भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि स्वातंत्र्य सेनानींबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आज १५ ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिवस. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आज आपण भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आपल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी कित्येक महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रजांकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना प्रत्येकालाच काही न काही गमवावे लागले. अश्या या थोर माणसांच्या बलिदानाला आठवून आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, कारण ते नसते तर आजही आपण इंग्रजांच्या गुलामीमध्ये असतो. आज आम्ही तुम्हाला याच स्वातंत्र्य दिनाबद्दल काही अश्या गोष्टी सांगणार आहोत, ज्या प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचे आहे. चला मग जाणून घेऊया की, या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत…..

१) १५ ऑगस्ट १९४७ ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रगीत अस्तित्वात नव्हते. जरी जन गण मन हे बंगालीमध्ये १९११ मधेच रचले गेले होते, तरी सुद्धा १९५० पर्यंत त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळालेली नव्हती.

२) माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट या तारखेची निवड केली, कारण याचदिवशी दोन वर्षापूर्वी नॉर्थ कोरिया, साउथ कोरिया, ब्रह्मदेश आणि प्रजासत्ताक काँगो यांच्या सहयोगी सैन्यासमोर जपानने शरणागती पत्करली होती. म्हणून या सर्व देशांच्या बरोबर भारताचा स्वातंत्र्य दिन असतो.

३) भारताच्या स्वातंत्र्यानंतर, पोर्तुगालने आपल्या संविधानामध्ये सुधारणा करून गोवा हे पोर्तुगीज राज्य म्हणून घोषित केले. १९ डिसेंबर १९६१ मध्ये भारतीय सैन्याने गोव्यावर आक्रमण केले आणि गोव्याला भारतात विलीन केले.

४) भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ५६२ संस्थाने भारतात सामील झाली. त्यापैकी ५६० संस्थाने भारतात सहज विलीन झाली होती, पण उर्वरित दोन जुनागड व हैदराबाद यांना भारतात सामील करण्यासाठी सैन्याची मदत घ्यावी लागली.

५) बाळ गंगाधर टिळक यांनी सर रतनजी जमशेदजी टाटा यांच्यासमवेत १९००च्या सुरुवातीच्या सुमारास स्वदेशी मालाचे बॉम्बे स्वदेशी सहकारी स्टोर सुरु केले. हे स्टोर सध्या बॉम्बे स्टोर म्हणून प्रसिद्ध आहे.

६) १९४७ च्या अभिलेखानुसार जर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर आक्रमण करण्यासाठी आपल्या देशातील सैन्याला पाठवले नसते, तर आज हे राज्य पाकिस्तानमध्ये असते. तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन यांनी असे म्हटले होते की,”अनियमित सैन्य काश्मीर राज्यामध्ये पाठवून पाकिस्तानने नियमांचा भंग केला आहे.”

७) भगत सिंह हे पाच वेगवेगळ्या भाषा अतिशय अचूक बोलत असत. त्यामुळे इतर महान तत्त्ववेत्ता आणि विचारवंत यांना समजून घेणे त्यांच्यासाठी सोपे झाले. भगत सिंह यांचे इंग्रजी, अरबी, फ्रेंच, स्वीडिश आणि त्याचबरोबर हिंदी, पंजाबी व मुल्तानी या भाषांवर प्रभुत्व होते.

८) आज आपण वेगवेळ्या प्रकारचे भारतीय झेंडे पाहतो, पण आपल्यापैकी खूप कमी जणांना हे माहित आहे की, भारतीय झेंड्यासाठी वापरण्यात येणारे कापड हे खादीचे किंवा स्वतः हाताने तयार केलेले कापड वापरणे गरजेचे आहे. जर इतर कोणत्याही साहित्यापासून तयार करण्यात आलेला झेंडा उभारण्यात आल्यास कायद्याद्वारे त्यांच्यावर तीन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते.

९)पंडित श्यामजी कृष्णवर्मा हे भारतातील महान देशभक्त, परोपकारी आणि राजकीय प्रचारक होते. श्यामजींनी देशभक्तीच्या इच्छाशक्तीने आणि राष्ट्रवादी भावनेने इंग्लंडमध्ये १९०५च्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात केली होती. त्याच्या दोन दशकानंतर महात्मा गांधींनी ही चळवळ भारतामध्ये राबवली.

१०) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या कारकीर्दीमध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर १७ वेळा झेंडा फडकवण्याचा विशेष अधिकार मिळाला होता. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेकवेळा भारताला संबोधित केले होते.

अश्या या तुम्हाला कदाचित माहित नसलेल्या गोष्टी आज आम्ही येथे उलगडून सांगितल्या आहेत. चला मग आजचा हा स्वातंत्र्य दिवस एकजुटीने आणि प्रेमभावनेने साजरा करूया…
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page