जॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचा चेहरा असलेले, कामगार नेते, संसदपटू, माजी संरक्षणमंत्री,उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांचे आज दुर्दैवी निधन झाले.

भारतातल्या कामगार चळवळीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या काही महत्वाच्या नेत्यांपैकी एक ते होते. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जॉर्ज यांच्या असामान्य योगदानाचे स्मरण करत अनेकांनी फेसबुकवर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यापैकीच काही प्रतिक्रिया इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत..

===

स्वानंद गांगल म्हणतात..

मध्यंतरी एका काकांसोबत गप्पा सुरू होत्या.
काँग्रेसने किंवा इतर कोणीतरी काहीतरी कारणाने बंद पुकारला होता.
तेव्हा मी बोलता बोलता म्हटलं,
“मी आजवर एकच अशी व्यक्ती पाहिली ज्यांनी बंद नुसता जाहीर केला कि मुंबई/महाराष्ट्र पूर्णपणे बंदच व्हायचा.
ती व्यक्ती म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे”

त्यावर ते काका थोडेसे हसले आणि एकच वाक्य म्हणाले
“बरोबर आहे,
कारण तुमच्या पिढीने कधी जॉर्ज फर्नांडीस अनुभवलेच नाहीत!!”

‘बंद सम्राटाला’ अभिवादन!!
सद्गती लाभो!!

 

gangal-inmarathi

 

आशुतोष अडोनी म्हणतात,

जॉर्ज गेले…

भारतीय राजकारणातील एक वादळी पर्व आज संपले. पुढील पिढ्याना दंतकथा वाटावी असे विलक्षण राजकीय जीवन जॉर्ज जगले. उमलत्या वयात ज्या व्यक्तित्वांनी मनावर कायम गारुड केलं त्यापैकी जॉर्ज एक.

त्यांचं समाजवादी असणं हे त्या गारुडाच्या कधी आड आलं नाही. त्यांचा पराकोटीचा साधेपणा, प्रखर राष्ट्रभक्ती, सामान्यांसाठी प्राण पणाला लावणारी तळमळ, प्रभावी वक्तृत्व, झुंझार वृत्ती या सगळ्याचं कमालीचं आकर्षण वाटायचं.

त्यांच्या सोबत मन मोकळ्या अनौपाचरिक गप्पा कधीतरी व्हाव्यात हे एक स्वप्न होतं. मास कम्युनिकेशनच्या पदव्युत्तर पदवी अभ्याक्रमात १९९६मध्ये हा योग जुळून आला.

दिल्ली अभ्यास दौऱ्याचे वेळी भारतीय राजकारणातील या झंझावताची त्यांच्या निवासस्थानी निवांत भेट झाली.खरतर आम्हाला वेळ द्यावा असे त्यांच्यासमोर आम्ही कोण होतो ? पण विलक्षण आपुलकीने जॉर्ज बराच वेळ अगदी मनमोकळं बोलले.त्यांच्यासोबतची ही पहिली आणि शेवटची भेट माझ्या मर्मबंधातली ठेव आहे,खूप काही देऊन जाणारी ! असा माणूस पुन्हा होणे नाही.

जॉर्ज..विनम्र अभिवादन आणि साश्रू श्रद्धांजली !!😔

 

post-inmarathi

 

राजीव साने म्हणतात,

 

rajeev-sane-inmarathi

 

चेतन दीक्षित लिहितोय..

माझे बाबा आणि जॉर्ज फर्नांडिस..

१९७४ चा काळ होता. आमचा दौंडच्या रेल्वेस्टेशनवर बुकस्टॉल होता. बाबांची पत्रकारिता जोरात सुरु होती. सोलापूर रेल्वेविभाग हा दक्षिणमध्य रेल्वेमध्ये मोडत असे. तो दक्षिणरेल्वेत मोडला जावा म्हणून रेल्वे कामगारांनी संप पुकारला होता. तब्बल २८ दिवस तो संप कडकडीत पाळला गेला. एकही रेल्वे दौंडवरून जात नव्हती.

तेंव्हाचे दौंडमधले कामगार नेते भाऊ फाटक, ह्यांनी दिल्लीहून जॉर्ज फर्नांडिसांना बोलावले होते. तेंव्हा झालेल्या पत्रकारपरिषदेनंतर त्यांच्यासोबत झालेल्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भातल्या चर्चेवेळेसचा, बाबांचा हा फोटो..

दुर्दैवाने आमचा तो स्टॉल गेला, त्यासोबत बाबांच्या पत्रकारितेने पूर्णविराम घेतला. ती सल बाबा नेहमी बोलून दाखवतात. पण अश्या काही आठवणी बाबांना भूतकाळात रमायला भाग पाडतात..

त्यापैकी ही एक आठवण..

 

chetan-inmarathi

 

अनंत वैद्य म्हणतात..

‘मी निवृत्त होईन तेव्हा मुंबईत जाईन, युनियनकडून दोन खोल्यांचे घर घेईन आणि फक्त वाचत बसेन. माझ्या मृत्यूनंतर त्या खोल्या युनियनच्याच.’ हे उद्गार होते देशाचं संरक्षण मंत्री पद भूषवणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचे.

जॉर्ज यांची साधी राहणी, परंतु सामाजिक, राजकीय व इतर विषयांचे असलेले अद्भुत ज्ञान, याचं कायम अप्रूप वाटायचं. जॉर्ज मंत्री असताना टीव्हीवर यायचे, तेव्हा इतकं साधं राहणाऱ्या माणसाबद्दल कुतूहल वाटायचं.

“होय, तुम्ही सका पाटलाला पराभूत करू शकता” या एकाच ओळीच्या जोरावर प्रचार करणाऱ्या जॉर्ज यांनी सन १९६७ च्या निवडणुकीत एकेकाळी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणाऱ्या स.का.पाटील यांना चारीमुंड्या चित केलंत. यातून जॉर्ज यांचे विलक्षण नेतृत्व आणि संघटन शैली उमजून येते.

संरक्षण मंत्री असताना त्यांनी पोखरण अणु चाचणी केली. ते देशातील एकमेव संरक्षण मंत्री ठरले ज्यांनी ६,६०० मीटर उंचीवरील सियाचीन ग्लेशियरचा १८ वेळा दौरा केला.

जॉर्ज यांच्यासारखा नेता लाभण हे एखाद्या राष्ट्राचं सौभाग्यचं. निरंतर प्रेरणा देणाऱ्या “साथी”च्या स्मृतींना अभिवादन..

 

gangal-inmarathi

 

जॉर्ज फर्नांडीस या सामान्य अन्युश्या जगलेल्या असामान्य नेत्याला फेसबुकवर अशी श्रद्धांजली वाहिली जात आहे. देशाच्या संरक्षणक्षेत्रात, रेल्वे मंत्रालय हाताळताना वाहतुकीच्या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या या नेत्याला इनमराठीकडूनही विनम्र आदरांजली..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जॉर्ज फर्नांडिस किती ग्रेट होते ह्याची कल्पना नसणाऱ्यांनी हे आवर्जून वाचायला हवं…

  • January 29, 2019 at 1:09 pm
    Permalink

    त्यांच्या

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?