करोनाच संकटः तुमच्या सतत बरोबर असणारे हे घटक स्वच्छतेपासून दुर्लक्षित तर नाहीत ना?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आतापर्यंत करोना किंवा कोविड – १९ बद्दल तुम्ही बरंच वाचलं ,ऐकलं असेल.

 

china student inmarathi
firstpost

 

करोना रोगाची साथ भारतात पसरू लागली आहे. सध्या आपण  तिसऱ्या आठवड्याच्या शेवटाला आहोत आणि मागच्या आठवड्यापेक्षा यावेळी रुग्ण संख्या कैक पटीने वाढल्याचं दिसतं.

रविवार पर्यंत एकूण ३९६ रुग्ण आढळून आलेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय सोमवार पासून लागू केला आहेच.

 

work from home inmarathi 1
business insider india

 

आपल्यापैकी बहुतांश जण घरूनच काम करत असतील. बहुतेक ऑफिसेस ने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत.

संचारावर मर्यादा आल्याने करोना विषाणूचा फैलाव कमी होण्यास मदत होईल हाच त्याच्या मागील उद्देश!

घरी बसून आपलं काम करताना आपला बऱ्याच इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मदत घ्यावीच लागते.

घरून काम करतांना आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त इतरांशी संपर्क येण्याची शक्यता नसतेच. त्यामुळे आपल्याला कुठलाही संसर्ग होणार नाही याबद्दल आपण निश्चिन्त असतो.

पण जरा थांबा, लगेच इतके बिनधास्त होऊ नका.

भले आपण दर तासाला साबणाने किंवा अल्कोहोल युक्त सॅनेटायझेर वापरून हात स्वच्छ करत असू पण दिवसातले काही तास ज्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटसना आपण हाताळणार आहोत ते किती स्वच्छ आहेत?

 

laptop and phones inmarathi

 

आपल्या सगळ्यांनाच माहिती असेलच की करोना हा विषाणू ग्रस्त व्यक्ती खोकल्याने किंवा शिंकल्याने बाहेर पडणाऱ्या द्रव थेंबांमुळे – ड्रॉप्लेट्स पसरतो.

अश्या रुग्णाचे ड्रॉप्लेट्स जिथे पडतात त्या भागाला जर निरोगी व्यक्तीचा संपर्क झाला तर त्या व्यक्तीच्या हाताद्वारे चेहऱ्या पर्यंत विषाणू पसरून त्याला कोरोना ची बाधा होऊ शकते.

 

cold inmarathi
healthflex.com

 

म्हणून हात धुणं ,मास्क वापरणं यांसारखे प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर आपण धन्यता मानत आहोत.

परंतु दिवसातले बरेच तास जी यंत्रे आपण वापरतो जर त्यावर हा विषाणू असेल तर?

आपले हात आपण कितीही वेळा धुतले तरी, या यंत्रांना वापरतांना जर एखाद्या बाधित व्यक्तीचे ड्रॉप्लेट्स त्या यंत्रावर उडाले असतील तर आपल्या हाताला हा विषाणू अगदी सहज चिटकू शकतो!

 

 

करोना मानवी शरीराबाहेर किती काळ जिवंत राहू शकतो हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी बरेच प्रयोग करून पाहिले आणि त्याचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते.

करोनाचे विषाणू स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिक वर जवळपास ३ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.

यात असंही दिसून आलं की कार्डबॉर्ड सारख्या पृष्ठभागावर कोरोना विषाणू २४ तासांपर्यंत जिवंत राहू शकतो.

तांबं मात्र या विषाणूला ४ तासांपेक्षा जास्त जगू देत नाही. हा प्रयोग करताना शास्त्रज्ञांनी, आपल्या श्वसननलिकेत साधारणतः एका वेळेस उपलब्ध असणाऱ्या विषाणू संख्येइतक्याच विषाणूंवर प्रयोग केला.

जर त्यांनी अधिक विषाणू घेतले असते तर कदाचित ते जास्त काळ ही जिवंत राहू शकले असते!

तुम्ही आता घरून काम करण्यासाठी जो लॅपटॉप वापरत आहात तो काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये कोणी इतर वापरत असेल.

 

laptop use inmarathi
technoogy

 

त्याला बऱ्याच लोकांनी वापरतांना स्पर्श केला असेल. समजा या पैकी एखाद्याच्या हातावर कोविद-१९ विषाणू आला असेल किंवा ऑफिस मध्ये कोणी बाधित व्यक्ती शिंकली असेल आणि त्याचे ड्रॉप्लेट्स तुमच्या लॅपटॉप किंवा त्याच्या चार्जेर वर उडाले आणि त्या नंतर तुम्ही ते हाताळतांना तुम्ही नकळत या विषाणू च्या संपर्कात याल.

चला तर मग जाणून घेऊया अश्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटस बद्दल ज्यात कोरोनाच नाही तर इतर फ्लू देणारे विषाणू सुद्धा असू शकतात.

मोबाईल

एक महत्वाची वस्तू जी सतत सावली सारखी आपल्या सोबत असते ती म्हणजे आपला मोबाईल!

मोबाईल आपण बऱ्याच ठिकाणी वापरत असतो.  बस, ट्रेन, ऑफिस काही लोकं तर टॉयलेट्स मध्ये सुद्धा घेऊन जातात.

 

phones in trains inmarathi
oddmedia.com

 

जर एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती तुमच्या घरी आली किंवा अश्या व्यक्तीच्या ड्रॉप्लेट्स तुमच्या मोबाईल स्क्रीन वर उडाले तर कोविद-१९ विषाणू तुमच्या फोन मार्गे अगदी सहज आपल्या चेहऱ्यावर येऊन नाकात जाऊ शकतो.

