पुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपण जो तीन तासांचा चित्रपट बघतो. त्याला बनविण्यासाठी त्यामागे खूप मेहनत आणि तेवढेच लोकही असतात. म्हणजे जे त्या चित्रपटात अभिनय करत आहेत त्यात केवळ त्यांचीच मेहनत नसते तर त्यामागे अनेक लोक असतात ज्यांनी रात्रंदिवस त्याकरिता काम केलेलं असतं.

एका चित्रपटामागे, त्या चित्रपटाची कहाणी लिहिणाऱ्या लेखकापासून ते स्पॉटबॉय आणि मेकअप आर्टीस्टपर्यंत सर्वांची मेहनत असते. तो चित्रपट त्या सर्वांच्या योगदानातून बनतो.

आणि जर तो चित्रपट हिट गेला तर जरी सर्वत्र अभिनेत्यांची किंवा दिग्दर्शकांची वाहवाह होत असली तरी त्यामागे ह्या सर्व पडद्यामागच्या लोकांची मेहनत देखील असते.

चित्रपटाची शुटींग करताना जेवढा महत्वाचा अभिनेत्याचा अभिनय असतो तेवढ्याच महत्वाच्या इतर गोष्टी देखील असतात.

जसे त्याचे कपडे, मेक-अप आणि त्यासोबतच कुठल्याही सीन शूट करताना प्रॉपर लाईट असणे देखील तेवढंच महत्वाचं असते. जर लाईट पुरेसा नसेल तर सीन दिसायला बरा दिसत नाही.


 

Film-Production-inmarathi
premiumbeat.com

चित्रपटाची शुटींग करताना वापरण्यात येणारे लाईट्स आणि त्याचे टूल्स हे खूप वजनी असतात. तसेच त्यांना डायरेक्ट जसं सांगण्यात येईल तसं सेट करत जावं लागतं. कधी कधी ते लाईट्स आणि इतर टूल्स घेऊन इकडून तिकडे भटकावं देखील लागतं.

ह्या सर्वांना सांभाळायचं काम हे गॅफरचं असते. गॅफर हा कॅमेरामन साठी की-पर्सन असतो.

त्याच्याशिवाय कॅमेरामन काहीही करत नाही. त्याच्यावर सेटवर वापरण्यात येणाऱ्या सर्व लाईट्स सांभाळण्याची जबाबदारी असते. तसेच त्याला इतर टेक्नीकल आणि इलेक्ट्रिक बाबींकडे लक्ष द्यावे लागते.

 

Hetal-Dedhia-inmarathi04
bbcindia

लाईटमन आणि कॅमेरामनचं काम हे खूप मेहनतीचं असतं. ह्यात तुम्हाला त्या मोठ्या वजनी लाईट्स उचलाव्या लागतात. त्यांना नीट सेट करावं लागतं. सर्व टेक्नीकल गोष्टी यायला हव्या असतात. आता जिथे टेक्नीकल हा शब्द आला तिथे पुरुषत्व आलं.

टेक्नीकल काम असो, अंगमेहनतीचं काम असो हे पुरुषचं करणार. असा आपला समज आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात देखील पुरुषांचच वर्चस्व बघायला मिळतं.

पण ह्याचं क्षेत्रात एक अशी स्त्री आहे, जी ही मानसिकता बदलायचा प्रयत्न करत आहे. ती स्त्री म्हणजे बॉलीवूडची पहिली आणि एकमात्र फिमेल गॅफर ‘हेतल देधिया’…

हेतल देधियाने १९ व्या वर्षी जेव्हा ह्या क्षेत्रात आपलं करिअर सुरु केलं, तेव्हाचं तिला कळालं होतं ही ह्या पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात तिला आपले स्थान बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे, सोबतच झगडावे देखील लागणार आहे. आणि त्याची सुरवात तिच्या घरातूनच झाली होती.

 

Hetal-Dedhia-inmarathi
vervemagazine.in

तिचे वडील म्हणजेच मुलचंद देधिया ह्यांनी हे देखील तिच्या ह्या निर्णयाच्या विरोधात होते, जेणेकरून ते स्वतः बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध गॅफर पैकी एक होते.

पण तरी तिने तिची जिद्द सोडली नाही. तिने हेच क्षेत्र निवडलं आणि त्यात पूर्ण मेहनतीने काम करण्यास सुरवात केली. करिअरच्या सुरवातीलाच तिला ह्या पुरुषी मानसिकतेला बळी पडावं लागलं.

कारण ह्या क्षेत्रातील पुरुषांना हे मान्यच नव्हते की, कुठली स्त्री हे काम करू शकते. तिला अनेकदा टोमणे देखील सहन करावे लागले की, “हिच्याकडून काहीही होणार नाही…”

हे काम करताना अतिशय क्रिएटिव्ह असावं लागत. म्हणजे कुठलाही लाईट घेतला आणि कुठेही लावला असं चालत नसतं. त्यासाठी तुम्हाला जरा क्रिएटिव्ह असावं लागतं, कुठली लाईट कुठल्या ठिकाणी कुठल्या अॅन्गलवर सेट करायची हे देखील तुम्हाला कळायला हवं. आणि हे सर्व हेतल करते.

 

Hetal-Dedhia-inmarathi02
fenil95.rssing.com

ती ते भारी लाईट्स स्वतः उचलते पण आणि त्यांना सेट देखील करते. ह्याकरिता नक्कीच खूप परिश्रम घ्यावे लागत असतील. पण हेतल ही खरच खूप साहसी आहे.

तिने हार पत्करली नाही, सर्व कठीण परिस्थितींना सामोरे जाऊन तिने हे साध्य करून दाखवले. म्हणूनच कदाचित ती बॉलीवूडची पहिली स्त्री गॅफर बनू शकली.

 

Hetal-Dedhia-inmarathi01
indianexpress.com

हेतलने आजवर ‘डॉन’, ‘लक बाय चान्स’, ‘गुजारीश’ यांसारख्या हिंदी तर ‘MI4: Ghost Protocol’ आणि ‘Eat Pray Love’ ह्या हॉलीवूड चित्रपटांत देखील काम केलेलं आहे.

पण सध्या ती तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट्स वर जास्त लक्ष देते, कारण तिच्या मते, तिथे तिला तिच्या कामाला आणखी चांगल्याप्रकारे कसं करता येईल हे शिकायला मिळते.

बीबीसीला दिलेल्या एक मुलाखतीत हेतल सांगते की,

स्त्रियांना ह्या क्षेत्रात यायला हवे. कारण स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत अधिक क्रिएटिव्ह असतात. त्यामुळे त्या ह्या क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. आणि ह्यामुळे समाजातील लोकांमध्ये स्त्रीबाबत असलेली मानसिकता देखील बदलण्यास मदत होईल.

 

Hetal-Dedhia-inmarathi06
bbcindia

नक्कीच हेतल जे काम करते आहे ते काही सोप्पे नाही, त्यासाठी अतिशय मेहनत आणि जिद्दीची गरज असते. आज पुरुषी वर्चस्व असलेल्या अश्या क्षेत्रात काम करणे म्हणजे काही खायचे काम नाही, तर त्या क्षेत्रात आपलं एक वेगळं नाव करून हेतलने यशाचे शिखर गाठले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *