहे. दुसरीकडे Amazon च्या CEO Jeff Bezos नी भारतात पैसे गुंतवण्याचं ठेवलेलं टार्गेट – २ बिलियन डॉलर्स (म्हणजे २ अब्ज डॉलर्स – म्हणजेच तब्बल १३० अब्ज रुपये!) – कमी पडत आहे! म्हणजेच – भारतात amazonचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी त्यांना गेल्या वर्षभरात २ बिलियन डॉलर्स “खर्च” करायचे होते, जे कधीच संपलेत!

J P Morgan च्या एका रिपोर्टनुसार, e-commerce कंपनीजचा प्रवास चीनमध्ये जसा झाला, त्यापेक्षा वेगळा भारतात असण्याची दाट शक्यता आहे. चीनमध्ये जितक्या लवकर नफा मिळायला सुरुवात झाली होती – तशी भारतात होणार नाही.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *