राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या देशात तीन गोष्टींची सर्वात जास्त चर्चा होत असते एक म्हणजे बॉलीवूड, दुसरं क्रिकेट आणि तिसरं म्हणजे ‘राजकारण’… आपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा. सत्ताधारी तसेच विरोधीपक्षनेते हे राजकारण घडवून आणतात.

कधी त्याचा परिणाम वाईट होतो, तर कधी चांगला होतो. पण राजकारणी येतात कुठनं, एक राजकरणी किंवा नेता होण्याआधी ते कसे असतील, काय करत असतील, असे अनेक प्रश्न नेहमीच आपल्याला पडतात. चला तर मग आज जाणून घेऊ की आपले आवडते नेते राजकारणात येण्याआधी नेमकं काय करायचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी :

 

modi-marathipizza00

 

भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका गरीब कुटुंबातील आहेत. लहानपणी नरेंद्र मोदी हे चहाच्या टपरीवर काम करायचे हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले. राजकारणात रुजल्यानंतर सर्वातआधी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान बनले.

देवेंद्र फडणवीस :

 

devendra fadnavis marathipizza

महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९९२ साली नागपूरच्या गव्हरमेंट लॉ कॉलेजमधून पदवी घेतली त्यानंतर ते अभाविपशी जुळले.

बाळासाहेब ठाकरे :

 

thackeray-inmarathi
intoday.in

बाळासाहेब ठाकरे हे राजकारणात येण्याआधी एक कार्टूनिस्ट होते. तेव्हा ते फ्री प्रेस जर्नलकरिता कार्टून बनवायचे. पण राजकारणात आल्यानंतर ते एक प्रभावशाली नेते म्हणून महाराष्ट्राच्या जनतेपुढे आले.

प्रणब मुखर्जी :

 

pranab-mukherjee-inmarathi
ndtv.com

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी एम.ए. ची पदवी घेतल्यानंतर कलकत्त्याच्या एका विद्यापीठातून एलएलबीची पदवी देखील घेतली. त्यानंतर त्यांनी डेप्युटी अकाऊंटंट जनरल यांच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला.

सोनिया गांधी :

 

sonia-gandhi-inmarathi
india.com

इटली येथे जन्मलेल्या सोनिया गांधी या सध्या राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी कॅम्ब्रीज च्या शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांची भेट राजीव गांधी यांच्यासोबत झाली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. असे सांगितल्या जाते की, जेव्हा राजीव गांधी आणि सोनिया यांची भेट झाली तेव्हा सोनिया त्या एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करायच्या.

राहुल गांधी :

 

rahul-gandhi-marathipizza00

राहुल गांधी यांनी बीए आणि एमफिलची पदवी घेतल्यानंतर लंडनच्या मॉनिटर ग्रुपमध्ये काम केले. त्यानंतर ते भारतात परतले. ज्यानंतर ते राजकारणात आले.

डॉ. मनमोहन सिंग :

 

manmohan--singh-marathipizza03
s3.india.com

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी United Nations Conference on Trade and Development (UNCTAD) काम केले होते. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून देखील काम केले. ज्यानंतर ते राजकारणात आले. त्यांनी १० वर्षांपर्यंत देशाचे पंतप्रधान पद भूषवले.

लालू प्रसाद यादव :

 

lalu_prasad_yadav-inmarathi
wordpress.com

बिहार येथील मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे राजकारणात येण्याआधी पटना येथील बिहार वेटनरी कॉलेजमध्ये क्लर्कची नोकरी करायचे. तिथेच त्यांचे भाऊ चपरासी होते. ज्यानंतर लालू यांनी लॉ ची पदवी घेतली आणि राजकारणात उतरले.

मायावती :

 

Mayawati-inmarathi
thehindu.com

गाझियाबाद च्या VMLG मधून B.Ed. ची पदवी घेतल्यानंतर मायावती यांनी आयएएसची तयारी करण्यास सुरवात केली. त्यासोबतच त्या शाळेतील मुलांना शिकवायच्या. त्यानंतर मायावती या राजकारणात आल्या आणि त्या उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या.

 

स्मृती ईराणी :

 

Smriti-Zubin-Irani-inmarathi
vogue.in

स्मृती इराणी बद्दलतर सर्वांनाच माहिती आहे. त्या राजकारणात येण्याअगोदर एक टीव्ही अभिनेत्री होत्या. ज्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली आणि आज त्या केंद्रीय मंत्री आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते नेते काय करायचे माहित आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?