SEX शिकवणारी जगातील पहिली ‘शाळा’…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

शाळा.. शाळेत जायचा सर्वांनाच कंटाळा येतो. काय ते शाळेत रोजचं मॅथ्स, सायन्स आणि हिस्ट्री शिकायचं. ते खरच खूप कंटाळवाणे असते. शाळेत जायचं म्हटल की आपण आधीच नाक मुरडतो, ते बोरिंग सब्जेक्ट, तेच अर्धवय झालेले शिक्षक आणि त्यांची ती शिकविण्याची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा. तसं आजकाल सर्वच मॉडर्न झालाय तरी शाळा म्हटल की कंटाळा येतोच आणि का नको यायला इंटरेस्ट वाटावा असं काही असायला तर हवं शाळेत… तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे शाळेविषयी असेच विचार असणार.

 

sex-school-inmarathi03
theattackmachine.wordpress.com

पण जर तुम्हाला हे कळालं की, शाळेत ‘सेक्स एज्युकेशन’ देण्यात येणार आहे. तर नक्कीच तुम्हाला शाळा इंटरेस्टींग वाटायला लागेल. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे बरं…  पण हे खरं आहे. आता एक अशी शाळा उघडण्यात आली आहे जिथे तुम्हाला केवळ सेक्स बद्दल शिकविल्या जाईल आणि प्रेमाचे धडे दिले जातील… हे वाचून तुमच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील…


 

Sex School Vienna.Inmarathi
odditycentral.com

ऑस्ट्रियन इंटरनॅशनल स्कूल ऑफ सेक्स (एआयएसओएस) व्हियाना, ही जगातील पहिली अशी शाळा आहे, जिथे ‘सेक्स एज्युकेशन’ दिले जाते. येल्व्हा मारिया थॉम्पसन ह्या या शाळेच्या संस्थापक आणि मुख्याध्यापिका आहेत. २०१२ च्या दरम्यान ही शाळा सुरु करण्यात आलेली होती.

 

sex-school-inmarathi04
mojidelano.com

येल्व्हा मारिया थॉम्पसन यांच्या मते,


आम्ही येथे चांगले प्रेमी कसे बनावे, याबद्दलचे ज्ञान लोकांना देतो. त्या म्हणाल्या की, मन, मसल्स आणि फिटनेस यांच्या ट्रेनिंगसाठी लोक खूप पैसा आणि वेळ खर्च करतात. पण चांगले प्रेमी कसे बनावे यासाठी लोक काहीही करत नाहीत, यासाठी ते आपला पैसा आणि खर्च करत नाही. प्रेम –निर्मिती करण्याचे कौशल्य कसे वाढावे, यासाठी ते पुरेसे प्रयत्न करत नाहीत आणि या शाळेमध्ये त्यांना हेच ज्ञान दिले जाते.

हे वाचून तुम्ही चक्रावले असाल…

 

Sex School Vienna.Inmarathi1
wordpress.com

आता तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की नेमकी ही शाळा कशी असेल, तिथे कशा प्रकारे शिकवल्या जात असेल..?

सर्वात आधी आम्ही सांगू इच्छितो की जर तुम्हाला या शाळेत अॅडमिशन घ्यायची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप मोठी रक्कम मोजावी लागेल. या शाळेची फीस खूप महाग आहे. या शाळेत अॅडमिशन घेणाऱ्याला १ लाख १५ हजार रुपये मोजावे लागतील. त्यासोबतच या शाळेत राहणाऱ्या मुला मुलींना एकाच खोलीत राहावे लागते.


 

sex-school-inmarathi
trendingviralpost.com

या शाळेची हेड मिस्ट्रेस (मुख्याध्यापिका) येल्व्हा मारिया थॉम्पसन या सांगतात की, ज्याचं वय १६ वर्षापेक्षा जास्त आहे तेच या शाळेत प्रवेश घेण्याकरिता अप्लाय करू शकतात.

या शाळेचा संपूर्ण फोकस हा शाळेतील विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट प्रेमी बनविण्याचा आहे. म्हणूनच येथे थेरी कमी आणि प्रॅक्टिकल ज्ञान जास्त दिल्या जातं. एवढंच नाही तर या शाळेत लैंगिक क्रियांचा योग्य प्रयोग, योग्य पोझिशन्स, योग्य टेकनिक, स्पर्श आणि सोबतच बॉडी क्वॉलिटीजबद्दल ज्ञान दिले जाईल. हा कोर्स संपल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देखील दिल्या जाईल.

 

sex-school-inmarathi02
metro.co.uk

सेक्स ज्याबद्दल आजही कित्येक लोकं उघडपणे बोलत नाहीत. मग अश्यात सेक्स स्कूल उघडणे म्हणजे एका नवीन वादाला आमंत्रणच आहे, पण यामुळे जेवढी ही शाळा वादात आहे त्याहून जास्त या शाळेची हेड मिस्ट्रेस ही असते.

थॉम्पसन या मुख्यकरून न्यूड प्रदर्शनी करिता ओळखल्या जातात, एका प्रदर्शना दरम्यान तर त्यांनी चक्क न्यूड महिलांच्या वेगवेगळ्या मुद्रांतील १०० पुतळे लावले होते. तर दुसरीकडे या शाळेचे प्रवक्ता मेलोडी कर्श यांना पूर्ण खात्री आहे की जगातील हे पहिले आणि वेगळे सेक्स स्कूल नक्की यशस्वी होईल.

 

sex-school-inmarathi01
mojidelano.com

पण या शाळेचा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर विरोधही केल्या जात आहे. ऑस्ट्रियातील लोकांच्या मते, ही शाळा सेक्स एज्युकेशनच्या नावावर सेक्सची विक्री करत आहे.


या शाळेच्या टीव्ही जाहिरातीवर आधीच बॅन लावण्यात आला आहे.

या शाळेची पहिली बॅच १ जानेवारी २०१२ ला भरली होती. या शाळेच्या वेबसाईटवरून हे लक्षात येते की, या शाळेचे वर्ग १८ व्या शतकातील इमारतीत भरवले जातात, जी व्हियानापासून गाडीने अर्धा तास लांब दूर आहे. शाळेच्या गरजा भागवण्यासाठी या इमारतीचे पुनर्वसन केले गेले आणि तिला योग्यप्रकारे सजवण्यात आले आहे. या शाळेत हायटेक शिक्षण प्रदान करणारी उपकरणे देखील आहेत आणि त्यासाठी एक वेगळा कक्ष देखील तयार करण्यात आलेला आहे.

 

Sex School Vienna.Inmarathi2
blogspot.com

तर अशी ही सेक्स स्कूल जगातील पहिली आणि सध्यातरी एकमेव केवळ सेक्स शिकविणारी शाळा आहे…

===


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?