हे कोणतेही स्पेसशिप नाही, हे आहे स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क’ !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तसं तर प्रत्येक व्यावसायिकाला वाटत असते की आपण जे काम करतो, जी कंपनी चालवतो तिचे स्वतंत्र, नीटनेटके ऑफिस असावे, पण स्टीव्ह जॉब्सचे मात्र आपल्या स्वप्नातील ऑफिसबद्दल इतरांपेक्षा काहीसे वेगळे विचार होते.

steve-jobs-marathipizza01
iphonehacks.com

अॅप्पलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्स ह्याचे एक  स्वप्न होते की आपण ज्या कंपनीला जन्म घातला त्याचे एक शानदार, भन्नाट आपल्या स्वपानातील ऑफिस असावे, जेथे आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट असावी, एका लहान मुलाप्रमाणे ते ऑफिस सजवावे, तेथे येणारा प्रत्येक जण त्या ऑफिसच्या प्रेमात पडला पाहिजे. कर्मचारी तर ऑफिस सोडून कुठे जाण्याचा विचारही करणार नाहीत इतके दिमाखदार, सर्वाना हवेहवेसे वाटणारे प्रचंड मोठे ऑफिस निर्माण निर्माण करण्याची त्याची इच्छा होती, दुर्दैवाने अगदीच कमी वयात स्टीव्ह जॉब्सचा मृत्यू झाला, पण त्याच्या सहकाऱ्यांनी मात्र त्याची इच्छा अपूर्ण ठेवली नाही, त्यांनी उलट शक्य तितक्या लवकर स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘अॅप्पल पार्क उभे करण्याचे प्रयत्न केले आणि त्यांच्या त्या प्रयत्नांचे मूर्त रूप आता आपल्याला पाहायला मिळत आहे.

हो खरंच स्टीव जॉब्सच्या स्वप्नातील ‘ते’ ऑफिस आता तयार झाले आहे.

apple-park-marathipizza01
content.newsinc.com

कॅलिफोर्नियातील क्यूपरटिनोत वरील चित्रात दाखवलेली अलिशान बिल्डींग स्थित आहे. तब्बल १३ हजार कर्मचारी ह्या बिल्डींगमध्ये सामावले जाऊ शकतात इतकी प्रचंड मोठी हि बिल्डींग आहे.

या नव्या बिल्डिंगला ‘अॅपल पार्क’ नाव दिले गेले आहे, जे स्पेसशिप सारखे आहे.  सुमारे १७५ एकरात पसरलेले हे ऑफिस जगातील सर्वात मोठे ईको फ्रेंडली ऑफिस आहे.

apple-park-marathipizza02
cdn.vox-cdn.com

ऑफिसच्या बाहेरच नाही, तर कॅम्पस एरियात इतकी हिरवळ आहे की, कर्मचा-यांना निसर्गाच्या सानिध्यात असल्यासारखे वाटेल. ऑफिसमध्ये नैसर्गिक हवा आणि सुर्यप्रकाश येईल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. ज्यामुळे वर्षातील नऊ महिने ऑफिसमध्ये एसीची गरज खूपच कमी राहील.

apple-park-marathipizza03
wikimapia.org

या बिल्डिंगची खास बाब ही की, याच्या पायाभरणीत ७०० ‘बेस आयसोलेशन’ जोडले गेले आहेत, ज्यात भूकंप आला तरी इमारतीला नुकसान होणार नाही. आत्पकालीन स्थितीला तोंड देण्यासाठी कॅम्पसमध्ये रूग्णालय, फायर हाऊस, पोलिस स्टेशन यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. येथे एक हजार लोक बसू शकतील या क्षमतेचे एक ऑडिटोरियम सुद्धा बनवले गेले आहे, ज्यात कंपनीचे अधिकारी कंपनी संबंधित माहिती मीडिया आणि अन्य इतर लोकांशी देऊ शकतील.

apple-park-marathipizza04
idownloadblog.com

या बिल्डिंगसाठी एकून ३३ हजार ४१२ कोटी रूपये इतका खर्च आला आहे. चार मजली इमारतीत सर्वात मोठे ३६० डिग्रीत कोडवर वाकलेले ग्लास लावलेले आहेत. या ऑफिसचे पूर्ण डिझाईन अॅप्पलचे संस्थापक स्टीव जॉब्सने २०११ मध्ये केले होते. हे ऑफिस जॉब्सचे स्वप्न मानले जाते. मात्र,५ ऑक्टोबर २०११ मध्ये त्याचे निधन झाले. त्याच्या स्मरणार्थच तेथे एक थिएटर बनवले गेले आहे.

apple-park-marathipizza05
i2.cdn.turner.com

ह्या ऑफिसमध्ये काम करताना नेहमी कर्मचाऱ्यांना स्टीव्ह जॉब्स आणि त्याचे प्रेरणादायी विचार आठवतात, जे त्यांना अगदी चिकाटीने आणि ध्येयाने काम पूर्ण करण्यास मदत करतात.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?