भारताचं “हवाई टायटॅनिक”…एका क्षुल्लक चुकीमुळे अरबी समुद्रात बुडालेलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१ जानेवारी १९७८, हा दिवस भारतीय इतिहासातील एक अतिशय वाईट दिवस आहे. याच दिवशी एअर इंडियाने आपला हवाई महाल म्हणजेच प्रसिद्ध ‘एम्पेरर अशोका’ हे विमान गमावले होते. आज आपण याचीच संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत.

 

emperor-ashoka-inmarathi03
thelallantop.com

१ जानेवारी १९७८ रोजी रात्रीचे ८:१५ मिनिटे झाली होती आणि मुंबईच्या सांताक्रुज विमानतळाहून एका अलिशान विमानाने झेप घेतली. एयर इंडियाने जी प्रसिद्ध बोईंग ७४७ सिरीज विकत घेतली होती त्या सिरीजमधील हे पहिले विमान होते. मोर्य वंशाचे महान सम्राट अशोक यांच्या नावावरून या विमानाचे नाव ठेवण्यात आले होते.

‘एम्परर अशोका’… विमानतळाहून उड्डाण घेतलेल्या विमानांची स्थिती जाणून घेणाऱ्या डिपार्चर कंट्रोलरने ८:१७ वाजता या विमानाचे पायलट मदनलाल कुकर यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, सर्व ठीक आहे. हा संवाद १ मिनिटं चालला असेल कदाचित, तोच काही क्षणांत एका विस्फोटाचा आवाज आला.

एम्पेरर अशोका आता अरब समुद्राच्या दिशेने पडत होते. उड्डाण घेतल्याच्या ३ मिनिटांतच हे २३१ फुटाचे विमान समुद्रात गहाळ झाले. यावेळी या विमानात १९० यात्री, २० फ्लाइट अटेंडेंट, २ पायलट आणि एक फ्लाईट इंजिनीअर देखील होता.

या २१३ लोकांना घेत या विशालकाय विमानाने जलसमाधी घेतली. या अपघातात कोणीही वाचू शकले नाही.

या विमानात एकूण ३४० यात्री बसू शकत होते, पण विमानाला उड्डाण घेण्यासाठी उशीर होत होता म्हणून अनेक प्रवाश्यांनी आपली तिकिटे रद्द करवून घेतली आणि नशिबाने ते वाचले.

 

emperor-ashoka-inmarathi02
scroll.in

१८ एप्रिल १९७१ रोजी या विमानाने मुंबईत आपले पहिले उड्डाण घेतले होते. १ जानेवारी १९७८ रोजी त्यांने आपली शेवटची झेप घेतली.
या विमानाला त्या दिवशी सकाळी ७:१५ मिनिटांनी दुबईकरिता निघायचे होते, पण ते तब्बल १३ तास उशिराने निघाले. याबाबत एअर इंडियाने आपल्या प्रवाश्यांना माफी मागत सांगितले की, विमानात काही टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे हा उशीर होतो आहे. कारण आदल्या दिवशी एका पक्ष्याने या विमानाच्या पंखाला धडक दिली होती. पण त्यानंतर त्याची दूरुस्ती करण्यात आली आणि सर्व बाबी तपासूनच याला रवाना करण्यात आले होते. एअर इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर अप्पूस्वामी यांनी सांगितले की, सर्व सुरक्षा तपासण्यात आली होती. जर खरंच असं होतं तर मग एवढा मोठा अपघात झालाच कसा?

 

emperor-ashoka-inmarathi05

 

७४७ बोईंग विमान हे काही साधेसुधे विमान नव्हते. या विमानात ४ इंजिन होते आणि हे विमान यातील सेफ्टी फीचर्सकरिता जगविख्यात होते. कुठल्या आपत्कालीन काळात जर याचे २ इंजिन बंद पडले तरी देखील इतर दोन इंजिनच्या भरवश्यावर हे विमान सुरक्षितपणे जमिनीवर लॅण्ड करू शकत होते. अमेरिकेत बनलेले हा एअरक्राफ्ट जगात ‘जम्बोजेट’च्या नावाने प्रसिद्ध होते, म्हणून अश्या विमानाचा अश्याप्रकारे अंत होणे खरच आश्चर्यकारक होते.

 

emperor-ashoka-inmarathi01
scroll.in

हे विमान म्हणजे एखाद्या महालापेक्षा कमी नव्हते, यात आतील भिंतींवर भारतीय शैलीतील अनेक उत्कृष्ट मुर्त्या लावण्यात आल्या होत्या. वरील मजल्याला अगदी शाही बनविण्यात आले होते. लाउंज, कालीन, सोफा, बार सर्वकाही येथे होते. विमानाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे रंगेबिरंगी वॉलपेपर लावण्यात आले होते. कुठे फुलांची थीम तर कुठे प्राणी-पक्षी. एअर इंडियाचा मेस्कट होता ‘महाराजा’. थोडा रॉयलपणा या महाराजा ने यायचा आणि बाकी सर्व एम्परर अशोकामुळे. म्हणू एअर इंडिया याला ‘हवाई महाल’ म्हणायची. याकरिता ज्या एअरहोस्टेस असायच्या त्या देखील खूप खास असायच्या. येथे या एअरहोस्टेस घागर-चोली घालून प्रवाश्यांना सेवा पुरवायच्या.

