या प्रणालीचा वापर करून फेसबुक थांबवू शकते लोकांच्या आत्महत्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सोशल मिडियाचे वर्चस्व सध्या आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळते. कोणतीही छोटीशी बातमी देखील या सोशल मिडीयाच्या माध्यमातून लगेचच वाऱ्यासारखी पसरते. त्यामुळे कोणतीही बातमी लपून राहत नाही आणि लोकांना समजते.

काही काळापूर्वी एका मुलाने फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट टाकली आणि त्यानंतर आत्महत्या केली. अशा प्रकारच्या दोन – तीन बातम्या समोर आल्या होत्या. पण आता या आत्महत्या रोखण्यासाठी फेसबुकने स्वतःच एक पाऊल उचलले आहे.

 

Facebook Artificial Intelligence.Inmarathi
thehindu.com

अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी ४४ हजार लोक आत्महत्या करतात. अमेरिकन फाऊंडेशन फॉर सुसाईड प्रिवेंशननुसार, अमेरिकेच्या लोकांच्या मृत्यूचे आत्महत्या हे १० वे सर्वात मोठे कारण आहे.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला या माणसांच्या आत्महत्येमुळे दरवर्षी ५१ बिलियन डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागते.

कदाचित हेच कारण आहे की, फेसबुक आता एक अशी आर्टिफिशियल इंटेलीजेंसवर काम करत आहे, जो तणावात असलेल्या आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांच्या फेसबुक कंटेंटला तपासून त्यांना लगेचच मदत पुरवू शकते.

काही लोकांनी विरोध करून देखील फेसबुक फाऊंडर मार्क झुकरबर्ग हे या आर्टिफ़िशियल इंटेलीजेंसविषयी खूप सकारात्मक आहेत. त्यांनी म्हटले आहे की,

“हे मानायला लागेल की, आजच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलीजेंस खरचं लोकांचे जीव वाचवू शकते.”

 

Facebook Artificial Intelligence.Inmarathi1
licdn.com

यावर्षी मार्चमध्ये फेसबुककडून आत्महत्या थांबवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलीजेंसचा वापर करण्यात आला होता. या दरम्यान आर्टिफिशियल इंटेलीजेंस फक्त युजर्सच्या टेक्स्ट पोस्ट्सची तपासणी करू शकत होता.

पण आताच्या लेटेस्ट अपग्रेडबरोबर आता हे फिचर जगातील सर्व फेसबुक वापरणाऱ्या लोकांवर लागू होणार आहे. पण यामध्ये युरोपियन युनियनला समविष्ट करण्यात आलेले नाही, कारण तेथे प्रायव्हेसीशी निगडीत खूप वेगळ्या प्रकारचे नियम आहेत.

पॅटर्न रिकर्गनायझेशनच्या मदतीने हे आर्टिफ़िशियल इंटेलीजेंस अशा पोस्ट किंवा लाइव्ह व्हिडिओना डिटेक्ट करेल, ज्यामध्ये आत्महत्या करण्याशी निगडीत एखादा विचार शेयर केला असेल आणि त्याच्याच आधारे वापरकर्त्याची मदत केली जाईल.

 

Facebook Artificial Intelligence.Inmarathi2
careerride.com

कंपनीचा सर्वात जास्त फोकस त्या लोकांवर असेल, जे फेसबुकवर आत्महत्येच्या संदर्भात पोस्ट शेयर करतात.

फेसबुकचे म्हणणे आहे की, त्यांचे आर्टिफिशियल इंटेलीजेंस अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीची प्रोफाईल चेक करून लगेचच त्याला मदत पोहोचवायला तयार असेल. फेसबुककडे एक अशी टीम आहे, जी सर्वात गंभीर रिपोर्ट्सवर जास्त तत्पर असेल.

याव्यतिरिक्त कोणत्याही हेल्पलाईनवर कॉल करणे किंवा एखाद्या मित्राला कॉल करणे अशाप्रकारचे पर्याय देखील फेसबुकने दिले आहेत. या आर्टिफिशियल इंटेलीजेंसला कितीतरी मेंटल हेल्थ संस्थांबरोबर मिळून तयार करण्यात आले आहे.

फेसबुकच्या या प्रयत्नाला खूप लोकांचा पाठिंबा मिळत आहे. पण काही लोक फेसबुकने टाकलेल्या या पावलाशी थोडे चिंतीत देखील आहेत.

कितीतरी लोकांचे मानणे आहे की, आर्टिफिशियल इंटेलीजेंसच्या नावाखाली फेसबुक लोकांचे प्रायव्हेट चॅट आणि कंटेंटवर डेन्ट लावू शकते, यामुळे लोकांच्या खाजगी गोष्टी फेसबुकच्या लक्षात येऊ शकतात.

पण फेसबुकचे चीफ सेक्युरिटी ऑफिसर अॅलेक्स स्टॅमोसने असे काहीही होणार नाही असे सांगितले आहे.

 

Facebook Artificial Intelligence.Inmarathi4
techviral.net

फेसबुकच्या प्रोडक्ट मॅनेजमेंटचे व्हीपी रोशनने सांगितले की,

“आमच्या या प्रणालीने गेल्या महिन्यात १०० पेक्षा जास्त तणावाखाली असलेल्या आणि आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांना शोधून काढले होते. या प्रणालीमुळे आम्हाला त्यांच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्याचे समजले.”

फेसबुकने टाकलेले हे पाऊल आत्महत्या रोखण्यासाठी खूपच लाभदायक आहे. यामुळे आत्महत्या किती प्रमाणात रोखल्या जाणार, हे तर येणाऱ्या काळात ठरेलच. पण याचा मोठ्या स्तरावर प्रत्येक देशाला नक्कीच फायदा होईल आणि लोकांचे प्राण वाचतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?