भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


आपण भारताचे नागरिक म्हणून ह्या देशात राहतो, पण आपण फक्त ‘राहतो’. ह्या देशाने आपल्याला दिलेले अधिकार, हक्क, कायदे काही संबंधित बाबी आपल्याला बिलकुल माहित नसतात, ज्या प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया अश्याच काही गोष्टी!

१) जर तुमच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर तुम्हाला जवळपास ४० लाख रुपयांची भरपाई मिळू शकते.

 

rights-marathipizza01
radiotnn.com

आज प्रत्येक घरात गॅस सिलेंडर पाहायला मिळतो, पण त्या घरातील लोकांना मात्र ह्याची काहीच कल्पना नसते की जर त्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या दुर्घटनेत जीवितहानी झाली वा मालमत्तेचे नुकसान झाले तर त्या कुटुंबाला ४० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते.

 

२) एखादी भेट वस्तू स्वीकारणे म्हणजे लाच स्वीकारण्याच्या पातळीचे आहे

 

rights-marathipizza02
timesofindia.indiatimes.com

आपले एखादे काम पूर्ण केले म्हणून बऱ्याच कंपन्या अधिकाऱ्यांना भेट वस्तू पाठवतात. पण तुम्हाला हे माहित असायला हवे की अश्या भेटवस्तू म्हणजे लाच गृहीत धरली जाऊ शकते आणि ह्यासाठी स्वतंत्र कायदा देखील आहे बरं का! अधिक माहितीसाठी Foreign Contribution Regulation Act 2010 नक्की पहा.


 

३) केवळ महिला पोलीस कर्मचारीच महिला आरोपीला हात लावू शकतात

 

rights-marathipizza03
jamiiradio.com

कायद्याप्रमाणे महिला आरोपींना अटक करण्याचा अधिकार पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना नाही, त्यांना केवळ महिला पोलीस कर्मचारीच अटक करून पोलीस स्टेशनला आणू शकतात. एवढेच नाही तर महिला आरोपी रात्री ६ वाजल्या नंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत ह्या काळात पोलीस स्टेशनला येण्यास नकार देखील देऊ शकते. पण जर गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असेल तर महिला आरोपीला अटक करण्यासाठी दंडाधिकार्यांकडून लिखित परवानगी मिळवणे गरजेचे असते.

 

४) कर वसूली अधिकारी तुम्हाला अटक करू शकतो आणि तुमची मुक्तता ही करू शकतो

 

rights-marathipizza04
i.ytimg.com

करबुडवेगिरीचा प्रकार असेल तर कर वसुली अधिकाऱ्याला तुम्हाला अटक करण्याचा अधिकार आहे. पण तत्पूर्वी त्या अधिकाऱ्याने तुम्हाला समन्स धाडणे गरजेचे आहे. कर आयुक्त तुम्ही किती काळ अटकेमध्ये राहणार आहात हे ठरवतो, पण तुमची मुक्तता कधी होणार हे ठरवण्याचा अधिकार कर वसूली अधिकाऱ्याला असतो. आयकर कायदा १९६१ मध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख आहे.

 

५) लिव्ह इन रिलेशनशिप भारतात बेकायदेशीर नाही

 

rights-marathipizza05
jagranjosh.com

ह्या गोष्टीवरून लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, पण जर दोन्ही तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत लग्नाशिवाय राहण्यास तयार असतील तर ती गोष्ट बेकायदेशीर मानली जात नाही. तसेच घरगुती हिंसाचार कायद्यामार्फत स्त्रियांना संरक्षण मिळावे म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहताना पतीने सर्व जबाबदाऱ्या स्वीकारणे अनिवार्य असते.

 

६) जर तुम्हाला एकदा दंड ठोठावला तर त्यानंतर तुम्हाला दिवसभर सूट मिळते

 

rights-marathipizza06
telegraphindia.com

हेल्मेट शिवाय गाडी चालवल्यास दंड भरावा लागतो ही गोष्ट आपल्याला माहीतच आहे. पण तो दंड भरल्यावर मिळणाऱ्या चलान पावतीवर तुम्ही त्या दिवसाच्या मध्यरात्रीपर्यंत हेल्मेट शिवाय गाडी चालवू शकता. पण तरीही हेल्मेट घालूनच गाडी चालवलेले उत्तम!

 

७) जर तुम्हाला तुमचा मोबदला मिळालेला नाही तर तुम्ही त्याविरोधात तक्रार करू शकता

 

rights-marathipizAza07
policecomplaints.dc.gov

जर तुम्ही एखाद्याबरोबर एखाद्या कामाचा करार केला आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला त्या कामाचा मोबदला दिलेला नाही तर तुम्ही कायदेशीर न्याय मिळवण्यासाठी ३ वर्षांच्या आत तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर तक्रार दाखल केल्यास तुमचा दावा रद्द ठरवला जाऊ शकतो, त्यामुळे अशी फसवणूक झाल्यास शक्य तितक्या लवकर कायद्याचा आधार घेतला पाहिजे.

 

८) पीडीए करिता ३ महिन्यांचा कारावास

 

rights-marathipizza08
kerosene.digital

पीडीए अर्थात पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत शारीरिक प्रेम दर्शवणे. आपल्या भारतीय कायद्यानुसार पीडीएला काही प्रमाणातच परवानगी आहे. पण त्यात कोणतीही अश्लील वा गैरवर्तवणूक दिसली तर कायद्यामध्ये ३ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. कधी कधी पोलिसांकडून ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो आणि ते प्रेमी युगुलांना चूक नसताना त्रास देतात.

 


९) जर एक मुलगा असेल आणि दुसरा दत्त्तक घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तसे करू शकत नाही

 

rights-marathipizza09
i.dailymail.co.uk

Hindu Adoptions and Maintenance Act, 1956 मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जर तुम्ही हिंदू धर्मीय असाल आणि तुम्हाला एक मुलगा आहे किंवा तुमच्या मुलाला मुलगा (नातू) आहे किंवा तुमच्या मुलाच्या मुलाला देखील मुलगा (पणतू) आहे तर तुम्ही अजून एक मुलगा दत्तक घेऊ शकत नाही. हीच गोष्ट मुलीच्या बाबतीत सुद्धा लागू होते. तसेच ह्या कायद्यामध्ये अजून एका गोष्टीचा उल्लेख आढळतो की तुमच्या स्वत:च्या मुलामध्ये आणि तुम्ही दत्तक घेत असलेल्या मुलामध्ये किमान २१ वर्षांचा फरक असला पाहिजे.

 

१०) हेड कॉन्स्टेबलकडे मर्यादित फिर्यादी अधिकार असतात

 

rights-marathipizza10
i1.wp.com

कोणताही हेड कॉन्स्टेबल तुम्हाला अश्या कोणत्याही गुन्ह्यासाठी दंड आकारू शकत नाही ज्या गुन्ह्याच्या दंडाची रक्कम १०० रुपयांपेक्षा जास्त आहे. पण जर तुम्ही एका पेक्षा जास्त कायद्यांचे उल्लंघन केले तर मात्र हेड कॉन्स्टेबल जास्त दंड आकारू शकतात. ही सूचना दिल्ली पोलिसांकडून प्रसारित कारण्यात आली होती.

तर मंडळी अश्या आहेत काही गोष्टी, अजून काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा!


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
4 thoughts on “भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहित असायलाच हव्यात अश्या ‘१०’ गोष्टी!

 • October 4, 2017 at 1:28 am
  Permalink

  Plz upload procedure Of right to information act and how to apply Grahak manch by law..?

  Reply
 • January 17, 2018 at 2:28 pm
  Permalink

  vry nice job & powerfull information For all personel people.

  Reply
 • May 9, 2019 at 3:16 pm
  Permalink

  उत्तम माहिती

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?