 

emperor-ashoka-inmarathi06
scroll.in

अशी ही शाही सवारी एम्परर अशोका क्रॅश होणे खरच एक धक्कादायक बातमी होती. याची माहिती मिळताच नौसेना आणि वायुसेना लगेच बचाव कार्यात लागली. पण आता त्यात वाचवायला कोणी उरलेच नव्हते.अनेक तासांच्या शोधानंतर देखील जव्हा कोणी जिवंत सापडले नाही तेव्हा बचाव दलाच्या एका अधिकाऱ्याने हताश होऊन सांगितले की, समुद्राने या विमानाला गिळंकृत केले.

या क्रॅशला सर्वात आधी इंडियन नेवी कमांडर सईद यांनी बघितले होते. ते अरबी समुद्रात गस्त घालत होते. त्यांनी बघितले तेव्हा, एम्परर अशोका ४५ डिग्रीच्या अॅन्गलने समुद्राच्या दिशेने जात होते. तेव्हा या विमानाची हेडलाईट देखील जळत होती. काही क्षणांनी एक जोरदार आवाज आला आणि बघता बघता हे विशालकाय विमान समुद्राने पूर्णपणे गिळले. चार दिवसांपर्यंत बचाव दलाला याचा एकही अवशेष सापडला नाही. त्यानंतर ६ जानेवारीला एका मासे पकडणाऱ्याने विमानाचा मागील भाग बघितला. समुद्रात दुरदुरपर्यंत तुटलेले अवशेष पसरलेले आढळले. यादरम्यान एम्परर अशोकाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर नौदलाच्या हाती लागला. या घटनेचा छडा लावण्याकरिता नौदलाने तो FDR वॉशिंगटन येथे पाठवला. जेणेकरून यामागील नेमके कारण कळेल.

 

PRABHAT-RANJAN-SARKAR-inmarathi
thelallantop.com

या घटनेच्या तपासात हे देखील कळले की, २८ डिसेंबर ला एअर इंडियाच्या लंडन येथील ऑफिसमध्ये एक धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने विमानाला हवेत उडवून टाकण्याची धमकी दिली होती. त्याकाळी एक बाबा होते प्रभात रंजन सरकार, प्रोग्रेसिव यूटिलाइजेशन थिअरी या बाबांची कुठलीशी थिअरी होती. म्हणजेच PROUT. म्हणून यांचे भक्त स्वतःला प्राउटिस्ट म्हणायचे. १९७१ साली या बाबांना एका खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती आणि यांचे भक्त यांना सोडविण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान असे समजले की, एम्परर अशोका अपघातामागे यांचाच हात आहे.

दुसरीकडे या अपघातात एका मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने अतिशय धक्कादायक माहिती दिली की, एम्पेरर अशोकाने दुबईला जाणाऱ्या जवळजवळ १२६ प्रवाश्यांनी आपले तिकीट रद्द केले, कारण त्यांना असे कळाले होते की, या विमानात बॉम्ब आहे.

 

emperor-ashoka-inmarathi
intoday.in

पण एअर इंडियाने ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. या विमानाला १३ तास उशीर झाला होता त्यामुळे या प्रवाश्यांनी तिकीट रद्द करून दुसऱ्या विमानाचे तिकीट घेतले असावे असे सांगण्यात आले. पण अचानक एवढ्या लोकांनी तिकीट रद्द का केले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्या सर्व प्रवाश्यांची देखील कसून चौकशी केली.

एम्परर अशोका बद्दल FDR वॉशिंगटनने दिलेल्या रिपोर्टनुसार त्याच्या अॅटिट्यूडमध्ये खराबी आली होती. विमानात एक गोष्ट असते “अॅटिट्यूड डायरेक्टर इंडिकेटर (ADI)”. ही मशीन पायलटला सांगते की जमिनीच्या पृष्ठभागाच्या हिशोबाने एअरक्राफ्टची स्थती काय आहे. म्हणजे डावीकडे आहे की उजवीकडे. सांताक्रुज उड्डाणपुलावरून उड्डाण घेतल्या नंतर एम्परर अशोका चा ADI खराब झाला, त्याने पायलटला असे संकेत दिले की, विमान उजव्या बाजूने वाकले आहे. पण तेव्हा विमान हे सरळ होते. हे संकेत बघून पायलटने विमानाला डाव्या बाजूने वाकवले, जेणेकरून विमान सरळ होईल. पण विमान तर आधीच सरळ स्थितीत होते, त्यामुळे त्याला डाव्या बाजूने वाकवल्याने विमानाचे नियंत्रण बिघडले आणि विमान क्रॅश झाले.

अशाप्रकारे या हवाई महालाचा अंत झाला आणि भारताने एक अलिशान, विशाल विमान गमावले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “भारताचं “हवाई टायटॅनिक”…एका क्षुल्लक चुकीमुळे अरबी समुद्रात बुडालेलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?