दिवाळखोर ते अरबोपती – वाचा “मार्व्हल” स्टुडियोचा Marvellous प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आज मार्व्हल संपूर्ण जगात बॉक्स ऑफिस कलेक्शन चा राजा समजला जातो.’इनफिनिटी वॉर’ प्रदर्शित होण्यापुर्वी Marvel Cinematic Universe जगातल्या बॉक्स ऑफिस वर १२ बिलियन डॉलर च्या कमाई सह सर्वोच्च स्थानावर आहे.

मात्र काही दशकांपूर्वी परिस्थिती पूर्णतः उलट होती.

१९९६ च्या जवळपास मार्व्हल ने दिवाळखोरी घोषित केली होती. कंपनी चे पैसे संपत आले होते. एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं.

कधी काळी ज्या कंपनीने तयार केलेले काल्पनिक पात्रं हे सबंध जगात कौतुकाने ओळखले जायचे. त्या कंपनीचं भविष्य मात्र धूसर झालं होतं.

 

marvel studios inmarathi
BGR.com

 

मार्व्हल चा पहिला अत्याधुनिक सिनेमा Blade प्रदर्शित होण्याच्या दोन वर्षांपूर्वीच म्हणजे १९९६ ला कंपनी दिवाळखोरीत आली होती.जेव्हा त्यांचे बरेच प्रकल्प फसले मात्र Blade सिनेमा गाजला.

Blade हा एक महत्वाकांक्षी परवाना कराराचा भाग होता ज्यात मार्व्हल च्या X-Men, Spider- Man सारख्या ‘पात्रांचे’ चित्रपट बनवण्याचे हक्क 20th Century Fox आणि Sony Pictures सारख्या स्टुडिओ ना अत्यंत कमी किंमतीत विकण्यात आले होते.

 

x men spider man inmarathi
screencrush

 

मार्व्हल ने त्यांच्या गाजलेल्या पात्रांचे चित्रपट हक्कांचा लिलाव केला होता.या लिलावात Spider-Man सोनी कडे गेला, Hulk पॅरामाऊंट तर Daredevil , Fantastic Four आणि X-Men चे हक्क 21st Century Fox ने विकत घेतले.

अस म्हणतात की, मार्व्हल ने तर जवळपास सर्वच काल्पनिक पात्रांचे चित्रपट हक्क २५ मिलियन अमेरिकन डॉलर ला विकण्याची इच्छा १९९८ मध्ये दाखवली होती.

सोनी ने मार्व्हल च्या या प्रस्तावाला फारसा प्रतिसाद दिला नाही कारण त्यांचा कल हा केवळ Spider-Man कडेच होता. Blade ने अमेरिकेत बॉक्स ऑफिस वर ७० दशलक्ष डॉलर चा गल्ला जमवला. पण आश्चर्याची गोष्ट ही की मार्व्हल ला यातील केवळ २५००० डॉलर मिळाले!

 

hulk and spider man inmarathi
DKODING

 

Flat-Fees तडजोड करारानुसार X-Men च्या यशातून मार्व्हल ला काहीच कमाई होऊ शकली नाही.

जर मार्व्हल चा करार अपयशी ठरला असता तर ते त्यांच्या सर्वच पात्रांचे हक्क गमावून बसले असते.ही सगळी काल्पनिक पात्र ,त्यांच्या कथा बँकेच्या ताब्यात गेल्या असत्या आणि Marvel Cinematic Universe अक्षरशः संपलं असतं!

२००३ मधे टॅलेंट एजंट डेव्हिड मेसेल मार्व्हल च्या आयसॅक पर्लमटर यांच्या कडे एक प्रस्ताव घेऊन आले. प्रस्ताव होता मार्व्हल च्या स्वतःच्या नावावर एक चित्रपट प्रदर्शित करण्याचा!

मार्व्हल ने वॉल स्ट्रीट च्या Merill Lynch सोबत एक करार केला. ह्या कराराच्या अटी बऱ्याच जोखमीच्या होत्या. जर Iron-Man चित्रपट पडला तर मार्व्हल चे सर्व काल्पनिक पात्र हे बँकेच्या ताब्यात येतील.

 

iron man inmarathi
marvel

 

ह्या सर्व पात्रांचे हक्क बँकेच्या स्वाधीन होतील. म्हणजे संपूर्ण Avengers Superstar टीमच!

या सिनेमाने अमेरिकेत ३१८.४ मिलियन(दशलक्ष) डॉलर तर बाकी जगभरात ५८५.२ मिलियन डॉलर एवढा बक्कळ पैसा कमावला.

एक कॉमिक पुस्तकं आणि खेळणी बनवणारी कंपनी चं रूपांतरण एका जबरदस्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा स्टुडिओ मध्ये झालं होतं.

 

x men spider man inmarathi
noel mellar

 

Iron Man च्या प्रचंड यशाने डिस्ने चं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी २००९ मध्ये मार्व्हल ला ४ बिलियन(अब्ज) अमेरिकेन डॉलर ला खरेदी केलं!

ह्या संपादनामुळे मार्व्हल ला एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळालं ज्या माध्यमातून कॉमिक्स कथांचं प्रेक्षणीय आणि अधिकाधिक सिनेकलाकार असलेल्या चित्रपटांत रूपांतरण करणं अधिक सुलभ झालं.

सुरवातीला २००५ ला प्रदर्शनाच्या आणि निर्मितीच्या फारश्या पायाभूत सुविधा नसताना सुद्धा मार्व्हल ने ३ चित्रपट दिले ते म्हणजे Iron Man चे २ भाग आणि The Incredible Hulk ! ह्या तीन चित्रपटांनी जगभरात १.५ बिलियन डॉलर ची कमाई केली.