वर सांगितल्या प्रमाणे हे आता सिद्ध झालं आहे की, हा विषाणू काही दिवस मानवी शरीराबाहेर जिवंत राहू शकतो.

मोबाईल सारख्या वस्तू वर जिथे न दिसणारी धूळ लागलेली असते, अश्या ‘पोषक’जागी तर तो कदाचित जास्ती काळ सुद्धा जिवंत राहू शकतो.

त्यामुळे आवश्यक आहे की, आपला मोबाईल वापरताना आपण त्याच्या स्वच्छतेची सुद्धा खाली दिलेल्या उपायांनी काळजी घेऊ शकतो.

१) टिश्यू पेपर किंवा वेट वाइप्स वापरून आपण मोबाईल ची स्क्रीन स्वच्छ करू शकतो.

 

cleaning of phone inarathi

 

फक्त वेट वाइप्स ने स्क्रीन साफ करताना त्याचं रसायन फोन मधे जाणार नाही याची काळजी घ्यावी.

२) टूथपिक वापरून मोबाईलच्या बाजूच्या कडा साफ करता येतील.

३) जर तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ असेल, तर तुम्ही त्याला वाहत्या पाण्याने धुऊ शकता पण, त्याला पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकू नका.

 

clean phone inmarathi

 

लॅपटॉप आणि चार्जेर,माउस

वर्क फ्रॉम होममुळे बऱ्याच जणांना लॅपटॉप दिले असतील.

तुम्हाला आज दिलेला लॅपटॉप हा काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांनी हाताळलेला असतो. कदाचित तो बाहेरील देशातुन सुद्धा आलेला असू शकतो!

उदा. तुमच्या ऑफिसच्या सिस्टिम किंवा हार्डवेअर डिपार्टमेंटच्या टीम ने तुम्हाला लॅपटॉप देण्यापूर्वी त्यात आवश्यक सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल केले असतील. कदाचित तुमच्या अगोदर दुसरं कोणी तो लॅपटॉप वापरत असेल.

 

click inmarathi
lifewire

 

जर दुर्दैवाने एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीचा संपर्क त्या यंत्राला झाला असेल तर लॅपटॉप वर सुद्धा तो विषाणू उतरला असण्याची शक्यता निर्माण होते.

मोबाईल प्रमाणे लॅपटॉप सुद्धा टिश्यू पेपर ने साफ करता येईल. जुन्या ब्रश ने कीबोर्ड मधली धूळ अलगदपणे साफ करता येईल.

लॅपटॉप चा पृष्ठभाग साफ करण्यासाठी वेट वाइप्स वापरता येईल. मात्र लॅपटॉप च्या मधल्या भागात कुठलाही द्रव पदार्थ किंवा रसायन जाणार नाही याची काळजी घ्या.

 

laptop cleaning inmarathi
kim kamando

 

लॅपटॉपचा चार्जर किंवा माउस सुद्धा अश्या प्रकारे बऱ्याच लोकांनी हाताळलेला असू शकतो. त्याला तुम्ही वेट वाइप्स ने पुसू शकता.

ब्लूटूथ

आपल्यापैकी बरेच जण याचा वापर कॉल्स करण्यासाठी करत असतील.

हे यंत्र मोबाईल प्रमाणेच आपल्या चेहऱ्याच्या अगदी जवळ कानापाशी अडकवलेलं असतं.

 

bluetooth inmarathi
security intilligance

 

ब्लुटूथ लावून जर तुम्ही गर्दी मध्ये गेला असाल तर एखाद्या बाधित व्यक्तीचे ड्रॉप्लेट्स त्यावर सुद्धा राहू शकतात.

हे उपकरण सुद्धा तुम्ही टिश्यू पेपर आणि टूथपिकचा वापर करून साफ करू शकता.

वाय-फाय राउटर

बऱ्याचदा ऑफिस कडून इंटरनेटसाठी पोर्टेबल राउटर सुद्धा दिले जातात.

जर घरी तुमचा राउटर फिक्स असेल तर त्याच्या पर्यंत विषाणू पोचण्याची शक्यता नसते परंतु जर तुम्हाला दिलेला राऊटर हा ऑफिस मध्ये कोणी अजून वापरत असेल तर विषाणू पसरण्याची भीती असतेच.

 

wifi inmarathi

 

या उपकरणाला सुद्धा तुम्ही वेट वाइप्स ने साफ करू शकता.

टिव्ही रिमोट किंवा लँड लाईन फोन

या आपल्या घरगुती वापराच्या वस्तू त्यामुळे तिथे विषाणू येण्याची शक्यता नसतेच, पण जर बाहेरून आपल्याकडे कोणी बाधित व्यक्ती आली आणि त्यांनी जर ह्या गोष्टी हाताळल्या तर यांच्या द्वारे सुद्धा विषाणूच वहन होऊ शकतं.

 

tv remote inmarathi

 

या गोष्टी सुद्धा वेट वाइप्स ने पुसून स्वच्छ करता येतील.

या शिवाय आपल्या दैनंदिन ऑफिस कामानिमित्त वापरात येणाऱ्या वस्तू जसे की हेडफोन, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप बॅग ज्यांच्या आपल्या शरीराशी खूप जवळून संपर्क येतो त्यांची स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्वाची आहेच.

मागच्या आठवड्यात पुण्यात जी ऑफिसेस चालू होती तिथे येणाऱ्या वाहनांवर जंतुनाशकांचा फवारा केला जात होता.

सध्याच्या काळात कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यावर स्वच्छ हात धुणे अनिवार्य आहेच पण अश्या वस्तू ज्या आपल्या सोबत बाहेर जाऊन आलेल्या आहेत त्यांना हाताळताना त्यांची स्वच्छता करणं तेवढंच महत्त्वाचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?