औषधी गोळ्यांच्या पॅकेट्सवर रिकामी जागा का सोडण्यात येते? तुम्हाला माहित नसलेलं कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

औषध कशामध्ये मिळतात हो? तुम्ही म्हणालं लहान डब्बीमध्ये, बॉटल्समध्ये आणि चौकोनी, आयताकृती पॅकेट्समध्ये! आज आपण याच गोळ्यांच्या पॅकेट्सबद्दल रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत, जी तितकी महत्त्वपूर्ण वाटत नाही, पण त्यामागे देखील एक लॉजिक आहे, एक कारण आहे!

 

tablets-marathipizza01
turbosquid.com

तर डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शन नुसार आपण मेडिकल वाल्याकडून औषधांच्या गोळ्यांची पॅकेट्स घेतो. सहसा ही पॅकेट्स म्हणजे दहा गोळ्यांची पट्टी (स्ट्रीप) असते. पण बहुतेक गोळ्यांच्या पॅकेट्सची वेगळ्या प्रकारे देखील पॅकिंग केलेली असते. पण कोणतही पॅकेट्स पहा, एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात येईल की त्यावर खूप रिकामी जागा (space) आहे.

आज आपण जाणून घेऊया अशी रिकामी स्पेस देण्यामागचे कारण काय?

 

 

जेव्हा गोळ्यांची पॅकिंग केली जाते तेव्हा फक्त एकाच ठिकाणी ती गोळी असते, सभोवताली रिकामी जागा यासाठी असते जेणेकरून गोळी मध्ये असलेले रसायन हे इतर गोळ्यांमध्ये मिसळु नये व मिसळून हानिकारक प्रक्रिया (रीअॅक्शन) होऊ नये.

जर रसायनांचे मिश्रण झाले तर त्याचा उलट परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होऊ शकतो. तसेच अश्या प्रकारे  पॅकिंग केल्याने वाहतूक करताना गोळ्यांचे नुकसान होत नाहीत, त्या तुटत नाहीत, त्यांच्यावर बाहेरील वातावरणाचा परिणाम होत नाही.

 

tablets-marathipizza04
animalrightsextremism.info

हे झाले एक कारण, अजून एक कारण असे सांगितले जाते की, ज्या पॅकेट्समध्ये केवळ एकच गोळी असते.

 

 

त्यावर रिकामी जागा यासाठी सोडली जाते जेणेकरून पाकिटाच्या मागे तपशीलवार माहिती माहिती प्रिंट केली जावी.

 

tablets-marathipizza03
plus.google.com

आता तुमच्या लक्षात आलं असलेच की केवळ पॅकेजिंग आकर्षक दिसावी एवढच यामागे कारण नसून इतरही महत्त्वाची कारण आहेत.

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?