या आहेत बॉलीवूड सेलिब्रिटींच्या कर्तबगार बायका!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. पण यशस्वी पुरुषांच्या पत्नी ही यशस्वी होतात. तसंच त्या स्वतःच्या पतीच्या नावाचा वापर करत नाहीत. स्वतः वेगळा व्यवसाय करतात आणि त्यात आपली छाप पाडतात. त्या फक्त पैशासाठी या गोष्टी करतात असं नाही. तर त्यांना काहीतरी करण्याची हौस असते. त्यांनाही त्यांची स्वप्न असतात म्हणून त्या त्यांचे छंद जोपासतात त्यांना हवा तो व्यवसाय करतात. यातल्या अनेक कर्तबगार महिलांना त्यांच्या पतीने त्यांचे कर्तुत्व बघून तर नाही ना निवडले इतक्या त्या त्यांच्या क्षेत्रात नावाजलेल्या आहेत.

ट्विंकल खन्ना : 

 

Famous persons Wives - InMarathi 11
ibtimes.co.in

अक्षय कुमारची पत्नी होण्याआधीही ट्विंकल खन्ना ही एक प्रसिद्ध अभिनेत्री तर होतीच, त्याशिवाय ती इंग्रजी वृत्तपत्रात स्तंभ लेखिका, लेखिका म्हणून कार्यरत आहेच. तसंच ट्विंकल अक्षयच्या दोन मुलांची आई देखील आहे. अलीकडे अटक झालेल्या रामरहीमविरोधात तीने ट्विट केले होते. त्यावरून तिला राम रहीमच्या भक्तांनी धमकावले देखील होते.

मलायका अरोरा :

 

Famous persons Wives - InMarathi 12
adgully.com

अरबाझ खान पासून विभक्त झाल्यानंतरही फिल्मइंडस्ट्रीमध्ये मलायकाचं नाव चर्चेत असतं. ती एक उत्कृष्ट डान्सर, अभिनेत्री तर आहेच. तीने तिच्या करिअरची सुरवात व्हिजे म्हणून केली होती. आज मलायकाला १५ वर्षांचा मुलगा आहे. तिच्याकडे बघून विश्वास बसतो का ?

श्रीदेवी :

 

Famous persons Wives - InMarathi.com 13
hindustantimes.com

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची पत्नी होण्याआधी ही श्रीदेवी या सिनेअभिनेत्री होत्या, त्या आजही सिनेअभिनेत्री आहेत. बोनी कपूरशी लग्नहोण्यापूर्वी त्या अभिनेता मिथून चक्रवर्ती यांच्या पत्नी होत्या. काही वर्षांपूर्वी आलेल्या इंग्लीश विंग्लीश चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय भुमिका केली होती.

 

गौरी खान :

 

Famous persons Wives - InMarathi.com 1
wittyfeed.com

गौरी खान ही किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या तीन मुलांची आई आहे. तसेच तिचा स्वतःचा इंटिरिअर डिझाईनचा बिझनेस असून ती शाहरूखच्या रेड चिली प्रोडक्शनची प्रोड्यूसर देखील आहे.

 

मेहेर जेसिया :

 

Famous persons Wives - InMarathi 13
en.wikipedia.org

अर्जून रामपाल याच्यासोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी मेहेरची आपली स्वतःची ओळख आहे. ती एक यशस्वी सुपर मॉडेल तर आहेच, त्याशिवाय तिने १९८० साली फेमिना मिस इंडिया किताबही जिंकला होता. सध्या मेहर दोन मुलींची आई आहे.

किरण राव :

 

Famous persons Wives - InMarathi 14
bollywoodhungama.com

मिस्टर परफेक्शनिस्ट ची पत्नी किरण राव ही स्वतः चित्रपट दिग्दर्शक आहे. धोबीघाट हा तीने दिग्दर्शीत केलेला पहिला चित्रपट. एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच किरण आणि आमीरची ओळख झाली. पुढे दोघे विवाह बंधनात अडकले. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.

सुझॅन खान :

 

Zeenews.com

हृतिक रोशन ची एकेकाळी पत्नी असलेली सुझॅन  स्वतःचा इंटिरीअर डिझायनींगचा व्यवसाय करते. तिच्या कंपनीचे नाव आहे चारकोल प्रोजेक्ट जो सध्या व्यवस्थित सुरू आहे. चित्रपट आणि फेम यांपासून ती जरा दूरच असते.

तर अश्या या सेलिब्रिटींच्या बायका केवळ “Celebrity Wives” म्हणूनच नाही ओळखल्या जात तर त्यांची स्वतःची स्वतंत्र अशी एक ओळख आहे. जी त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने कमावली आहे. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?