आईनस्टाईनच्या डायरीतलं अज्ञात पान: भारतीयांबद्दल केलेलं ‘अवैज्ञानिक’ वक्तव्य समोर आलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अल्बर्ट आइन्स्टाइन हे जगातील बुद्धीमान लोकांपैकी एक समजले जातात. त्यांचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रीय कार्य हे वैज्ञानिक प्रगतीतील मैलाचा दगड मानले जाते. त्यांच्या कामाने तंत्रज्ञानातील प्रगतीचा मार्ग सुकर झाला. शिवाय केवळ बुद्धिमत्ताच नव्हे तर ते त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या काळात असलेल्या वर्णद्वेषावर त्यांनी भाष्य केलेले आहे. एका वक्तव्यात ते म्हणतात, मी स्वतः ज्यू असल्याने वर्णद्वेषाची शिकार झालेल्या समूहाला कसे वाटू शकते याची मला कल्पना आहे.

 

Albert einstein.inmarathi
echoes.org

१९४६ मध्ये ते लिंकन युनिव्हर्सिटी मधल्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना म्हणाले,

“युनायटेड स्टेट्स मध्ये गोरी लोकं ही काळ्या माणसांपेक्षा वेगळी समजली जातात. कनिष्ठ मानली जातात. हे वेगळं मानलं जाणं हा काळ्या माणसांचा आजार नाही. हा पांढऱ्या माणसांना जडलेला रोग आहे. पण मी याबद्दल शांत बसणार नाही.”

या वर्णद्वेषावर भाष्य करणाऱ्या अनेकांचा आदर्श असलेल्या आइन्स्टाइनने त्यांच्या आशियातील १९२० साली केलेल्या प्रवासाबद्दल वर्णन लिहून ठेवले आहे. त्यांनी ते प्रवासवर्णन जर्मन भाषेमध्ये लिहून ठेवले आहे. त्यांनंतर ते इंग्रजीत भाषांतरित करून पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले. हे अल्बर्ट आइन्स्टाइनची डायरी या नावाने प्रकाशित झाले आहे.

यात असे म्हटले आहे की आइन्स्टाइन यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात भारत, चीन, श्रीलंका आणि जपान या देशातील लोकांबद्दल वर्णद्वेषाचे समर्थन करणारी भूमिका मांडली होती.

इंडिया टुडे ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, आइन्स्टाइन यांच्या मते, भारतीय हे बौध्दिकदृष्ट्या कमी दर्जाचे असल्याचे म्हटले आहे.

या पुस्तकाच्या संपादकाने त्याच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, आइन्स्टाइन यांचे असे मानणे होते की, या देशाचे वातावरण इथल्या माणसांना आधी काय घडले असेल किंवा भविष्यात काय घडू शकेल याचा विचार अधिक काळ करण्यापासून रोखते.

त्यामुळे या देशांमधील माणसे अशा वातावरणात फारतर अर्धा ते पाऊण तास भविष्यात काय घडू शकेल किंवा भूतकाळात काय घडले असावे हा विचार करू शकतात.

 

albert_einstein_inmarathi
ndiatoday.in

यावरून आइन्स्टाइन यांचा भौगोलिक परिस्थिती माणसाच्या बौद्धिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने अशा वातावरणातील देश हे बौध्दिकदृष्ट्या कमी दर्जाचे आहेत यावर विश्वास होता हे कळून येतं. आपण अशा वातावरणात राहिलो तर आपली सुद्धा बौद्धिक वाढ खुंटेल असे त्यांचे मानणे होते.

संपादकाच्या मते, आइन्स्टाइनची ही मतं ही त्याच्या मानवतावादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध आहेत.

संपादक म्हणतात,

“यातील कित्येक कंमेंट्स आपल्याला खटकतात. त्या आइन्स्टाइनच्या मानवतावादी दृष्टिकोन असलेला वैज्ञानिक या इमेजला छेद देतात.”

संपादकांच्या मते, आइन्स्टाइन हे आयुष्याच्या उत्तरार्धात मानवतावादी विचारसरणीकडे वळले असावेत. संपादक रोसेनक्रन्झ म्हणतात की आईन्स्टाईन व्यक्ती म्हणून समजून घेताना आपण त्यांच्या भावनांची आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेली गुंतागुंत समजून घेऊ शकत नाही. हे स्पष्ट करताना ते म्हणतात,

“त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एकमेकांच्या विरुद्ध जाणारे हे कंगोरे स्पष्ट व्हायला हवेत. एका बाजूला आईन्स्टाईन खूप दयाशील वाटतात तर दुसऱ्या बाजूने त्यांनी केलेली ही विधानं त्यांच्या स्वभावाशी फारकत घेताना दिसतात.”

 

albert-inmarathi
deccanchronicle.com

“आदर्श व्यक्तिमत्त्व कधीच काही चुकीचं वागू शकत नाहीत असा आपला समज असतो. मात्र कालांतराने त्यांची काळी बाजू आपल्यासमोर येऊ शकते. कालांतराने समोर येणाऱ्या या गोष्टी जर सत्य असतील तर त्यांची सत्यता लक्षात घेऊन आपण त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा नव्याने अर्थ लावायला हवा.”

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?