आणि म्हणून दुसरा कोणी ‘रजनीकांत’ होणे शक्य नाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रजनीकांत सारखा नायक आपल्या चित्रपटसृष्टीला लाभणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे! रजनीकांत हा मूळचा मराठी पण त्याने आपली अभिनयाची कारकीर्द सुरु केली दाक्षिणात्य चित्रपटांमधून आणि त्या जोरावर तो सुपरस्टार झाला. एक कंडक्टर ते भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता इथवरचा त्याचा प्रवास हा सर्वांसाठीचं प्रेरणादायी आहे. स्वप्नांच्यापाठी लागून न खचता ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत हाच संदेश रजनीकांतच्या जीवनातून मिळतो.

आज या रजनीकांत ‘द बॉस’ यांचा वाढदिवस आहे. रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळूरूमध्ये झाला. त्यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत. त्यांच्यामध्ये अशी काही जादू आहे, जी त्यांना इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे बनवते. त्यांच्या अभिनयाला तोड नाही. चला तर मग आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया, त्यांना सगळ्यात खास बनवणाऱ्या विशेष गोष्टींबद्दल..

१. रजनीकांतची विशिष्ट स्टाईल

 

Rajinikanth.Inmarathi1
scoopify.org

स्टाईलच्या बाबतीमध्ये रजनीकांत नेहमीच सर्वापेक्षा अग्रेसर आहे, कारण त्यांच्या या स्टाईलमुळेच ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ते कोणत्याही प्रकारची भूमिका खूपच सुंदररीत्या सादर करतात. विनोदी, मोहक, हिंसक यांसारख्या आणि इतरही भूमिका खूप चांगल्याप्रकारे वठवतात. त्यांच्याकडे कधीही न संपणारा मनोरंजनाचा भंडार आहे. आज या वयामध्ये देखील ते त्याच उत्साहाने अभिनय करतात.

२. रजनीकांत हे वेळेप्रमाणे पुढे जात राहतात.

 

Rajinikanth.Inmarathi2
indiatimes.com

रजनीकांत हे ३० वर्षापेक्षा अधिक काळापासून चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहेत. ते एक असे अभिनेते आहेत, ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट, रंगीत, 3 D आणि अॅनिमेटेड अशा सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्यांनी Kochadaiiyaan हा अॅनिमेटेड चित्रपट पाहिला नसेल, ज्यामध्ये रजनीकांत आणि दिपिका पादुकोण हे मुख्य भूमिकेत होते. त्यांनी तो आवर्जून पाहावा. यामध्ये चित्रपट निर्मात्याने मोशन कॅप्चर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अवतार चित्रपटामध्ये देखील याचा वापर केला गेला होता.

३. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपट सृष्टीमध्ये काम केले आहे.

 

Rajinikanth.Inmarathi3
ytimg.com

रजनीकांत यांनी हिंदी, मल्याळम, बंगाली, इंग्रजी या आणि यांसारख्या इतर सात विविध भाषांमध्ये काम केले आहे. तसेच, त्यांनी प्रत्येक भाषेमध्ये अप्रतिम काम केले आहे. त्यांची लोकांमध्ये असलेली एवढी लोकप्रियता आपल्याला सर्व काही सांगून जाते.

४. रजनीकांत हे उदार मनाचे आहेत.

 

Rajinikanth.Inmarathi
intoday.in

रजनीकांत हे इतरांना आनंद देऊन त्या बदल्यात त्यांचे शुभ आशीर्वाद मिळवण्यामध्ये विश्वास ठेवतात. त्यांच्यामते, इतर लोकांना आनंदी पाहिल्यावर आपल्याला त्यातून वेगळाच आनंद प्राप्त होतो. काही वेळा एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाही, त्यावेळी ते डीस्ट्रीब्युटरला आपल्या खिशातून पैसे देतात. त्यांचा हा निस्वार्थीपणा मनाला भावतो.

५. त्यांच्या विनोदाला काही तोड नाही.

 

Rajinikanth.Inmarathi4
indiatimes.com

रजनीकांत यांच्या विनोदाला कोणतीच तोड नाही. त्यांची विनोद करण्याची कला अतुलनीय आहे. रजनीकांत यांचे विनोद हे त्यांच्यासारखेच अनोखे असतात. त्यांच्या शिवाजी द बॉस या चित्रपटामधील त्यांचे विनोद खूपच मजेशीर आहेत.

अशा या महान अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

सर, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे अजून खूप चित्रपट आम्हाला पाहण्यास मिळो, हीच सदिच्छा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “आणि म्हणून दुसरा कोणी ‘रजनीकांत’ होणे शक्य नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?