भारतीय हवाई दलाच्या शूरांनी ८ वेळा ज्या कारणामुळे प्राण गमावलेत ते आपल्यासाठी लज्जास्पद आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

‘भारत’ लोकशाही पद्धतीने चालणारा सर्वात मोठा देश, सारे जहान से अच्छा हिंदुस्तान हमारा, येथे देशाचा विकास व्हावा ह्या उद्देशाने देशातली जनता आपले विश्वासू प्रतिनिधी निवडून देते पुढे हे प्रतिनिधी जनतेच्या विश्वासाचं काय करतात हे सर्वश्रुत आहेच.

प्रत्येक विकासकार्यात विलंब, वाद, आरोप-प्रत्यारोप, यथावकाश उघडकीस येणारे संबंधीत विकासकार्यातले घोटाळे हे जणू समीकरणच बनत चालले आहे.

थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती सर्वत्र पहायला मिळते. अगदी आपल्या देशाची सुरक्षा व्यवस्थासुद्धा ह्याला अपवाद नाही. त्यातही सरळ, साधा, पारदर्शी, सैनिकांची सुरक्षा आणि देशाचे हित पाहून केलेला व्यवहार कुठेही दिसत नाही.

आणि ह्या अशा हलगर्जीपणामुले कित्येक सैनिकांचे हकनाक बळी जातात. इतकं की, आपल्या देशाच्या लष्करी जेट्सना “फ्लायिंग कॉफिन” म्हंटले जाते कारण ह्या जेट विमानाच्या उड्डाणाच्या तपासणी दरम्यान दरवेळी मोठ्या प्रमाणावर सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

 

mig 21-inmarathi
youtube.com

नुकताच बेंगलुरू येथे १ फेब्रुवारी २०१९ शुक्रवारी सकाळी येमलुर येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या रनवेवर मिराज २००० ला अपघात झाला. त्यात वायुसेनेचे दोन अधिकारी स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल आणि स्क्वाड्रन लीडर सिद्धार्थ नेगी जागीच ठार झाले.

दुर्दैवाने ही अशी पहिलीच घटना नाहीये. ह्यापूर्वीही अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत ज्यात आपल्या वायुसेनेच्या जवानांनी आपले प्राण गमावले आहेत.

आज जाणून घेऊया भूतकाळातल्या काही अशा घटना ज्यात आपल्या वीर सैनिकांचे नाहक बळी गेले.

१)  एमआयजी -21 आयएएफ जेट

 

AFS-800c-inmarathi
FSPilotShop.com

२२ मे २००७ रोजी जम्मू-काश्मीरमध्ये एमआयजी -21 आयएएफ जेट ला अपघात झाला. त्यातले दोन पायलट सापडले नाहीत. रियासी जिल्ह्यातील बसंतगड-महाहर पर्वत येथे हा अपघात झाला.

उध्दमपूर एअरवेजमधून ह्या लढाऊ जेटच्या ट्रेनरने व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेले असूनही काही कारणास्तव त्यांचा एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) वाल्यांशी संपर्क तुटला आणि नंतर त्या जेट ला अपघात झाला.

२) मिग २१

 

mig-inmarathi
india.com

१५ जुलै २०१३  रोजी राजस्थानच्या बार्मेर जिल्ह्यात लँडिंग करत असताना मिग -21 बायसन क्रॅश झाले आणि पायलट जागीच ठार झाला.

हा अपघात उत्तरलाई एअरबेसमध्ये झाला आणि पायलटचा खूप जास्त प्रमाणात जखमा झाल्यामुळे मृत्यू झाला. आसपास च्या परिसरात मात्र कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही.

२७ मे २०१४ रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मिग -21 जेट क्रॅश झाले आणि त्यात पायलटचा मृत्यू झाला.

ह्या विमानाचे पायलट होते ३२ वर्षांचे स्क्वाड्रन लीडर रघुवंशी ज्यांनी सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी विमान निर्जन स्थळी नेण्याच्या प्रयत्नात होते आणि ह्या दरम्यान त्यांनी आपला जीव गमावला.

३) मिग -21 लष्करी जेट

 

plane-inmarathi
YouTube.com

२४ ऑगस्ट २०१५ रोजी जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये एक मिग -21 लष्करी जेट क्रॅश झाले. सुदैवाने त्यात पायलटचे प्राण वाचले.

हे विमान आपल्या रोजच्या ट्रेनिंग साठी श्रीनगर एअरफील्डवरून उडाले होतेसुदैवाने पायलटला त्या विमानातून बाहेर काढण्यात यश आले आणि त्याचा जीव वाचला शिवाय सामान्य नागरिकांचीही जीवितहानी वगैरे झाली नाही.

४) मिग -27 आयएएफ

 

iafmig-inmarathi
idrw.org

मिग -27 आयएएफ विमान ८ मे २०१५ रोजी पश्चिम बंगालच्या तातीपारा भागात क्रॅशझाले. पायलटचे प्राण वाचले परंतु झाला पण दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

हे विमान उड्डाण  घेतल्याच्या दहा मिनिटांत क्रॅश झाले होते.

५) मिग -21

 

mig-25-india-marathipizza00
slideshare.net

३१ जानेवारी, २०१५ रोजी जामनगर शहराजवळ एका मिग -21 विमानाला अपघात झाला.सुदैवाने पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हे विमानमुख्य शहराजवळील मॅंग्रॉव जंगलात क्रश झाले मात्र तेथेकोणालाही अपघात झाला नाही.

६. मिग -21

 

mig-fighter-jet-marathipizza
india.com

२००२ मध्ये जलंधरमध्ये मिग -21 अपघात झाला ज्यात ८ जण  ठार आणि १७ जणजखमी झाले. ३ मे २००२ रोजी, भारतीय वायुसेनेचे मिग -21 पंजाबच्या जलंधर मध्येकार्यालयाच्या इमारतीत क्रॅश झाले.

पायलटला बाहेर पडण्यात यश आले आणि तो वाचला पण दुर्दैवाने त्यात इतर ८जण ठार आणि १७  जणजखमी झाले.

७. मिग -7

 

mig-25-marathipizza
bbc.com

२०१८ मध्ये जोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे  मिग -7 क्रॅश झाले. आपल्या नेहमीच्या मिशनच्या दरम्यान आयएएफ मिग -27  जोधपूरच्या बनड परिसरात अपघातग्रस्त झाले.

ह्यावेळी पायलटने धैर्य राखून विमान निर्जन वस्तीत नेल्याने जीवितहानी झाली नाही शिवाय पायलटलाही योग्य वेळी विमानाच्या बाहेर पाडण्यात यश आले आणि त्याचा जीव वाचला

८) मिग -21 लष्करी जेट

 

mig21-inmarathi
indianexpress.com

हिमाचल प्रदेशातील कांगरा येथे एक भारतीय वायुसेनाचा मिग -21 लष्करी जेट क्रॅश झाला. ज्यात पायलटचा जागीच मृत्यू झाला.

१८ जुलै २०१८ रोजी पंजाबमधील पठाणकोटएयरबेस वरून उड्डाण घेतलेल्या विमानाला हिमाचल प्रदेशातील कांग्राच्या जवाली उपविभागामध्ये पट्टा जट्टियान येथे अपघात झाला. सुदैवाने कोण्याही नागरिकाचा त्यात बळी गेला नाही परंतु पायलट जागीच ठार झाला.

आता प्रश्न असा आहे की, या अपघातांना जबाबदार कोण ? माणूस की यंत्र ? तर, ह्यात विमानांच्या तांत्रिक त्रुटी, विमानाच्या अकार्यक्षम सिस्टम पासून ते संरक्षण खात्याने ही विमाने खरेदी करताना केलेली दिरंगाई किंवा आणखी काही.

अशा अनेक कारणांचा समावेश आहे. म्हणजे बघा, ज्यांच्या भरवशावर आपण आपले आयुष्य आपल्या देशात बेफिकीरपणे जगतो त्या देशाच्या संरक्षणासाठी वापरत येणाऱ्या ह्या विमानात स्वतः देशाचे रक्षणकर्तेच सुरक्षित नाहीत हे वास्तव किती भयंकर आहे.

बरेचदा निट प्रशिक्षण घेऊनही पायलट विनाकारण आपले जीव गमावत आहेत त्यामुळे अशी लढाऊ विमाने खरेदी करण्याचे निकष नेमके काय असावेत असा प्रश्न पडतो.

नेमकं काय चुकतंय ह्याचा शोध घेणं अपरिहार्य आहे. मध्यंतरी, आपल्या लढाऊ विमानांच्या खरेदीशी संबंधीत काही घोटाळे गेल्या काही काळात उजेडात आले आहेत जे अत्यंत लाजिरवाणे आहे.

पैशांसाठी आपल्या सैनिकांचा जीव धोक्यात घालणे हा प्रकार लांच्छनास्पद आहे. इथून पुढे कुठल्याही प्रकारचे हितसंबंध मध्ये न आणता निव्वळ आणि निव्वळ देशाची आणि सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे शस्त्र आणि विमानांचे व्यवहार पारदर्शकतेने आणि योग्य त्या निकषांवर पार पडणे देशाच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक झाले आहे कारण कुठल्याही कारणासाठी आपल्या जवानांचे बहुमुल्य जीवन असे व्यर्थ दवडणे आपल्यला जराही परवडणारे नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?