जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

टिव्हीवर आजकाल खूप नवनवीन रिअॅलिटी शो आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलाच एक शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ हा आहे. २००० साली आलेल्या या शोला कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळाली. या ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे होस्ट बिग बी म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन हे आहेत.

कौन बनेगा करोडपती यायच्या अगोदर अमिताभ बच्चन बऱ्यापैकी कर्जात बुडालेले होते. त्यांची ABCL Entertainment ही कंपनी कर्जाच्या खोल गाळात रुतली होती.

येणारे सिनेमे एका पाठोपाठ फ्लॉप होत चालले होते आणि आर्थिक स्थिती बऱ्यापैकी कमजोर झाली होती.

 

amitabh-bacchan-marathipizza02
amitabhbachchan.ucoz.net

हा एक कार्यक्रम सुरु झाला आणि अमिताभ ने रातोरात फिनिक्स पक्ष्याने ज्याप्रमाणे राखेतून भरारी घ्यावी त्याप्रमाणे आपल्या डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीच्या जाळ्यातून फिनिक्स भरारी घेतली.


आजपर्यंत या शोने कितीतरी लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. हे जिंकलेले लोक या शोमार्फत लोकांच्या समोर आले आणि सर्वांना त्यांच्या जीवनाचा आढावा मिळाला.

एक शंका नेहमी मनामध्ये निर्माण होते, ती म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर नेमके काय दिसते ? कारण त्यांच्या संगणकाची स्क्रीन जास्त दाखवली जात नाही. चला मग जाणून घेऊया, नेमके त्यांच्या स्क्रीन काय दाखवले जाते.

 

Kbc Amitabh computer.marathipizza
hindustantimes.com

केबीसीमध्ये भाग घेतलेल्या एका स्पर्धकाने सांगितले की, अमिताभ बच्चन आपल्या ‘कम्युटर जी’ च्या स्क्रीनवर काय-काय बघू शकतात. अभिनव पांडे यांनी या शोमध्ये भाग घेऊन १२.५ लाख जिंकले होते. त्यांनी क्वोरा या साईटवर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

त्यांनी सांगितले आहे की, शोच्या दरम्यान जेव्हा पहिला स्पर्धक हॉट सीटवर होता, तेव्हा ते ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धक’ म्हणून बरोबर अमितभ बच्चन यांच्या बरोबर मागे बसले होते, जिथून त्यांना अमिताभ बच्चन यांच्या संगणकाची स्क्रीन दिसत होती.’

अभिनवने सांगितले की, त्यांचा संगणक रिस्पॉन्सिव आहे, ते त्याला ऑपरेट करू शकतात. पण मुख्य कम्युटर ऑपरेटर हा स्टुडिओच्या ब्लॅक झोनमध्ये बसलेला असतो. स्पर्धकांचा संगणक अनरिस्पॉन्सिव असतो आणि ब्लॅक झोनमध्ये बसलेला माणूस हे संगणक ऑपरेट करत असतो.

 

Kbc Amitabh computer.marathipizza1
Cbseresults2017

अमिताभ बच्चन यांच्या स्क्रीनवर प्रश्न, ऑप्शन, प्रश्नांचा टप्पा, राहिलेल्या लाइफलाइन दाखवल्या जातात. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाची माहिती म्हणजेच त्याचे नाव, शहर, व्यवसाय इत्यादी सर्व स्क्रीनवर दिसते.

अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रश्नाचे योग्य उत्तर लॉक करण्याच्या आधीच त्याचे उत्तर त्यांना देखील दिसत नाही. उत्तर लॉक केल्यानंतरच त्यांना त्याचे योग्य उत्तर समजते.

 

Kbc Amitabh computer.marathipizza2
philreynolds.org.uk

अमिताभ बच्चनच्या स्क्रीनवर एका दुसऱ्या विंडोमध्ये ‘फोन अ फ्रेन्ड’ नॉमिनीजची माहिती देखील त्यांना दिसते. त्यांच्या स्क्रीनवर टायमर त्यांना ब्रेकच्या वेळेची माहिती देखील देत असते. जर त्यांना वाटले तर, ते या वेळेला कमी किंवा जास्त करू शकतात. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ च्या दरम्यान ही स्क्रीन ऑफ असते.

अभिनव यांनी हे देखील सांगितले की, अमिताभ बच्चन यांच्या पाठीमागे बसलेल्या ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धकाला’ प्रत्येक दिवशी एक लाख रुपये जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये खूप फायदा मिळतो.

आता तरी याबद्दल असणारे तुमचे प्रश्न नक्कीच संपले असतील अशी आम्ही आशा करतो.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *