' इजिप्त मध्ये हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा राजवाडा आहे भयावह कारणांसाठी प्रसिद्ध – InMarathi

इजिप्त मध्ये हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा राजवाडा आहे भयावह कारणांसाठी प्रसिद्ध

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगात अशी भरपूर आश्चर्य आहेत, कित्येक न उलगाडलेली रहस्यं आहेत, कित्येक अशा जागा आहेत जिथे आजही एक वेगळाच प्रकार लोकं अनुभवतात!

ह्या जगात अशी बरीच रहस्यं आहेत, काही उलगडली गेली आहेत तर काही रहस्य ही कधीही न उलगडणारी आहेत! अशाच एका गूढ रहस्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत!

कैरो. इजिप्त देशाची राजधानी.

इजिप्त ला आपण प्रामुख्याने आपल्या शिक्षणापासून ओळखतो ते म्हणजे तिथल्या पिरॅमिड मुळे. जणू आपल्या डोक्यात एकच समीकरणच झालंय. इजिप्त म्हणजे पिरॅमिड.

 

egypt inmarathi
mymodernmet.com

 

त्या देशात इतरही कोणती गोष्ट ही पाहण्यासारखी आणि आश्चर्य व्यक्त करण्यासारखी आहे हे आपल्यापैकी फार कमी लोकांना माहीत असेल.

ती सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित असलेली एक वास्तू आहे. विश्वास बसत नाही ना. मग हे वाचाच :

कैरो या शहरामधील एक भाग हेलिपोलिस आपण जसाच क्रॉस करतो आणि कैरो च्या एअरपोर्ट च्या रोड ला लागतो तसंच आपल्याला एक भव्य इमारत दिसायला लागते.

ही वास्तू आपल्याला दुरुन एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते. या भव्य इमारतीचं नाव ‘ले पलाईस हिंदू’ असं आहे; पण ती प्रचलित आहे ‘Qasr-i-Baron’ किंवा ‘Baron’s Palace’ या नावाने.

 

cairos palace inmarathi
mysterioustrip.com

 

त्याच्या बांधकाम किंवा आतील कोरीव कामापेक्षा ही इमारत प्रसिद्ध आहे ती त्यामध्ये सतत घडणाऱ्या गूढ घटनांमुळे.

१९५० पासून या इमारती मध्ये प्रवेश करण्यास सरकारने बंदी आणली आहे.

 

या वास्तूची एक कथा आहे :

कैरो मधील हा राजवाडा बेलजीयम च्या बरोन नावाच्या एका उद्योगपतीच्या मालकीचा होता. हा राजवाडा त्याकाळी इजिप्त च्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी होता.

बरोन हे अतिशय महत्वकांक्षी आणि ध्येयवादी होते. ते इजिप्त ला त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी आले होते. हा राजवाडा म्हणजे त्या मालकाच्या एक साम्राज्य उभं करण्याच्या महत्वकांक्षेचं एक प्रतिक आहे.

 

baron inmarathi
livehistoryindia.com

 

१९०७ ते १९११ या काळात बांधकाम केलेला हा राजवाडा म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक नमुना आहे.

दोन मजले असलेला ह्या राजवाड्यात भव्य दालनं आहेत, वाचनालय आहे आणि त्याचा जिना सुद्धा एका विशिष्ठ पद्धतीने बांधण्यात आला आहे.

ह्या राजवाड्याच्या बाहेर कृष्ण, हनुमान, विष्णु भगवान आणि गरुड यांची प्रतिकृती आहे. या राजवाड्यातील भिंती या हिंदु पुराण कथेतील दृश्यांनी रंगवलेल्या आहेत.

त्या राजवाड्याच्या दरवाजे, कड्या ह्या सोन्याच्या आहेत.

राजवाड्याचा सर्वात मनोहारी भाग कोणता असेल तर तो म्हणजे मुख्य भाग जो की एका मंदिरासारखा बांधण्यात आला आहे. जिथे की बरोन यांच्या खोल्या आहेत.

