एखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय ? आणि ते कसे मिळवाल ? – जाणून घ्या !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

चोरी करणे हा गुन्हा आहे, हे तर तुम्हाला माहित आहेच. काहीजण वस्तूंची चोरी करतात, तर काही पैशांची. पण असे ही काही लोक आहेत जे लोकांच्या कल्पनांची चोरी करतात. एखाद्याची कल्पना चोरून त्याची नक्कल करणे हा सुद्धा एक गुन्हाच आहे. आता तुम्ही विचाराल, कल्पनांची चोरी म्हणजे नक्की कसली चोरी, अहो म्हणजे एखाद्याने जर नवीन शोध लावला असेल तर तसाच शोध किंवा वस्तू बनवून ती आपली म्हणून सांगायची. यावेळी जर तुम्ही त्या गोष्टीचे पेटेंट केले असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीवर खटला टाकून त्याच्याविरुद्ध कारवाई घडवून आणू शकता. असे हे पेटेंट आपल्या खूप उपयोगाचे असते, ज्याच्या माध्यमाने तुम्ही तुमची कल्पना सत्यात उतरवू शकता. याच पेटेंटविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

Patent.marathipizza
bonusnotus.eu

भारतीय पेटेंट कार्यालयाला पेटेंट डिझाईन आणि ट्रेड मार्क्स (सीडीपीडीटीएम) चे नियंत्रक जनरलच्या कार्यालयद्वारे प्रशासित केले जाते. याचे मुख्यालय कोलकात्यामध्ये आहे आणि हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करतात.

 

पेटेंट कशाला म्हणतात?


पेटेंट एक अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही एकदम नवीन सेवा, तांत्रिक, प्रक्रिया, उत्पादन किंवा डिझाईनसाठी दिले जाते, कारण कोणीही त्याची नक्कल तयार करू शकत नाही. पेटेंट एक असा अधिकार आहे, जो मिळाल्यानंतर जर कोणीही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाचा शोध करते किंवा बनवते तर ते त्या उत्पादनाला बनवण्याचा एकाधिकार प्राप्त करते.

जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीऐवजी इतर कोणी व्यक्ती किंवा संस्था याच उत्पादनाला बनवते, तर ते बेकायदेशीर मानले जाते आणि जर पेटेंट मिळालेल्या व्यक्तीने त्याच्या विरुद्ध तक्रार नोंदवल्यास पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पण जर कोणी या उत्पादनाला बनवू इच्छित असेल तर त्याला पेटेंट मिळालेल्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून परवानगी घ्यावी लागेल आणि त्याला रॉयल्टी देणे गरजेचे आहे.
आता वर्ल्ड ट्रेड संघटनेने पेटेंट लागू राहण्याचा कालावधी २० वर्ष केला आहे, जो पहिले प्रत्येक देशामध्ये वेगवेगळा होता.

Patent.marathipizza1
leintelligensiaipr.com

पेटेंटचे दोन प्रकार असतात

१.उत्पादन पेटेंट

२.प्रक्रिया पेटेंट

१.उत्पादन पेटेंट :-

याचा अर्थ हा आहे की, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था एखाद्या उत्पादनाची एकदम हुबेहूब नक्कल करू शकत नाही, म्हणजे दोन उत्पादनांची डिझाईन सारखी असू शकत नाही. हे अंतर उत्पादनाची पॅकिंग, नाव, रंग, आकार आणि चव इत्यादीचा असतो. हेच कारण आहे की, तुम्ही बाजारामध्ये कितीतरी प्रकारचे टूथपेस्ट बघितले असाल, परंतु त्यामधील कोणत्याही दोन कंपनीचे उत्पादन एकदम एकसारखे बघितले नसाल. असे उत्पादन पेटेंटमुळेच केले जाते.

Patent.marathipizza2
staticwhich.co.uk

२. प्रक्रिया उत्पादन :-

याचा संबंध नवीन औद्योगिकाशी आहे. कोणत्याही नवीन तांत्रिक पद्धतीवर सुद्धा पेटेंट घेतला जाऊ शकतो. या प्रकारच्या पेटेंटचा अर्थ कोणताही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही उत्पादनाला बनवण्यासाठी त्याच पद्धतीचा वापर करू शकत नाही, ज्या प्रक्रियेचा वापर करून एखाद्या उत्पादनाला पहिलेच बनवले असेल. म्हणजेच प्रक्रिया पेटेंटमध्ये कोणतेही उत्पादन बनवण्याची पद्धत चोरी करू शकत नाही.

 

पेटेंट कसे मिळवले जाते?

प्रत्येक देशामध्ये पेटेंट कार्यालय असते. आपले उत्पादन किंवा प्रक्रियचे पेटेंट मिळवण्यासाठी पेटेंट कार्यालयामध्ये अर्ज द्या आणि आपल्या नवीन शोधाचे वर्णन केलेला अहवाल द्या. त्यानंतर पेटेंट कार्यालय त्याची पडताळणी करेल आणि जर ते उत्पादन किंवा प्रक्रियेचा विचार नवीन असेल, तर पेटेंट देण्याचा आदेश दिला जातो. येथे ही गोष्ट जाणून घेणे खूप गरजेचे आहे की, उत्पादन किंवा सेवेसाठी घेण्यात आलेले पेटेंट फक्त त्याच देशासाठी लागू झालेला असतो, ज्या देशामध्ये पेटेंट केले गेले असेल. जर ऑस्ट्रेलियाचा किंवा इतर कोणत्याही देशाचा व्यक्ती भारतामध्ये पेटेंट केलल्या उत्पादनाची किंवा प्रक्रियेची नक्कल बनवत असेल, तर त्याला चुकीचे मानले जात नाही. याचप्रकारे भारतामध्ये पेटेंट करणारी कंपनी जर याच पेटेंटचा ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्याही देशामध्ये एकाधिकार पाहिजे असल्यास त्या देशातील पेटेंट कार्यालयाला वेगळा अर्ज देणे गरजेचे आहे.

आहे की नाही कामाची माहिती, चला तर मग तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील ही माहिती शेअर करा म्हणजे त्यांच्या देखील कामी येईल. 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “एखादी गोष्ट पेटेंट करणे म्हणजे काय ? आणि ते कसे मिळवाल ? – जाणून घ्या !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *