निकोला टेस्लाची भविष्यातील तंत्रज्ञान प्रगतीविषयीची ही पाच भाकिते तंतोतंत खरी ठरली आहेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

थॉमस एडिसन यांच्याविषयी तर आपल्या सर्वांना माहित आहेत. थॉमस एडिसनविषयी आपण लहानपणी शिकलो आहोत. एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावून माणसाला विकासाकडे नेले. त्यांनी हा शोध कशाप्रकारे लावला, हे देखील आपण शिकलेलो आहे. पण याच थॉमस एडिसनबरोबर असा एक माणूस होता, ज्याने भविष्यात घडणाऱ्या काही मोठ्या बदलांची भाकिते केली होती. हा माणूस एवढा प्रकाशझोतात आला नाही.

InMarathi Android App

त्यांनी केलेली काही भाकिते जवळजवळ खरी ठरली आहेत आणि काही येणाऱ्या भविष्यामध्ये खरी होतील असा लोकांचा विश्वास आहे. या माणसाचे नाव निकोला टेस्ला होते.

 

Nikola tesla.Inmarathi
wakingtimesmedia.com

निकोला टेस्ला हे १९ व्या शतकातील महान संशोधकांपैकी एक आहेत. पण ते कधीही त्यांचे महान प्रतिस्पर्धी थॉमस एडिसन एवढे लोकप्रिय नाही झाले. एक रंजक गोष्ट म्हणजे थॉमस एडिसन हे त्यांचे बॉस होते. जे विजेच्या रूपांचा अभ्यास करत असत, याला विकसित करण्यामध्ये क्रोएशियाई इंजिनियर निकोला टेस्लाचे खूप मोठे योगदान आहे.

निकोला टेस्ला हे मूळचे सर्बियाचे भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होते. त्यांचा जन्म १० जुलै १८५६ मध्ये स्मिल्यान येथे झालं होता. वय वर्ष ८६ असताना त्यांचे निधन झाले.

एडिसन डायरेक्ट करंट (डीसी) च्या उपयोगांवर संशोधन करत होते, जे १०० वोल्टच्या पॉवरवर काम करत होते आणि त्याला दुसऱ्या व्होल्टेजमध्ये बदलणे कठीण होते.

पण टेस्लाचे विचार थोडे वेगळे होते. त्याला वाटायचं की, अल्टरनेटिव्ह करंट (एसी) अजून उपयुक्त आहे, कारण या करंटला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणे सहज शक्य होते.

 

Nikola tesla.Inmarathi1
teslarati.com

यामध्ये टेस्ला यांचेच बरोबर होते. पण इतिहासामध्ये ‘ फादर ऑफ इलेक्ट्रिसिटी’ थॉमस एडिसनलाच म्हटले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेचे उद्योजक मस्कने आपल्या चालणाऱ्या गाड्यांच्या कंपनीला टेस्ला नाव दिले आहे. मस्क कंपनीमध्ये कार्यकारी संचालकाच्या रूपात काम करत आहेत आणि त्यांची कंपनी विशेष विजेवर चालणाऱ्या कार बनवत आहे.

टेस्ला यांनी विजेच्या संशोधनाच्या व्यतिरिक्त कितीतरी प्रकारच्या तंत्रज्ञानाची भविष्यवाणी केली होती. जी कितीतरी दशकानंतर आता खरी होत असल्याचे दिसून येत आहे.

वाय फाय

वायरलेस टेक्नॉलॉजीच्या विषयी असलेल्या आवडीमुळे टेस्लाने डेटा ट्रान्समिशनवर केंद्रित कितीतरी संशोधन आणि त्यांच्याशी जोडलेले काही सिद्धांतांना विकसित केले. गुइलेर्मा मार्कोनी याने सर्वात पहिल्यांदा अटलांटिक भरमध्ये मोर्स कोडच्या साहाय्याने पत्र पाठवले. पण टेस्ला यापेक्षा पुढे जाऊन अजून काहीतरी करू इच्छित होते.

 

Nikola tesla.Inmarathi2
avirtel.az

टेस्ला यांनी शक्यता वर्तवली होती की, संपूर्ण जगामध्ये एक दिवस टेलिफोन सिग्नल, कागदपत्रे, संगीत यांच्या फाईल्स आणि व्हिडीओ पाठवण्यासाठी वायरलेस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल आणि वाय फायच्या साहाय्याने असे करणे शक्य होईल. पण स्वतः असे काही बनवू शकले नाही, त्यांची ही भविष्यवाणी १९९० मध्ये वर्ल्ड वाइड वेबच्या संशोधनाबरोबरच खरी ठरली.

