' त्याने सव्वाशे वर्षांपूर्वी काढलेल्या चित्रांवर आजही कोट्यावधी रुपयांची बोली लागते! – InMarathi

त्याने सव्वाशे वर्षांपूर्वी काढलेल्या चित्रांवर आजही कोट्यावधी रुपयांची बोली लागते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

नेदरलंड मध्ये ३०  मार्च १८५३  रोजी जन्मलेले विन्सेंट व्हान गॉग हे आजवरच्या सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांची सुर्यफुले (पेंटिंग)  आदर्श आहेत, त्याचं कान कापणं ऐतिहासिक आहे.

ते एक डच पोस्ट इम्प्रेशनिस्ट चित्रकार होते जे जगात  सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. एका दशकात त्यांनी सुमारे २१०० कलाकृती तयार केल्या, त्यात सुमारे ८६०  तैलचित्रे आहेत.

परंतु तुम्हाला माहिती नसेल की त्यांच्या वास्तविक आयुष्यात प्रसिद्धी तर सोडाच पण त्यांना कोणी साधं ओळखतही नव्हते. ते एकाकी आयुष्य जगत राहिले आणि स्वतःला अपयशी मानत राहिले.

 

vincent van gogh inmarathi
Biography.com

आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या कलाकृती शेकडो मिलियन डॉलर ला विकल्या जात आहेत. ते आज घराघरात पोचले आहेत. परंतु त्यांच्या बाबतीत काही अशी रहस्ये आहेज जी फारच कमी लोकांना माहिती आहेत. बघूया काय आहेत ही रहस्ये.

१) ते पूर्णपणे कलाकार बनू शकले नाहीत.

कल्पना करा की आपल्या कडे सुर्यफुले  किंवा चांदणी रात्र नसेल तर ?? हे जग फार दूर नव्हते. खरतर व्हान गॉग ला चर्च चा मुख्य धर्मोपदेशक बनायचे होते. त्यासाठी ते बेल्जियम येथे उपदेशक म्हणून काम करत.

परंतु जेव्हा त्यांनी चित्रकलेत आपले भविष्य शोधायचे ठरवले तेव्हा त्यांना तिथून काढून टाकण्यात आले. व्हान गॉग वयाच्या २७ व्या वर्षापर्यंत चित्र काढू शकले नाहीत शिवाय त्यांच्याकडे औपचारिक शिक्षणही झाले नव्हते

२) पूर्वेकडून प्रेरणा

डच शैलीतली चित्रकला आणि मिलेटची वास्तववादी चित्रकला ह्यांच्या व्हान गॉग वर विशेष प्रभाव होता त्यामुले ते प्रेरित झाले होते. शिवाय जपानी लाकडी ठोकला वापरून पप्रिंट करण्याची शाली त्यांना विशेष भावली होती.

त्यामुळे उत्साहाच्या भरात त्याने हिरोशिगे, केसाई, एसेन ह्यांच्या शैलीची नक्कलही करून पाहिली होती.

३) दर ३६ तासांनी नवीन कालाकृती

आपल्या एकूण आयुष्यात व्हान गॉग ह्यांनी केवळ दहा वर्षे स्वतःला झोकून देऊन काम केले. वयाच्या २७ व्या ते ३७ व्या वर्षापर्यंतचा त्यांचा कामाचा झपाटा अचंबित करणारा होता.

 

van gogh painting inmarathi
Arles Tourisme

ह्या काळात त्यांनी ९०० पेक्षा जास्त पेंटिंग आणि स्केचेस तयार केले म्हणजे त्यांनी एका कामाला ३६ तासांपेक्षा जास्त वेळ दिला नाही.

४) पत्र लिहिणारा माणूस

शेकड्यांनी कलाकृती तयार केल्यानंतर व्हान गॉग ने आपल्या हस्ताक्षरांत अनेक पत्रे लिहली जी कालांतराने प्रचंड प्रसिध्द झाली.

५) ब्रोमेंस

पॉल गॉगीन आणि इतर सहकलाकारांसोबत व्हान गॉग चे घनिष्ट संबंध होते.

व्हान गॉग, गॉगीन आणि एमिल बर्नार्ड ह्यांचा दक्षिण फ्रांस मध्ये कलाकारांचा एक समुदाय  स्थापन करण्याचा मानस होता जिथे ते सगळे एकत्र येतील आणि आपापल्या कलाकृती तयार करतील.

ह्या तिघांसोबत व्हान गॉग ह्यांनी आपली पोर्ट्रेटस सुद्धा बनवली  होती.

६) ते स्वतःच स्वतःचे मॉडेल होते.

व्हान गॉग एकाकी होते त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती त्यामुळे त्यांच्याकडे मॉडेलला देण्यासाठी पैसे नव्हते त्यावर त्यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी स्वतःलाच मॉडेल मानून स्वतःचेच चित्र तयार केले.