या खोल्या अश्या पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत की त्या प्रत्येक खोलीमध्ये सूर्यप्रकाश हा पोहोचेलच.

 

cairo palace inmarathi
egypetianstreets.com

 

गूढ :

बरोन च्या तीन पिढ्या या राजवाड्यात राहिल्या आहेत. बरोन यांची बहीण हेलना ही त्या राजवाड्याच्या गॅलरी मधून पडून तिचा मृत्यू झाला होता.

बरोन ह्यांची मुलगी मिरीयम जी की मानसिक आजाराने ग्रासली होती; तिचा मृतदेह राजवाड्याच्या पायऱ्यांवर सापडला होता. बरोन चा मृत्यू सुद्धा या राजवाड्यातच १९२९ मध्ये झाला.

परिवारात घडलेल्या इतक्या घटनांनी सुद्धा खचून न जाता बरोन यांच्या नातवंडांनी तिथेच रहाणंच पसंत केलं.

१९५२ मध्ये इजिप्त मध्ये मोठे राजकीय बदल घडले. राजा फोरुक यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं.

गमाल अब्दुल नासीर हे नवीन राजा झाले आणि त्यांनी इतर देशातून आलेल्या उद्योजक मंडळींना बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला.

 

gamaal abdul naseer inmarathi
jrbenjamin.com

 

बरोन यांचा परिवार तेव्हा पॅरिस मध्ये होता. त्यांनी हा राजवाडा १९५७ मध्ये सौदी च्या काही गुंतवणूकदारांना विकला.

सौदी च्या या नवीन मालकांनी ह्या राजवड्याला कुलूप लावून बंदच ठेवला आणि त्यांनी राजवाड्यातील सर्व मौल्यवान वस्तू सोबत नेल्या.

भुताटकी :

कायम बंद राहिलेला हा राजवाडा हा चोर, दरोडेखोरांचा नवीन अड्डा हळूहळू बनू लागला.

काही दरोडेखोरांनी अशी माहिती दिली की ते जेव्हा या राजवाड्यात गेले होते तेव्हा त्यांना तिथल्या जमिनीवर आणि तिथल्या आरश्यावर रक्ताचे डाग दिसले.

 

egypt cairo palace inmarathi
scoopempire.com

निकाल:

ही वास्तू एका भव्य हॉटेल आणि कसिनो मध्ये रूपांतरित केली जावी अशी एक मागणी १९९० मध्ये जोर धरत होती.

२००५  मध्ये इजिप्त मधील भारतीय embassy ने ही जागा पूर्णपणे एक भारतीय संस्कृती स्थळ म्हणून त्याचं रूप बदलण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली होती.

पण, इजिप्त सरकारने ती मागणी मान्य केली नाही. २०१७ मध्ये अखेर या भव्य वास्तूचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

आणि आता ही वास्तू एका नव्या देखण्या स्वरूपात लोकांसमोर येईल अशी आशा आहे.

तो पर्यंत या जागेला तिथे घडलेल्या अनाकलनीय घटनांमुळे ‘भुल भुलैय्या’ सिनेमा मधील राजवड्यासारखं समजल्यास कोणाचीही काही हरकत नसावी.

 

baron palace inmarathi
livehistoryindia.com

 

तर अशी आहे ह्या इजिप्त मधल्या ह्या राजवड्याची कहाणी, हे वाचून आपल्याला एक गोष्ट समजली की हिंदू संस्कृतिचा प्रसार कुठवर झाला आहे!

हिंदू मंदिरं आणि शिल्पकलेचा संपूर्ण जगावर किती खोलवर परिणाम झाला आहे ते यावरून समजून येतं!

या राजवड्यातल्या गूढकथा आपण बाजूला ठेवल्या तरी ही वास्तू जेंव्हा आता नव्याने उभी राहील तेंव्हा मात्र इजिप्त मध्ये पर्यटकांसाठी आणखीन एक आकर्षण असेल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?