DSLR कॅमेऱ्याच्या मॉडेल्सची नावं कशी ठरतात माहितीये? वाचा!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आजकाल डीएसएलआर कॅमेऱ्याचे वेड प्रचंड वाढले आहे. बघावं तो व्यक्ती डीएसएलआर कॅमेरा घेऊन फोटो काढत सुटलेला दिसतो. ही गोष्ट ही काही वाईट नाही म्हणा, कारण सध्या फोटोग्राफी देखील एक चांगलं करियर सिद्ध होऊ शकतं, फक्त मेहनत घ्यायची तयारी हवी. बरं असो, आपण मूळ मुद्द्याकडे वळू, आज आपण जाणून घेणार आहोत एक असा प्रश्न जो डीएसएलआर कॅमेरा विकत घेणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कधी न कधी आलाच असेल. डीएसएलआर कॅमेरा विकत घेताना नेमकं कोणतं मॉडेल घ्यावं या बद्दल प्रत्येक जण बुचकळ्यात पडतो, त्यातल्या त्यात ज्या कंपनीचा कॅमेरा घ्यायचा झाला, त्यांची तर मॉडेल्स पाहूनच कन्फ्युजन अधिकच वाढतं. आता कॅनन कंपनीच पहा ना, त्यांची मॉडेल म्हणजे Canon EOS 40D, Canon EOS 1200D अश्या प्रकाराची असतात. यातला क्रमांक आणि D हे अक्षर कशासाठी आहे, EOS म्हणजे काय या गोष्टी काही केल्या उमगत नाही. मंडळी आज याचं गोष्टीबद्दलची तुमची शंका आम्ही दूर करणार आहोत.

ही गोष्ट अधिक सोप्या रीतीने समजून घेता यावी म्हणून आपण इथे कॅनन कंपनीच्या Canon EOS 40D या कॅमेऱ्यांचं उदाहरण घेऊ.
या मॉडेलमधील कॅनन हे तर झालं कंपनीचं नाव. त्याच्यापुढे आहे EOS, या EOS चा अर्थ आहे- Electro-Optical System!
१९८७ मध्ये कॅननने त्यांचा पहिला EOS कॅमेरा सादर केला होता- EOS 650. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या मॉडेलच्या नावामध्ये D हे अक्षर नाही. कारण D चा अर्थ होतो Digital आणि EOS 650 हे मॉडेल डिजिटल नव्हते. ८० च्या काळातील जवळपास सर्वच कॅमेरे हे फिल्म वर चालायचे, त्या काळी हळू हळू डिजिटल कॅमेऱ्याची संकल्पना आकारास येत होती.
आणि जेव्हा ही संकल्पना अस्तित्वात आली तेव्हा कॅनन कंपनीने लोकांचा गोंधळ उडू नये आणि त्यांना डिजिटल आणि डिजिटल नसलेले कॅमेरे लगेच ओळखता यावेत यासाठी आपल्या नवीन डिजिटल कॅमेऱ्यामध्ये D हे अक्षर वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून ज्या मॉडेलच्या नावावामध्ये D हे अक्षर आहे ते कॅमेराचे मॉडेल डिजिटल आहे हे लगेच ओळखता यावे. पुढे सर्वच कंपन्यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी ही पद्धती सुरु केली. आता तुमच्याही लक्षात आले असेल की काही काही मॉडेल मध्ये D हा शब्द का नसतो.

आपण EOS आणि D या दोन गोष्टींबद्द्दल जाणून घेतले, आता जाणून घेऊया त्यांच्या दरम्यान असणाऱ्या क्रमांकांबद्द्दल!
जेथे केवळ एकच क्रमांक असेल (5D) ती झाली प्रो रेंज. हे कॅमेरे अगदी प्रोफेशनल असतात, सर्व प्रकारचे हाय-एन्ड फीचर्स तुम्हाला यात मिळतात, पण त्यांचा वापर करणे ही तितकेच किचकट असते. सर्वोत्तम असल्याकारणाने या रेंजमधील कॅमेरे अतिशय महाग असतात.

जेथे दोन क्रमांक असतील (80D) ती झाली सेमी प्रो रेंज. हे कॅमेरे सेमी प्रोफेशनल असतात, यातील फीचर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल कॅमेऱ्याच्या आसपास असतात. प्रोसेसर आणि सेन्सर्सच्या बाबतीत या कॅमेऱ्यांना तोड नाही.

जेथे तीन क्रमांक असतील (600D) ती झाली प्रो-कन्ज्यूमर रेंज. हे कॅमेरे पूर्णत: प्रोफ्रेशनल नसतात, ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे, थोडी फार जाण आहे अश्यांसाठी हे खास कॅमेरे आहेत. यांची किंमत देखील काहीशी महाग वाटत असली, तरी ज्यांना फोटोग्राफीचं खरंच पॅशन आहे त्यांनी या रेंजच्या कॅमेऱ्यांपासून सुरुवात करायला हरकत नाही.

जेथे चार क्रमांक असतील (1200D) ती झाली कन्ज्यूमर रेंज. ह्या रेंजच्या कॅमेऱ्यामध्ये अगदीच बेसिक फीचर्स असतात. ज्यांना केवळ डीएसएलआर हवा आहे आणि त्याने केवळ फोटो काढायचे असतील, त्यांच्यासाठी हे कॅमेरे उत्तम आहेत, कारण त्यांची किंमत फारशी महाग नाही आणि आपला फोटोग्राफीचा छंद देखील जोपासता येतो. आजकाल बरेच जण जे काही डीएसएलआर कॅमरे घेऊन फिरतात ते याचं रेंजमधले असतात.

आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी D या अक्षरापुढे x हे इंग्रजी अक्षर देखील पाहिले असेल, तर मित्रहो त्याचा अर्थ आहे की ते मॉडेल पूर्वीच्या मॉडेलचे न्यू व्हर्जन आहे आणि त्यात काही अॅडीशनल फीचर्स आहेत. उदा.- canon EOS 1Dx

—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
जगात फक्त कॅनन च DSLR कॅमेरा बनवते ? आणि मग निकॉन आणि सोनी काय बनवतात ? वाशिंग मशीन ??
Wht Abt Nikon, Sony, Fuji etc??