 

van gogh 2 inmarathi
AOL.com

कॅनवास घेण्यासाठी पैसे नसत म्हणून त्यांनी आपल्या काही आधीच्या आर्ट वर्क्स वरच पुन्हा चित्र रंगवली होती.

त्यांच्या अनेक चित्रांखाली अशा काही कलाकृती सापडल्या आहेत.

७) अपयश

त्यांचे सर्वात जास्त गाजलेले, लोकप्रिय झालेले चित्र ‘ चांदणी रात्र’ म्हणजेच स्टारी नाईट जेव्हा त्यांनी तयार केले तेव्हा त्याने ते आवडले नव्हते.

 

van gogh starry light inmarathi
MoMA

अशाप्रकारे त्यांनी स्वतःच्या अनेक चित्रांना अपयशी ठरवले होते, अशी अफवा पसरली होती की ते त्यांच्या आयुष्यात एकही पेंटिंग विकू शकणार नाही. त्यामुळे ते प्रचंड निराश झाले होते.

८) स्वतःचा कान कापला.

आपला मित्र गॉगीन ह्याच्याशी झालेल्या वादातून व्हान गॉग ह्यांनी स्वतःचे कान कापून टाकले होते आणि नंतर ते जवळच्या वेश्यागृहातील एका वेश्येला देऊन टाकले.

परंतु काही इतिहासकारांचे असे मत आहे, व्हान गॉग चा मित्र गॉगीन ह्यानेच त्यांचे कान कापले असावेत आणि पोलिसांपासून सुटका व्हावी म्हणून असा कांगावा केला की व्हान गॉग ने स्वतःच आपले कान कापले आहेत.

९) स्वतःच स्वतःला संपवले.

व्हान गॉग बर्याच वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते.  एप्रिल १९८९ मध्ये ते स्वतःहून सेंट रेमी इथल्या सेंट पॉल डी मोसोल ह्या मनोचिकीत्सक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले.

 

van gogh grave inmarthi
Wikipedia

येथेही त्यांनी खिडकीत बसून काही उत्कृष्ट कलाकृती निर्माण केल्या. त्यांचे जगप्रसिध्द “ स्टारी नाईट” हे चीत्र त्यांनी इथल्याच खिडकीत बसून रंगवले आहे. असायलम मधून बाहेर पडल्यानंतर ते आपल्या भावाकडे परी जवळच्या एका छोट्याशा गावात राहायला गेले.

परंतु त्यांनी आपल्या खाण्यापिण्याकडे आणि शारीरिक व्यायामाकडे सतत दुर्लक्ष केले.  तिथे त्यांची मानसिक अवस्था आणखीन बिघडली आणि त्यांनी स्वतःला छातीत दोन गोळ्या घातल्या.

त्यात त्यांना लगेच मरण आले नाही गोळ्या घातल्यानंतर दोन दिवसांनी जखम चिघळल्याने २९  जुलै १८९० रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे शेवटचे उद्गार होते, “ह्या जगात केवळ दुःख शाश्वत आहे”.

१०) प्रेरणादायी गॉग

वॅन गॉग आपल्या आयुष्यात अपयशी ठरले आणि त्यांना वेडं ठरवलं गेलं. परंतु आत्महत्या केल्यानंतर ते प्रसिद्ध झाले. त्यांनी न केवळ आपल्या कलाकृतींनी प्रभाव पडला तर, इतर कलाकारांना प्रेरित सुद्धा केले.

 

van gogh inmarathi
artnet News

व्हान गॉग ह्यांच्या आयुष्यातील शोकांतिके मुळे त्यांनी अनेक निर्माते, संगीतकार, गायक, लेखक ह्यांच्या मनात खास जागा निर्माण केली.

डॉन माक्लीन ह्यांचे १९७१ सालचे विन्सेंट हे गीत व्हान गॉग पासूनच प्रेरित आहे.

त्यांच्यावर लविंग विन्सेंट नावाचा एक अनिमेटेड चित्रपटही तयार करण्यात आला, ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात प्रत्येक फ्रेम हाताने रंगवण्यात आलेली होती.

ह्या चित्रपटासाठी १२५ चित्रकारांनी तब्बल ६५,००० फ्रेम्स बनवल्या ज्यासाठी त्यांना सहा वर्षे मेहनत घ्यावी लागली.

एका हुशार कलावंताचे असे आयुष्य जीवाला चटका लावून जाते, आज व्हान गॉग ह्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाचे एक संग्रहालय आम्सस्टडाम येथे उभारण्यात आले आहे तेथे त्यांच्या अनेक अजरामर कलाकृती बघायला मिळतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?