पिकनिकचा संपुर्ण आनंद लुटण्यासाठी ह्या छोट्या गोष्टी विसरू नका!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आवश्यक असते ती पिकनिक ची संजीवनी. स्वतःच्या क्युबिकल मध्ये बसुन कुठेतरी बाहेर निघुन जावं महिनाभर असं प्रत्येक जण म्हणत असतो. दर आठवड्याच्या सुट्टीचा एक वेगळा प्लॅन शुक्रवारपासुनच तयार होऊ लागतो. काही जण भटके असतात त्यांना शरीर संपूर्ण थकवणे म्हणजे पिकनिक असते तर काही लोक नुसतं गाडीत कुठेतरी फिरून यायला पिकनिक म्हणतात. पण काहीही असो प्रत्येकाला पिकनिक ला बाहेर फिरून मजा येतेच ना?

कधीकधी काही क्षुल्लक कारणांमुळे ह्या सगळ्या गोष्टींना एन्जॉय करायला आपण मुकतो. ती कारणं रस्ता चुकणे, प्रत्येकाचा प्राधान्यक्रम बदलणे, जेवणाच्या वेळा, रुसवे-फुगवे  एवढी क्षुल्लक असतात. पण जर तुम्हाला ह्यासारख्या गोष्टींमुळे आपला पिकनिकचा मूड घालवायचा नसेल तर आम्ही देतोय एक चेकलिस्ट. प्रत्येक वेळी पिकनिक ला जाताना ही चेकलिस्ट तुम्हाला मदत करणार आहे.

तर कधीही पिकनिक ला जाताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी..

कुठं जायचंय जे नक्की करा.

पिकनिकचं ठिकाण आणि जायचा रस्ता नेमका माहित करून घ्या. अश्याने वेळेवर कन्फ्युजन होणार नाही. आणि झालेल्या गोंधळाने कुणाचा मुड खराब होणार नाही.


First-Aid Box सोबत ठेवा

first-aid-marathipizza

अपघात कुणाला सांगून होत नाहीत. पण मग तुम्ही जिथे जाल तिथे काही झालं तर दवाखाना शोधत बसणार? त्यापेक्षा ठेवा ना First-Aid Box सोबत. गरज नाही पडली तर उत्तमच पण खबरदारी घेतलेली केव्हाही बरी.

पिकनिकचं साहित्य

picnic foldable chairs marathipizza

मुक्कामी कुठे जाणार असाल तर सोबत पांघरून पटकन घडी घालता येतील आणि कमी जागेत बसतील असे घ्यावे. मोठे किंवा लहान सोबत असतील तर त्यांच्यासाठी फोल्डिंगच्या खुर्च्या सोबत ठेवाव्या. शक्यतो सोबतच्या सामानाचं वजन जरा हलकंच ठेवा ते म्हणतात ना – Travel Light!

आवडत्या काही गोष्टी सोबत ठेवा

picnic books marathipizza

तुम्ही जर एखाद्या  हॉटेल मध्ये मुक्कामी असाल तर तुमचा कंटाळा घालवण्यासाठी तुमचं आवडतं पुस्तक सोबत असायलाच हवं किंवा तुम्ही जर कुठे मोकळ्या जागेवर फिरायला गेले असाल तर तुमचं आवडतं बॅट बॉल सोबत असायलाच हवं ना?

पिकनिकची न्याहारी

basket picnic marathipizza

दिवसभर पुरेल एवढं पाणी सोबत ठेवा. तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करायचा आहे ह्या अंदाजाने अन्न सोबत घ्या. शक्यतो अन्नपदार्थ कमी किचकट घ्या. सॅन्डविच, फळे, कबाब असे सोबत ठेवायला सोपे पदार्थ निवडा.

अन्न खाण्यासाठी Use & Throw ग्लास आणि ताटं वापरावे. अश्याने जेवण  किचकट होणार नाही. पण आपण केलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन जबाबदारीने करावे.

ह्या टिप्स अंमलात आणा आणि एकदम परफेक्ट पिकनिक एन्जॉय करा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

One thought on “पिकनिकचा संपुर्ण आनंद लुटण्यासाठी ह्या छोट्या गोष्टी विसरू नका!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?