INS विराट : भारतीय नौदलाच्या खास युद्धनौकेबद्दल काही रंजक गोष्टी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सेवेतून निवृत्त होण्याच्या आधी भारतीय नौदलाचे अविभाज्य अंग म्हणून प्रसिद्ध असलेली आयएनएस विराट ही युद्धनौका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यावेळी कारण असे आहे की, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ही युद्धनौका खाजगी कौटुंबिक सहलीसाठी वापरल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

या आरोपाबद्दल समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.

जी युद्धनौका राजीव यांनी वापरली ती आयएनएस विराट भारतीय नौदलासाठी इतकी खास का होती? या लेखातून जाणून घेऊ..

भारतीय नौसेना जहाज विराट हे भारतीय नौसेनेतील एक विमान वाहक जहाज आहे. १९९७ साली INS विक्रांत ला सेवानिवृत्ती दिल्यानंतर INS विराटने त्याची कमी पूर्ण केली होती.

 

INS-Viraat11-marathipizza
coolwallpaperz.info

भारतीय नौसेनेने १९८० च्या दशकात ही युद्धनौका जवळजवळ साडे सहा कोटी डॉलरमध्ये विकत घेतली होती. १२ मे १९८७ ला या नौकेला सेवेत सामील केलं गेलं.

भारताआधी ही युद्धनौका १९५९ मध्ये ब्रिटनच्या रॉयल नेवीच्या सेवेत होती. याने रॉयल नेवीत २७ वर्ष सेवा दिली, तेव्हा याला एचएमएस हर्मिस या नावाने ओळखले जात असे.

 

INS-Virat08-marathipizza
aolcdn.com

१९५९ ते १९८५ सालापर्यंत हा रॉयल नेवीच्या अखत्यारीत होता.

भारतीय नौसेनेने कित्येक देशांच्या युध्दनौकांचे परीक्षण केल्यानंतर या युद्धनौकेला विकत घेतले. यानंतर या जहाजात अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या जेणेकरून हे जहाज पुढील एक दशकापर्यंत कार्यशील राहील. यातील तांत्रिक सुधार हे देवेनपोर्ट डॉकयार्ड येथे झाले.

 

INS-Virat07-marathipizza
rediff.com

INS विराटने ब्रिटिश रॉयल नेवीतर्फे अर्जेन्टिना विरुद्ध फॉकलैड युद्धात देखील भाग घेतला होता.

या युद्धनौकेचा निर्माण १९४३ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान करण्यात आला होता.

 

INS-Virat05-marathipizza
ibnlive

या युद्धनौकेवर एका वेळी १५०० सैनिक तैनात राहत होते, तर तीन महिन्याचं रेशन घेऊन ही युद्धनौका समुद्रात निघायची.

हिच वजन २४ हजार टन होतं. हिची लांबी ७४३ फुट आणि रुंदी १६० फुट होती.

INS-Virat-marathipizza
indianexpress.com

या युद्धनौकेचा वेग ताशी ५२ किलोमीटर होता.

आतापर्यंत INS विराटने ९ लक्ष ३० हजार किलोमीटरचा प्रवास केलेला आहे.

INS-Virat03-marathipizza
indiatimes.com

जगातील सर्वात जास्त काळापर्यंत सेवा देणारी ही एकमेव युद्धनौका असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये देखील INS विराटचं नाव दाखल करण्यात आलं आहे.

INS विराट ला ‘ग्रेट ओल्ड लेडी’ या नावाने देखील ओळखल्या जाते.

 

INS-Virat10-marathipizza
indiatimes.com

विराटवर १२ डिग्री कोन वाला एक स्की जंप आहे जो सी हैरीअर श्रेणीच्या लढाऊ विमानांना उडाण घेण्यास उत्तम आहे. या जहाजावर एका वेळेला १८ लढाऊ विमानं ठेवता येतात.

यावर ७५० लोकांच्या राहण्याची सोय आहे तसेच ४ छोटी नावे देखील आहेत ज्या सैनिकांना किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यास मदत करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?