शास्त्रज्ञांनी दावा केलाय की बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य त्यांनी उलगडलयं !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रत्येकाने लहानपणी ऐकलेल्या आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बर्म्युडा ट्रँगल! जिथे विमानं, जहाज…सर्वकाही अदृश्य होतं! शास्त्रज्ञांचा दावादावा आहे की ह्या जागेचं गूढ उलगडलं आहे!

 

bermuda-triangle-inmarathi
Wikimedia Commons | theweek.co.uk

जेव्हापासून बर्म्युडा ट्रँगलचं प्रकरण जगासमोर आलंय तेव्हापासून ते एक रहस्यचं बनून गेलंय. अजूनही शास्त्रज्ञ बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य उलगडण्यात दिवस आणि रात्र एक करत आहेत. बर्म्युडा ट्रँगलबद्दल आजवर अनेकांनी अनेक सिद्धांत मांडले.


कोणाच्या दाव्यामध्ये काही अंशतः तथ्यता होती तर बहुसंख्य जणांचे दावे केवळ बोलाचे भात अन् बोलाचीच कढी ठरले.

नुकताच एका शास्त्रज्ञांच्या गटाने देखील बर्म्युडा ट्रँगलबद्दल सिद्धांत मांडीत बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य उलगडल्याचा दावा केलाय.

५०००० किमी वर्ग क्षेत्रफळात पसरलेलाल्या महासागरातील बर्म्युडा ट्रँगलच्या या परिसराने आजवर शेकडो जहाज आणि विमानांना स्वत:च्या पोटात गिळंकृत केले आहे.

मागील १०० वर्षांत १००० पेक्षा जास्त लोक बर्म्युडा ट्रँगलच्या भक्ष्यस्थानी पडल्याची नोंद आहे. अगदी कित्येक मैल दुरून प्रवास करणारी जहाजे देखील बर्म्युडा ट्रँगलच्या नरकामध्ये खेचली जातात.

 

bermuda-triangle-mystery-marathipizza01

स्रोत


शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,

Air Bombs च्या मिसळण्याने बर्म्युडा ट्रँगलच्या वर षटकोनी आकाराचे ढग तयार होतात. या  Air Bombs च्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या हवेचा वेग इतका प्रचंड असतो की ज्यामुळे समुद्रात ४५ मीटर उंच लाटा तयार होतात.

Micro Bursts एकत्र आल्यामुळे हे Air Bombs तयार होतात. Micro Bursts ढगांच्या खालून निघून जातात आणि फुटतात.

फुटल्यामुळे ते महासागराला जाऊन धडकतात आणि त्यातून प्रचंड आकराच्या लाटा तयार होतात. त्यामुळेच या प्रदेशात येणारी कोणतीही गोष्ट लाटा खेचून घेतात.

 

bermuda-triangle-mystery-marathipizza02

स्रोत

बर्म्युडा बेटांच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विशालकाय ढग पाहायला मिळतात. जे जवळपास २० ते २५ मैल दूरपर्यंत पसरलेले असतात. त्यामुळे या शास्त्रज्ञांच्या दाव्यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे.


त्यांचा सिद्धांत स्पष्ट करणार हा व्हिडियो पहा :

 

 

आता प्रश्न इतकाच की –

हा देखील आणखी एक दावा ठरेल – की बर्म्युडाचा गुंता कायमचं सोडवणारं उत्तर?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?