' अटलजींच्या जीवनावर येऊ घातलेला “हा” चित्रपटातून काही अज्ञात अध्याय उलगडेल का? – InMarathi

अटलजींच्या जीवनावर येऊ घातलेला “हा” चित्रपटातून काही अज्ञात अध्याय उलगडेल का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१६ ऑगस्ट २०१८ हा दिवस भारतीय राजकारणासाठी एक अतिशय दुखद असा दिवस ठरला. कारण ह्या दिवशी भारतीय राजकारणाचे ‘भीष्म पितामह’ मानले जाणारे अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी जगाचा निरोप घेतला.

ह्या बातमीने राजकारणच नाही तर संपूर्ण देशच हादरला. भारतीय राजकारणाला एक वळण, एक वेगळी दिशा अटलजींनी दिली.

जेव्हा भविष्यात भारताला घडवणाऱ्या महान नेत्यांचं नाव घेतलं जाईल, त्यात अटलजींचं नाव नक्कीच असेल यात तिळमात्र शंका नाही.

अटलजी एक भारतरत्न, राजकीय धुरंदर, उत्कृष्ट संसदपटू तर होतेच पण एक प्रतिभाशाली कवी आणि प्रेमळ स्वभाव असलेले दिव्य व्यक्तीमत्व होते. त्यांचा जाण्याने एक न भरून निघणारे नुकसान देशाला झाले आहे.

एक कुशाग्र विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, एक स्वातंत्र्य सेनानी ते एक अजरामर कारकीर्द असलेले प्रधानमंत्री, अटलजींचा प्रवास हा एक विविध रंगी व दिव्य प्रेरणेने भरलेला आहे.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi03
latestly.com

९३ वर्षांच्या वयात दीर्घ आजाराने अटल बिहारी वाजपेयी ह्याचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ज्यानंतर संपूर्ण देशात शोकाकुल वातावरण होते. त्याचे कारणही तसेच होते, अटलजी एक असे व्यक्तिमत्व होते जे एवढे वर्ष राजकारणात असूनही त्यांचे कधीही कोणासोबत वयक्तिक मतभेद झाले नाही.

ते एक उत्कृष्ट राजकारणी तर होतेच सोबतच ते एक अतिशय उत्कृष्ट कवी देखील होते.

त्यांनी नेहमीच देशाच्या विकासाचा विचार केला. ज्यांनी एका समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न सर्वांना दाखवले, त्या मार्गावर चालत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेच स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत आहेत.

अटल बिहारी वाजपेयी ह्यांना देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातील लोकांचं प्रेम आणि समर्थन मिळाले. त्यांच्या अंतयात्रेत देखील लोकांचं त्यांच्यावरील हे प्रेम बघायला मिळालं. जिथे देशाच्या अनेक ठिकाणांहून आलेल्या लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली.

सध्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याची परवानगी घेण्यासाठी निर्देशक मयंक ह्यांनी नुकतीच अटलजींची भाची माला तिवारी ह्यांची भेट घेतली.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi04
tweeter

ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर रणजीत शर्मा हे अटलजींच्या जीवनावर आधारित ह्या जीवनपटाबाबत बोलताना सांगतात की, ते स्वतः वाजपेयी ह्यांचे प्रशंसक राहिले आहेत. अटलजींच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्याचं स्वप्न होतं. आणि आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.

ह्या चित्रपटाचे नाव ‘युगपुरुष अटल’ असे ठेवण्यात आले आहे.

ह्या चित्रपटाचे संगीत हे संगीतकार बप्पी लहरी देणार आहेत. हा जीवनपट अटलजींच्या जीवनातील काही खऱ्या घटनांवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या बालपणापासून ते राजकारण ह्या सर्वांपर्यंतचा प्रवास दाखविण्यात येईल.

हा चित्रपट अटलजींच्या ९४ व्या वाढदिवसाला म्हणजेच २५ डिसेंबर २०१८ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi05
tweeter

अनेक कलाकारांनी ह्यामध्ये अटलजींची भूमिका निभावण्याची इच्छा प्रकट केली अशी माहिती समोर येते आहे. ह्यापैकीच एक शत्रुघ्न सिन्हा हे देखील आहे ज्यांनी सांगितले की, त्यांना अटलजींची भूमिका साकारण्यात खूप आनंद होईल.

तर दुसरीकडे अक्षय कुमार आणि परेश रावल ह्यांनी देखील अटलजींची भूमिका साकारण्याची इच्छा दर्शविली आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन म्हणजे नाट्यपूर्ण घडामोडींचा भरमार आहे.

पोखरणच्या अणुचाचणी पासून ते अवघ्या तेरा दिवसात पडलेल्या सरकारपर्यंत.. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग हे काही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाहीत. त्यांचे अनेक किस्से ऐकताना अगदी राजकारणात रस नसलेला सामान्य माणूसही मंत्रमुग्ध होऊन जातो.

त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर हा येणारा चित्रपट म्हणजे काही अपेक्षित आणि काही बऱ्याचश्या अनपेक्षित घटनांची दृकश्राव्य उजळणी ठरणार आहे.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi06
samajalive.in

अटलजी हे स्वतः चित्रपटांचे खूप मोठे चाहते होते. ते एक असे व्यक्तिमत्व होते जे निवडणूक हरल्यावर देखील चित्रपट बघायला जायचे. ९ वर्ष आजारात असलेल्या अटल बिहारी वाजपेयी ह्यांना जुने चित्रपट खूप आवडायचे.

ते नेहमीच टीव्हीवर येणारे जुने चित्रपट बघायचे. अटलजींनी हेमा मालिनी ह्यांचा ‘सीता और गीता’ हा चित्रपट २५ वेळा बघितला.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi07
indianexpress.com

अटलजी हे केवळ हिंदीच नाही तर हॉलीवूड चित्रपट देखील बघायचे. ‘द ब्रिज ऑन द रिवर क्वाई’, ‘बॉर्न फ्री’ आणि ‘गांधी’ हे त्यांचे आवडते हॉलीवूड चित्रपट होते.

तसेच त्यांना लता मंगेशकर, मुकेश आणि मोहम्मद रफी ह्यांचे गाणे देखील फार आवडायचे.

चरित्रात्मक चित्रपट भारतीय प्रेक्षकांना नवीन नाहीत. या आधीही अनेक लोकप्रिय व्यक्तिमत्वांचे चरित्र उलगडणारे अनेक चित्रपट आपण पाहिले. त्यांना प्रेक्षकातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

याचे कारण म्हणजे त्या व्यक्तीची लोकप्रियता. आणि अटल बिहारी वाजपेयी या व्यक्तीवर भारतातील लाखो लोकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे हा चित्रपटही तितकाच लोकप्रिय होनात यार शंका नाही.

त्यांच्या प्रत्येक चाहत्याला त्यांच्या जीवनावर आधारित ह्या बायोपिकची खूप आतुरतेने प्रतीक्षा असणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?