' …आणि अंतराळात कळीचं फुल झालं! – InMarathi

…आणि अंतराळात कळीचं फुल झालं!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अंतराळ हे अतिशय गूढ गोष्टींनी भरलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मानवाने अंतराळातील बहुतेक गोष्टी शोधून काढल्या आहेत. पण इतके असून देखील मानवाने अजूनही अंतराळातील १ टक्के गोष्टीचा देखील छडा लावलेला नाही इतकं हे अंतराळ आणि त्याच्या मध्ये दडलेली गुपित प्रचंड आहेत. काहीच वर्षांपूर्वी “अंतराळात पाउस पडतो” हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं होतं. शनीच्या कड्यांभवती असलेल्या विशिष्ट वातावरणामुळे हे घडून येतं, याचा शोध घेण्यास अखेर शास्त्रज्ञांना यश आलंय.

space-marathipizza

स्रोत

पण अजूनही मनुष्याला त्याच्या मनात अनादी काळापासून असलेल्या एका प्रश्नाचा ठोस उलगडा मात्र करता आलेला नाही. तो प्रश्न म्हणजे अंतराळात इतर ठिकाणी जीवसृष्टी आहे का?

याच पार्श्वभूमीवर अंतराळामध्ये एखादी सजीव वस्तू तग धरू शकते का? यासाठी अनेक प्रयोग आणि संशोधन करून देखील अजूनही पुराव्यासकट काही निष्कर्ष निघत नव्हता. पण मनुष्याचे प्रयत्न सुरु होते आणि आता त्या प्रयत्नांना काहीसं यश आलंय हे मानायला हरकत नाही.

first-flower-in-space-marathipizza

स्रोत

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात म्हणजेच अंतराळात पहिल्यांदाच फूल उमललं आहे. नासाच्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नाने पृथ्वीच्या परिघाबाहेर उगवलेली ही पहिली सजीव वस्तू आहे.

 

first-flower-in-space-marathipizza01

स्रोत

या फुलाचं नाव ‘झिनिया’ असं ठेवण्यात आलं आहे. नासाचे अंतराळवीर स्कॉट यांच्या प्रयत्नातून ६० ते ८० दिवसात हे फूल अंतराळात उगवलं आहे.

स्कॉट यांच्या म्हणण्यानुसार –

पृथ्वीच्या परिघाबाहेर घेण्यात आलेल्या या फुलामुळे अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झालेला आहे. येत्या काळात अंतराळात टोमॅटो सारखी पिकं सुधा घेता येऊ शकतात.

elevated-bus-beijing-china-marathipizza01

स्रोत

महत्त्वाचं म्हणजे हे फूल खाण्यायोग्य आहे. ‘झिनिया’ हे अमेरिकेत सॅलडमध्ये खाल्लं जातं. याआधीही वैज्ञानिकांनी अंतराळ केंद्रातील व्हेजी लॅबमध्ये लेट्यूस उगवली होती.

 

lettuce-nasa-marathipizza

स्रोत

शास्त्रज्ञांनी अंतराळात उगवलेलं हे फुल अवकाश संशोधन क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल मानलं गेलं पाहिजे. या संशोधनाच्या आधारावर येणाऱ्या काळात शास्त्रज्ञ अजून नव नवीन गोष्टी जगासमोर उलगडतील अशी आशा करूया!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?