रॉबर्ट डाऊने ज्युनियर यांच्या Iron Man-2 चित्रपट हा पहिल्या भागाच्या यशावर उभा राहिला होता.या फिल्म ने अमेरिकेत ३१२ मिलियन डॉलर चा गल्ला कमावला.

Captain America- First Avenger आणि Thor च्या यशानंतर आता ह्या सर्व Super Hero ना एकत्रित करण्याची वेळ आली होती.

 

thor inmarathi
comic book

 

मार्व्हल ने ‘Avengers‘ २०१२ ला प्रदर्शित केला. ह्या चित्रपटाने सुरवातीलाच २०७ दशलक्ष अमेरिकन डॉलर ची कमाई केली सुरवातीलाच इतकी कमाई करणारा चित्रविश्वातला हा पहिलाच सिनेमा ठरला होता!

Avengers ने जवळपास २२ आठवडे अमेरिकेतल्या थिएटर मधे मुक्काम ठोकला आणि ६३२ मिलियन डॉलर चा गल्ला गोळा केला.

अगोदरच्या चित्रपटातील महत्वाच्या पात्रांना घेऊन बनवलेला ‘The Avengers‘ इतका यशस्वी होऊ शकेल याची कोणी स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती केली!

 

avengers 2012 inmarathi
wallpaperaccess

 

Iron Man-3 ने तर जगभरात १ बिलियन डॉलर ची कमाई करून The Avengers च्या यशालाही मागे टाकलं!

मार्व्हल ने नंतर Captain America चा सिक्वेल प्रदर्शित केला या फिल्म ने सुद्धा ७५० दशलक्ष अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त कमाई केली. Thor the dark world त्याच्या पहिल्या भागापेक्षा जास्त कमाई करून गेला.

मार्व्हल ने आतापर्यंत अकल्पित यश मिळवलं होत. Guardians of Galaxy च्या माध्यमातून ताऱ्यांवरील super heroes ची कहाणी पडद्यावर आणण्याचा प्रयोग केला.

आश्चर्य म्हणजे हा सिनेमा सुद्धा लोकप्रिय ठरला व जगभरात ७७३ दशलक्ष अमेरिकन डॉलर चा गल्ला जमावला.

 

guardians of galaxy inmarathi
Netflix Nederlands

 

२०१५ च्या दरम्यान मार्व्हल च्या संपूर्ण कमाईचे आकडे ८.६ बिलियन डॉलर इतके होते. ह्या कमाईत वाटा होता तो “Age of ultron” आणि सलग यशस्वी ठरलेले चित्रपट Ant Man, Civil War, Doctor Strange, Spider Man homecoming !

२०१७ ला प्रदर्शित झालेल्या “Thor:Ragnarok ” सिनेमा ने ८५३.२ दशलक्ष डॉलर ची कमाई केली.

२०१८ ला अजून एक धाडसी प्रयोग केला तो म्हणजे Iron Man पासून ते Guardians of Galaxy मधल्या सर्वच महत्वाच्या पात्रांना एकत्र करून Avengers मधला तिसरा भाग “Avengers:Infinity War” पडद्यावर आणला गेला.

एप्रिल २०१८ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि ४८ दिवसांत जगातल्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे २ बिलियन(अब्ज) डॉलर च्या पलीकडे गेले होते!

 

infinity war inmarathi
forbes

 

आज मार्व्हलचा एकट्याचा महसूल हा डिस्ने ने खरेदी केलेल्या किंमतीच्या दुप्पट झाला आहे. २०१९ ला आलेल्या Avengers: Endgame ने जगभरात २.८ बिलियन डॉलर ची घसघशीत कमाई केली!

त्या पूर्वी मार्च २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या Captain Marvel सुद्धा हिट ठरला आणि त्याची जगभरातील कमाई होती १.१३ बिलियन डॉलर!

एप्रिल २०१९ ला प्रदर्शित झालेल्या Avengers:Endgame पाहण्यापूर्वी २००८ पासून प्रदर्शित झालेल्या Iron Man पासून सर्व खाली दिलेले सिनेमे ,त्यांच्या कथा माहीत असणे आवश्यक ठरतं.

 

endgame inmarathi
disney plus

 

१)Iron Man (2008)
२)The Incredible Hulk (2008)
३)Iron Man-2 (2010)
४)Thor (2010)
५)Captain America: First Avenger (2011)
६)The Avengers (2012)
७)Iron Man 3. (2013)
८)Thor:the dark world (2013)
९)Captain America: Winter Soldier (2014)
१0) Guardian of galaxy (2014)
११) Avengers: Age of ultron (2015)
१२) Ant man (2015)

 

captain marvel inmarathi
YouTube

१३) Captain America: Civil war (2016)
१४) Doctor strange (2016)
१५)Guardian of galaxy 2 (2017)
१६) Spider man home coming
१७) Thor Ragnarok (2017)
१८) Black panther (2018)
१९) Avengers: Infinity war (2018)
२०) Captain Marvel (2019)
२१) Avengers 4 (2019)

२०२० किंवा पुढील वर्षी मार्व्हल चे प्रदर्शित होणारे काही चित्रपट असतील,

१)Black Widow
२)The Eternals
३)Doctor Strange in Multiverse of Madness

 

marvel upcoming inmarathi
definition.co.uk

 

मार्व्हल च्या कथा ह्या उत्कंठावर्धक असतात आणि त्या भविष्यात सुद्धा लोकांना चित्रपटगृहात खिळवून ठेवण्यात यशस्वी होतीलच!

पण Marvel Cinematic Universe Film ची ही राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणारी कहाणी सुद्धा प्रेरणादायी आहेच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?