मोबाईल फोन

 

Nikola tesla.Inmarathi3
sftcdn.net

टेस्ला यांनी १९२६ मध्ये एका अमेरिकेच्या मॅगझीनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भविष्यातील आपल्या अजून एक पूर्व अनुमान लावला होता. त्यांनी फोटो,संगीत आणि व्हिडीओ ट्रान्समिस्ट करण्याच्या आपल्या कल्पनेला ‘पॉकेट टेक्नॉलॉजी’ असे नाव दिले.

त्यांनी स्मार्टफोनच्या संशोधनाच्या १०० वर्ष आधीच याची भविष्यवाणी केली होती. पण मोबाईल फोन माणसांच्या जीवनाचा एक एवढा महत्त्वाचा भाग बनेल, असे त्यांना नक्कीच वाटले नसेल.

ड्रोन

 

Nikola tesla.Inmarathi4
gannett-cdn.com

१८९८ मध्ये निकोला टेस्ला त्यांनी वायरलेस आणि रिमोट कंट्रोलवर ऑपरेट होणारा ‘ऑटोमेशन’ प्रदर्शित केले. आज आपण याला रिमोटवर चालणारी टॉय शीप किंवा ड्रोन म्हणतो. वायरलेस कम्युनिकेशन, रोबॉटिक्स, लॉजिक गेट यांसारख्या नवीन टेक्नोलॉजी बघणाऱ्या लोकांना आश्चर्यात पाडले होते.

लोकांना वाटत होते की, याच्या आतमध्ये कुणीतरी लहान माकड आहे, जो या सिस्टमला चालवत आहेत.

टेस्ला असे मानत होते की, एक दिवस रिमोटवर चालणारी मशीन्स लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनेल आणि आज ही  भविष्यवाणी खरी झालेली आपल्याला दिसून येते.

कमर्शियल हाय स्पीड एअरक्राफ्ट

टेस्ला यांची अशी कल्पना होती की, काही काळाने असे एअरक्राफ्ट असतील, जे जगभरामध्ये एकदम वेगात कमर्शियल रूटवर्क करतील. या एअरक्राफ्टमधे खूप साऱ्या प्रवाश्यांना बसण्याची व्यवस्था असेल. निकोला टेस्ला यांनी लिहिले की,

” वायरलेस पॉवरचा सर्वात महत्त्वाचा वापर इंधन नसलेल्या मशिनींमध्ये होईल, जे लोकांना न्यूयॉर्कपासून युरोपला काही तासांमध्ये पोहोचवेल.”

 

Nikola tesla.Inmarathi5
airliners.net

कदाचित त्यावेळी या गोष्टींना लोकांनी वेड्यात काढले असेल. पण टेस्ला यावेळी देखील परत बरोबर होते. कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त वेगाबद्दलचा त्यांचा अंदाज बरोबर होता. इंधनाविना उडणारे विमान आणि विजेवर चालणारे विमान याबद्दल सांगितलेली त्यांची भाकिते अजूनही भविष्यातील स्वप्नच आहे.

स्त्रियांचे सशक्तीकरण 

१९२६ मध्ये कॉलियर्स बरोबर झालेल्या एका मुलाखतीला ‘व्हेन वुमन इज बॉस‘ असे शीर्षक दिले गेले. यावरून हे समजते की, ६८ वर्षाचे टेस्ला त्यावेळी देखील स्त्रियांविषयी किती गांभीर्याने विचार करत होते.

टेस्ला मानत होते की, स्त्रिया चांगले शिक्षण, रोजगार आणि समाजामध्ये प्रभावशाली बनण्यासाठी वायरलेस टेक्नोलॉजीचा वापर करतील.

 

Nikola tesla.Inmarathi6
adage.com

पण गेल्या शतकामध्ये तंत्रज्ञानाला सामाजिक आणि राजनैतिक जीवनामध्ये स्त्रियांच्या सशक्तीकरणाशी जोडणे थोडे कठीण असल्याचे दिसून आले. पण हे नक्कीच म्हणता येईल की, स्त्रिया ह्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आवर्जून भाग घेत आहेत.

याहूच्या कार्यकारी संचालक आणि संगणक अभियंत्या मेरिसा मेयर आणि फेसबुकची सध्याची ऑपरेशनल डायरेक्टर शेरील सँडबर्ग या ह्या गोष्टीचा पुरावा आहेत.

यांच्यासारख्या स्त्रियांनी तंत्रज्ञानाच्या आधारे मेटोसारख्य मोहिमा चालवून जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे.

यावरून हे समजते की, निकोला टेस्ला या महान संशोधकाला तंत्रज्ञानामध्ये भविष्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांबद्दल त्या काळातच समजले होते आणि ते काही प्रमाणात सत्य देखील झाले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *