तंत्रज्ञानाचा नैतिक पेच : व्यक्तीमध्ये असणारी नैतिकता यंत्राकडे कशी असेल?

 

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

‘Dilemma’ किंवा दुविधा हा शब्द तसा आपल्याला नवीन नाही. आपली निर्णय क्षमता तेव्हा पणाला लागते जेव्हा आपल्याला दोन किंवा अधिक वाईट पर्यायां पैकी एक निवडायचा असतो. dilemmaच्या अर्थाच्या जवळ जाणारे हेच स्पष्टीकरण असावे. Ethics चा अभ्यास करणाऱ्यांनी अशा नैतिक दुविधांमध्ये आपण कसे वागू हे पडताळण्यासाठी काही Thought Experiment वापरले आहेत.

असे प्रसंग ज्या मध्ये आपली नैतिकता आणि logic या दोन्ही ना परस्पर विरोधी भूमिका घ्यावी लागेल, हे प्रत्यक्ष प्रयोग करून तपासणे अशक्य असू शकते. त्यामुळेच वैचारिक प्रयोग किंवा thought experiment उपयुक्त ठरतात.

याचं एक उदाहरण म्हणजे ब्रिटीश तत्त्ववेत्त्या Philippa Foot यांनी मांडलेला ‘Trolley Problem’. कल्पना करा कि तुम्ही एका रेल्वे रूळा पासून काही अंतरावर उभे आहात. ह्या रूळावर पाच लोक काही काम करताना तुम्हाला दिसत आहेत. त्याच वेळी एक trolley या रूळा वरून वेगाने या पाच लोकांच्या दिशेने येत आहे. सुरक्षित अंतरा वरून पाहणारे तुम्ही मात्र ह्या लोकांना हे सांगू शकत नाही किंवा कुठलाही सिग्नल देऊ शकत नाही. पण तुमच्या जवळ एक स्वीच आहे जे वापरून तुम्ही trolley ला दुसऱ्या रूळावर वळवू शकता. आता ह्या रूळा वर एक व्यक्ती आहे ज्याला सुद्धा येणाऱ्या trolley चा अंदाज नाही. तुम्ही हे स्वीच वापराल का?

इथे तुम्ही स्विच वापरण्याचा अर्थ आहे की तुम्ही एका व्यक्तीच्या मृत्यूला जाणीवपूर्वक रित्या जबाबदार आहात. आणि स्विच न वापरण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पाच व्यक्तीना वाचवणे शक्य असताना तसे न करणे पसंत केले.

ह्या पेचप्रसंगात उपयुक्ततावाद असे सांगेल की पाच लोकांचे आयुष्य वाचवणे हे एका व्यक्तीला वाचवण्या पेक्षा महत्वाचे आहे म्हणूनच स्विच वापरणे योग्य आहे. कदाचित हेच उत्तर ९०% लोक देतील. Immanuel Kant ची नैतिक स्पष्ट अनिवार्यता (categorical Imperetives) कदाचित असे सांगेल की कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणे हे चुकीचे असणे ही गोष्ट वैश्विक आहे.

 

immanuel-kant-russia-shot-inmarathi
encrypted-tbn0.gstatic.com

म्हणजेच जरी पाच लोकांचे प्राण वाचत असतील तरीसुद्धा त्यासाठी एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरणे चुकीचेच असेल म्हणजेच स्विच चा वापर करणे चूक.

त्यात जर वरील trolley problem मध्ये थोडासा बदल केला, जसे की दुसर्या रूळावर एक अनोळखी व्यक्ती ऐवजी तुमच्या ओळखीचं कोणी असेल, किंवा तेथे लहान मूल असेल तर बऱ्याच लोकांची स्विच वापरण्या बद्दल ची प्रतिक्रिया बदललेली असेल.

आता ह्या काल्पनिक शक्यतेविषयीच्या thought Experiment ची उपयुक्तता याआधी फक्त तत्वज्ञान किंवा नैतिक चर्चे पुरती असेल पण आता ह्यांचा विचार तंत्रज्ञांना पण करावा लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आणि ह्याचं कारण म्हणजेच Artificial Intelligence किंवा self driving cars सारखं उदयाला येणारं तत्वज्ञान.

अतिप्रगत तंत्रज्ञाना च्या समस्या हा तसा चित्रपटांचा विषय आहेच.पण चित्रपटातल्या आभासी जगातल्या थरारक चित्रणापलीकडेही काही समस्या वास्तव जगात येण्याच्या मार्ग वर आहेत.

ह्यातली एक समस्या म्हणजे self driving cars. इथे स्वयंचलित म्हणणे उचित ठरले असते पण स्वयंचलित किंवा automatic हा शब्द आपण तंत्रज्ञानाच्या कृत्रिम रित्या बुद्धिमान होण्याच्या अवस्थे आधीच खूप वापरून गुळगुळीत करून टाकलाय. साधारणतः गुंतागुंतीच्या यांत्रिक प्रक्रियेतील एखादी क्रिया जरी automatic झाली तरी ती आपल्यासाठी सोयच असते. स्वयंचालितते मध्ये काळानुसार होणार्या सुधारणा ह्या नेहमीच अधिकाधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियांना automatic करणाऱ्या असतात. संपूर्ण स्वयंचलित म्हणजे मानवी हस्तक्षेपाची गरजच न उरणे.

 

cars-inmarathi
encrypted-tbn0.gstatic.com

नजीक च्या भविष्यात आपण खऱ्या अर्थाने स्वयंचलित असणाऱ्या, म्हणजेच चालकाविना चालणाऱ्या cars बद्दल फार आश्चर्य वाटून घेणार नाही असे सध्या दिसते आहे. रस्ते, सभोवतालचे वातावरण, यांचा अंदाज घेऊन, मानवी मदतीशिवाय वाहन चालवणे, मग यात GPS, रडार, कॅमेरे, वगैरे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून माहिती गोळा करणे अन् ह्या माहिती वरून संगणकाने वाहन नियंत्रण करणे हे ओघानेच आले.

अशा autonomous cars च्या तंत्रज्ञान विकसित करण्याच्या स्पर्धेत आता Tesla, Google सारख्या कंपन्या आहेत. एखाद्या दशकाच्या आत आपल्याला अशा प्रकारची वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आलेली दिसू शकतील.

अर्थातच ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा, जसे कि रस्ते, वाहतूक नियमन वगैरे आधीच विकसित आहेत त्याच ठिकाणी हे शक्य होऊ शकेल. त्यामुळे हे आपल्यापर्यंत येण्यास पुरेसा अवकाश आहे हे गृहीत धरूनच चालू. ह्या संकल्पनेमध्ये फक्त पायाभूत सुविधा किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगती, किंवा आर्थिकदृष्ट्या या व्यवहार्यतेच्याच समस्या आहेत असे नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा trolley problem कडे पाहू. कल्पना करा की नजीकच्या भविष्यात तुम्ही तुमच्या self driving कार मध्ये बसून हायवे वरून वेगाने जात आहात. तुमच्या lane मध्ये समोर एक ट्रक आहे. अचानक ह्या ट्रक मधून अवजड सामान काही कारणाने खाली पडायला सुरुवात होते, पण तुमच्या वेगामुळे तुम्हाला वेळेत थांबणे शक्य नाही.

आता तुम्हाला तुमचा अपघात टाळण्या साठी कार उजव्या किंवा डाव्या lane मध्ये वळवणे भाग आहे. आता समस्या अशी आहे की उजव्या lane मध्ये ५-६ लोक असलेली एक van आहे ज्यावर तुम्ही आदळू शकता व कदाचित एक अपघात करून अपघाताची तीव्रता तुमच्या पुरती कमी करू शकता.

पण ह्यात तुम्ही त्या van मधील लोकाचे प्राण धोक्यात घालत आहात. तुम्ही डाव्या बाजूला वळू शकता पण तेथे एका motorcycle ला धडकून motorcycle स्वार व्यक्तीचा जीव तुम्ही धोक्यात घालत आहात. ह्या प्रसंगा मध्ये पेच असा आहे की self driving कार चे software हे कसे ठरवणार की कुणाचे आयुष्य धोक्यात टाकावे ?

मुळात जी नैतिकता आपण व्यक्ती कडून अपेक्षित करतो ती एका machine मध्ये कशी प्रोग्राम करावी ? समजा आपण कार चे software उपयुक्ततावादी बनवले तर ते एक तर motorcycle स्वाराला धडकण्याचा निर्णय घेईल किंवा van मधील लोकांची वाचण्याची शक्यता calculate करेल व त्यांना धडकण्याचा निर्णय घेईल.

 

selfdrive-inmarathi
www.roboticsbusinessreview.com

पण कुणालाही मारण्यास कारणीभूत न ठरण्यासाठी प्रोग्राम केलेले software मात्र कदाचित कुणालाही धडकण्याचा निर्णय न घेता अपघात होऊ देईल व कदाचित तुमचा म्हणजेच कार मधील व्यक्तीचा जीव धोक्यात घालेल. ह्याहून ही महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्यापैकी कुठलाही अपघात ह्या कार ने केला तर होणाऱ्या जीवित हानी ला जबाबदार कोण असणार ? तुम्ही ? कार चे software ? की ते बनवणारा programmer ? शिक्षा कोणास देणार ?

हेच जर एका व्यक्तीने कार चालवताना घडले तर तो त्याच्या निर्णयाला त्यांच्या परिणामाला जबाबदार असेल. शिवाय त्याचा ह्या प्रसंगातील निर्णय हा परिस्थितीजन्य प्रतिक्रिया म्हणूनच समजला जाईल.

पण self driving कार च्या बाबतीत programmer ने खूप आधी गाडीचे software बनवेलेले असेल म्हणजे तेव्हा हा निर्णय एकप्रकारे सुनियोजित हत्येच्या प्रयत्ना सारखा दिसेल. तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे असे बरेच पेच प्रसंग समोर येतील. self driving cars प्रमाणे स्वयंचालित drones समोर प्रश्न असेल की एखादा कुख्यात आतंकी तळ नष्ट करताना जर काही सामान्य लोकांना हानी पोहोचणार असेल तर निर्णय काय घ्यावा ?

ह्याच पद्धतीचा पेच २०१५ साली आलेल्या ‘Eye in the Sky’ ह्या चित्रपटात मांडण्यात आलेला पाहण्यात आला. ह्या सर्व पार्श्वभूमी वर आज कदाचित इतिहासात पहिल्यांदा तंत्रज्ञानात तज्ञासोबत काम करावे लागेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?