शेगावला जाणाऱ्या गजानन भक्तांनी ह्या ५ स्थळांना सुद्धा आवर्जून भेट द्यायला हवी!

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक चित्रपट, क्रीडा समीक्षक आहेत. विविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख प्रसिद्ध होत असतात.

InMarathi Android App

===

देशातील शिस्तबद्ध ,स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही, नियमांची अंमलबजावणी आणि मनुष्यबळ याबाबतीत सर्वोत्तम असे देवस्थान कोणते असेल तर ते शेगावचे गजानन महाराजांचं स्थान.

 

shegaon-inmarathi05
sagarworld.com
===
===

कुठेही पैशाकरिता वखवखलेपणा नाही. विकतच्या दर्शनाचे वेगवेगळे ‘पॅकेजेस’ नाहीत. सर्वांसाठी एकच रांग.

दर एक ते दोन तासांनी सेवेकरी जीवणूनाशक स्प्रे ने मंदिर आवारातील सर्व भाग पुसतात आणि जमीन सारवतात. पण या मंदिराची, संस्थेची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे येथील उत्स्फूर्त सेवेकरी. volunteers. मनुष्यबळ.स्वतःहून इथे सेवा द्यायला गावातील, परगावातील लोक येतात त्यातही वर्ष-वर्ष वेटिंग लिस्ट असते.

 

shegaon-inmarathi06
panoramio.com

पण शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायण गृह आणि आनंद सागर या ठिकाणीच ९०% लोक जातात. गजानन महाराजांसंबंधित आणखी ४ जागा शेगाव ला प्रमुख मंदिराच्या जवळच आहे याची बहुतेकांना कल्पना नसते. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणांचा उल्लेख आढळतो.

१. मोटेंचं शिव मंदिर :-

हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार संस्थानाने केला आहे. त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे. या मंदिराचे महत्व म्हणजे;

 

shegaon-inmarathi
shegaon.lwebs.in

पोथीत उल्लेख आढळतो की, गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले, किर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात.
आत गेल्यावरच महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो, पादुका समोर दिसतात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती.
मंदिरात मूळ मंदिराचा फोटो ही आहे. शेगाव चे मूळ नाव ‘शिवगाव’ होते ते याच ग्रामदैवत शिवमंदिरावरून पडले होते.

२. महाराजांचे प्रगट स्थळ :-

बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात. पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्व प्रथम दर्शन, भेट बंकटलालास होते त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे यबद्दल अनभिज्ञ असतात.

मोटेंच्या शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावरून समोर जात उजवीकडे वळल्यावर सरळ गेल्यास किंवा कोणाला प्रकट स्थळाबद्दल विचारल्यास तो रस्ता दाखवू शकतो. थोड्याच अंतरावर ते प्रकट स्थळ येतं.

 

shegaon-inmarathi01
shegaon.lwebs.in

एक मस्त बहरलेला भलामोठा वटवृक्ष इथे आहे. समोर प्रकट स्थळाची जागा आणि त्याबद्दल माहिती आहे. शेजारीच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहे. काही वर्षांपासून संस्थानाने या जागेचं नीट बांधकाम केलंय. आता इथेही सेवेकरी असतात. पण तरीही आधीची जागाच जास्त नैसर्गिक वाटायची.

३. बंकटलालचा वाडा :-

 

shegaon-inmarathi02
shegaon.lwebs.in

प्रकट स्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल. इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे. आत महाराजांचा फोटो, पादुका आणि बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली प्रीतिकृती आहे. पाचेक वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितीतला जुना वाडाही होता. लाकडाचे जुने नक्षीकाम स्पष्ट दिसायचे. आता तो संपुर्ण पाडून तिथे मोकळी जागा आहे.

४. हनुमान, शीतला माता मंदिर :-

 

shegaon-inmarathi03
punetopune.com

काही अंतरावरच हे मंदिर आहे. इथेच महाराजांनी, पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यानी हाताने उस पिळून मुलांना रस पाजला होता. इथे या चवथ्या जागी पोचल्यावर काही पावलांवरच मंदिराचा मागचा भाग येतो. हे सुद्धा संस्थानाच्या अखत्यारीत असल्याने इथेही महाराजनचा फोटो, आणि सेवेकरी असतात. जुन्या मंदिराचा मूळ फोटो, येथील इतिहासाची माहिती दिली आहे.

===
===

५. एक जुने सुंदर शिवमंदिर :-

 

shegaon-inmarathi04
acchitips.com

प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबांचे पुरातन आणि वेगळा ‘फील’ देणारे हे मंदिर आहे. याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याने इथे नेहमी शांतता आणि शांती असते. हे मंदिर संस्थानाच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे येथील स्थापत्य इतर चार स्थानांप्रमाणे नसल्याने येथे मूळ ‘फ्लेवर’ जाणवतो.

शेगाव ला जाणाऱ्यांनी किमान एकदा तरी या ५ जागांना भेट दिली तरीही संपूर्ण यात्रेला वेगळा ‘टच’ येईल.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Abhijeet Panse

Author @ MarathiPizza.com

abhijeet-panse has 7 posts and counting.See all posts by abhijeet-panse

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *