“फेरारी” ने आपल्या कर्मचाऱ्यांवर एक फारच विचित्र बंधन घातलंय

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

१९३९ मध्ये स्थापन झालेल्या ‘फेरारी’ कंपनीला कधीही वाटले नव्हते की भविष्यात जगातील सर्वात मोठा कार ब्रँड म्हणून ते ओळखले जातील. आज जगतील अतिशय महागड्या गाड्यांमध्ये फेरारीचा समावेश होतो. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची फेरारी कार, गर्भश्रीमंताला मात्र त्याने भरलेल्या प्रत्येक पैश्याची किंमत वसूल करून देते. त्याचमुळे आजही फेरारी हा ब्रँड टिकून आहे आणि श्रीमंतांकडून त्याला मागणी आहे.

 

ferari-marathipizza01
(Ferrari 250 GTO) carthrottle.com

२०१३ च्या मे महिन्यात Ferrari 250 GTO या मॉडेलची फेरारी कार विकली गेली आणि इतिहास घडला. आजवरची आगत सर्वात महागडी खरेदी केलेली कार म्हणून या फेरारीचे नाव नोंदवले गेले. अमेरिकेच्या क्रेग मॅकेव या व्यावसायिकाने तब्बल ३५ मिलियन यु.एस. डॉलर ओतून ही कार आपल्या नावावर करून घेतली आजही खास ही कार पाहण्यासाठी लोक त्याच्या घराला भेट देतात असे ऐकिवात आहे.


अश्या या करोडोंच्या कार्स विकणाऱ्या फेरारी कंपनीबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? अहो फेरारी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कोणीही कर्मचारी स्वत: फेरारी कार खरेदी करू शकत नाही.

विचित्र वाटतं ना? पण खरंय.

चला जाणून घेऊया काय आहे या मागचं कारण.

ज्या प्रमाणे इतर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना स्पेशल ट्रिटमेंट देतात, त्या प्रमाणे फेरारी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष असं काही करत नाही. आपल्याच कर्मचाऱ्यांना कार न विकण्यामागचं कारण सांगताना फेरारीचे चीफ मार्केटिंग आणि कमर्शियल ऑफिसर इन्रीको गॅलेरिया म्हणतात की,

आमच्या कंपनीचं कार्स प्रोडक्शन हे मर्यादित आहे आणि क्लायंट्सना त्यांची कार मिळेपर्यंत खूप काळ वाट पहावी लागते. अश्या वेळेस आमच्याच कंपनीमधील कर्मचाऱ्याला मग तो कोणीही का असेना त्याला कार उपलब्ध करून देणे हे आमच्या कंपनीच्या इमेज साठी योग्य नाही, यामुळे क्लायंट्सला त्याची फसवणूक केली जात आहे असं वाटू शकतं.

सध्या कंपनीशी संबंधित केवळ दोनच कर्मचाऱ्यांना फेरारी कार्स उपलब्ध करून देण्यात येतात आणि त्या दोन व्यक्ती आहेत फेरारीचे फॉर्म्युला वन ड्रायव्हर्स – सेबेस्टियन व्हेटेल आणि किमी रेक्कोनेन. पण तरीही ह्या दोघांसाठी काही विशेष सूट दिली जात नाही.


 

ferari-marathipizza01
topyaps.com

तुम्हाला हे ऐकून देखील आश्चर्य वाटेल की, फेरारी कंपनी असंच कोणालाही आपली कार विकत नाही.

ज्या व्यक्तीने कारची मागणी केली आहे, तिची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाते आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला कार द्यायची की नाही त्याचा निर्णय घेतला जातो. फेरारी कंपनी वर्षाला केवळ ८००० कार्स तयार करते. त्यापैकी काही नवीनतम सर्वोत्तम कार्स या त्याच व्यक्तींना दिल्या जातात, ज्यांना फेरारी कंपनी स्वत: खरेदीचे आमंत्रण पाठवते.

 

ferari-marathipizza03
(LaFerrari Aperta) bauercdn.com

मध्यंतरी LaFerrari Aperta हि लेटेस्ट फेरारी कार कंपनीने सादर केली आणि ती कार खरेदी करू शकणाऱ्या जगभरातील २०० श्रीमंतांची यादी तयार केली, ज्यापैकी सर्वानीच ती कार खरेदी करण्यात रस दाखवला. तुम्हाला माहित आहे का त्या कारची किंमत काय होती?- तब्बल ९ करोड रुपये!


हे सर्व पाहून तुमच्याही मनात आलेच असेल की – सगळा पैश्याचा खेळ आहे बाबा….पैश्याचा!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?