इंडियन आयडलमधील खोटारडेपणा : रिऍलिटी शो मध्ये खोटी नाटकं कशाला?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

काय खरं आणि काय खोटं हे आजकालच्या दुनियेत कळणं खूप अवघड झालंय. बराच वेळा टि.व्ही. वर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी – त्या मग डेलीसोपच्या सिरिअल्स का असेना, त्या कलाकारांच्या अभिनयामुळे अगदी खरं घडतंय की काय असं वाटायला लागतं.

त्याच बरोबर न्युज चॅनल्स असतात. त्यावरच्या बातम्या ह्या खऱ्याच असणार, न्युज चॅनेल आहे ना ते मग खोटं कसं दाखवतील, असं समजून आपण एका माणसाला हिमालयात हनुमान दिसले ही देखील बातमी सत्य समजून बसलो होतो.

याच बरोबर अजून एक टि.व्ही. वर घडणारी गोष्ट म्हणजे रियालिटी शो.

मग तो डान्स इंडिया डान्स असेल किंवा सर्वात फेमस गायनाचा कार्यक्रम म्हणजे इंडियन आयडल.


पण यामधून सर्रास जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्यात दाखवले जाणारे “गरीब कलाकार आणि त्यांची स्टोरी ऐकून रडणारे जज.”

 

Indian_Idol_InMarathi
en.wikipedia.org

हे चॅनेलचे लोक एखादा कलाकार असेल, जो चांगला असेल आणि घरची परिस्थिती वाईट असेल, तर ते सर्व जगासमोर आणतात. त्याच्या घरी जाऊन तो जिथे जिथे जातो तिथे जाऊन व्हिडिओ करून तो शो मध्ये दाखवतात. एकंदरीत त्याचे इथे येण्यामागचे कष्ट त्यांना दाखवायचे असतात.

 

indianidol11-InMarathi
filmibeat.com

पण काही लोकांचं म्हणणं आहे की हे सगळं स्क्रिप्टनुसार असतं. काही लोकांचे अनुभव हे असे आहेत की त्यांची पात्रता असून त्यांच्याकडे जर एखादी सॅड स्टोरी नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही.

याहून वाईट गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे सॅड स्टोरी नसेल तर ती आपण बनवू असं देखील विचारले जाते.

सध्या इंडियन आयडल हा कार्यक्रम टिव्हीवर चालू आहे. जो सर्वत्र खूप गाजतो देखील आहे. याचे जजेस् हे अन्नू मलिक, नेहा कक्कर आणि विशाल ददलानी हे आहेत.

हा कार्यक्रम २००४ पासून टीव्ही वर चालू आहे. अर्थात खूप जुना आणि लोकांच्या आवडीचा आहे. यामध्ये सध्या काही गायक आहेत जे ऑडिशन पास होऊन आता टॉप फॉरटिन मध्ये गेले आहेत.

यामध्ये तसे सगळे चांगलेच गात आहेत.


एवढंच काय तर त्यात महाराष्ट्राचा लाडका गायक रोहित राऊत पण आहे. जजेस ना तो खूप आवडतोय असं देखील दिसत आहे.

 

Rohit Raut Indian idol Inmarathi
iwmbuzz.com

एकंदरीत स्पर्धा चुरशीची आहे.

या स्पर्धेतीलच एक गायक आहे सनी मलिक जो सध्या सर्वांच्या मनात घर करून बसलाय. त्याचं गाणं ऐकून डोळे पाणावतात, त्याचा आवाज ऐकला की उस्ताद नुसरत फतेह अली खान यांची आठवण येतेच.

 

Sunny Malik InMarathi
headlinezpro.com

त्याचं हे गायन सर्वत्र व्हायरल झालं. ते इतकं व्हायरल झालं की स्वतः राहत फतेह अली खान यांनी देखील त्याचे कौतुक केले. त्याचे कौतुक करताना ते म्हणाले की नुसरत साहेबांची आठवण आली.

एवढंच काय तर महिंद्रा अँड महिंद्रा चे मालक आनंद महिंद्रा यांनी देखील त्याचा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला, आणि त्यावर विशाल ददलानी यांनी तो परत शेअर करत धन्यवाद दिले.

 

anand-mahindra_supporting Sunny Malik InMarathi
english.newstracklive.com

ऑडिशन राउंड मध्ये त्याने आफ्रीन आफ्रीन गायलं ते जजेस ना खूप आवडलं. तेव्हा त्याने त्याच्या बद्दल काही गोष्टी सांगितल्या.

तो एका गरीब घरातून येतो. तो बूट पॉलिश करतो. त्याची आई दारोदारी जाऊन तांदूळ मागते किंवा फुगे विकते. अशी सगळी त्याची कहाणीने तिथे सांगितली, जी खरंच प्रेरणादायी होती.

पण या आधी आपण जसं बोललो की कलाकारांच्या स्टोरीज दाखवून इमोशनल केलं जातं, आणि एक प्रकारे सहानुभूती मिळवली जाते. आता यामधील सनी मलिक याची देखील कहानी दाखवण्यात आली आहे. पण काही लोकांचा आक्षेप आहे की ती खोटी आहे.


या आधी देखील तो त्याचं गाण यु ट्यूब वर टाकत असे. असे काही व्हिडिओ देखील आहेत. त्या व्हिडिओ मध्ये तो स्वतः बद्दल जी माहिती सांगतोय ती आणि इंडिअन आयडलमध्ये त्याने सांगितलेली स्वतःबद्दलची माहिती ही बऱ्यापैकी वेगळी आढळून आली आहे.

त्यासंबंधित यु ट्यूब वर व्हिडिओ देखील आहे, ज्यात या गोष्टी उघड होताना दिसत आहेत.

त्याने सांगितले होते तो भटिंडाचा आहे .पण यु ट्यूब व्हिडिओ करताना तो स्वतःला दिल्लीचा सांगतोय. असे बरेच पुरावे त्यात आढळून येत आहेत.

 

सहानुभूती मिळवण्यासाठी अशा रियालिटी शोज् चे असे बरेच प्रयत्न होताना दिसतात. हे कितपत योग्य आहे माहीत नाही.

पण कलाकार चांगला असून फक्त एखादी सॅड स्टोरी नाही म्हणून एखाद्याला रिजेक्ट करणे हे नक्कीच चुकीचे आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?