चॉकलेट खा आणि निरोगी राहा!

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


 

चॉकलेट म्हणजे आपला जीव की प्राण! चॉकलेट नं आवडणारा माणूस सध्याच्या युगात सापडणे तरी कठीण! एखादा माणूस कितीही रुक्ष असला तरी चॉकलेट पाहून त्याच्या चेहऱ्यावर थोडेसे का होईना पण हसू उमटते. काही जण तर चॉकलेट साठी इतके वेडे असतात त्यांना तुम्ही चॉकलेटचं घर बांधून दिलं तर ते देखील एका दिवसात फस्त करू शकतात ! पण काही जण असाही सल्ला देतात की चॉकलेट जास्त खाऊ नका ते आरोग्यासाठी हानिकारक असतं. असा सल्ला जर तुम्हाला परत कोणी दिला की त्याच्या नाकावर टिच्चून चॉकलेट खाऊन दाखवा कारण शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की चॉकलेट हे शरीरास अपायकारक नसून उलट ते खाल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. चला पाहूया कसं ते..!

chocolate-marathipizza02

स्रोत

मानवी सेवनासाठी चॉकलेट योग्य आहे, हे तपासण्यासाठी काही चाचण्या केल्या जातात. चॉकलेट भाजताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यातील काही विषाणू (विशेषत: साल्मोनेला जातीचे) नष्ट व्हावेत म्हणून ही क्रिया करावी लागते. अर्थात वेगवेगळय़ा कंपन्या आपल्या स्वत:च्या पद्धतीने उपकरणे वापरून आपल्या उत्पादनाचं ग्राहकोपयोगी विश्लेषण करतात.

कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील बॅट्रिस गोलोंब या संशोधिकेचा दावा आहे की, नियमितपणे चॉकलेट खाणारी मंडळी अंगाने बारीक असतात. सॅन दिएगोमधल्या जवळपास १००० स्त्री-पुरुषांचा सर्व्हे करून, त्या या निष्कर्षापर्यंत पोचल्या आहेत. या पाहणीत, व्यक्तीचं वजन व उंची यांचं मोजमाप घेऊन, त्यांचा ‘बॉडी-मास इंडेक्स’ मोजला गेला. तेव्हा आठवडय़ातून जास्त दिवस चॉकलेट सेवन करणारी लोकं अंगकाठीने तुलनात्मकरित्या सडपातळ दिसून आली. बॅट्रिस गोलोंब यांच्या मते, केवळ कॅलरीजची संख्या नव्हे तर त्यांचे घटकरूप माणसाच्या वजनाशी निगडित असावेत.

chocolate-marathipizza


स्रोत

जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार इ. स. २०३० सालापर्यंत जगातील २४ कोटी लोकं केवळ हृदयरोगाने दगावतील. त्यासाठी माणसाची ‘लाइफस्टाइल’ आणि ‘डाएट’ या दोन प्रमुख गोष्टींत बदल होण्याची नितांत गरज आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ डॉ. ऑस्कर फ्रँको आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हृदयरोग जडलेले रुग्ण व हृदयरोगाची बाधा नसलेली सामान्य माणसं, अशा एक लाख लोकांची पाहणी केली, तेव्हा त्यांना आढळलं की, जास्त प्रमाणात चॉकलेट सेवन करणाऱ्या लोकांतील कार्डिओव्हॅस्कूलर हृदयविकाराचं ३७ टक्के तर स्ट्रोकमध्ये (हृदयविकाराच्या झटक्यात) २९ टक्के इतकं प्रमाण कमी झाल्याचं आढळलं.

chocolate-marathipizza03

स्रोत


काळया चॉकलेटचा हृदयरोग कमी करण्यास हातभार लागतो याबद्दल मेलबर्नच्या संशोधकांनी, गणितीय आकडेमोडीच्या माध्यमातून ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’ मधून प्रकाश टाकला आहे. काळय़ा चॉकलेटने रक्तदाब कमी होतो, रक्तातील साखर कमी पातळीत राहते, असं डॉ. ज्युली डॅम्प या हृदयरोगतज्ज्ञ संशोधिकेचं मत आहे.

chocolate-marathipizza01

स्रोत

चॉकलेटमधील फेनिलईथेलीन अमाईन हे रसायन तर तरुण-तरुणीतील प्रेमज्वर (Love Feeling) वाढण्यास कारणीभूत ठरतं, हे तुम्हाला देखील माहित असेल. मिशिगेन युनिव्हर्सिटीतील संशोधकांच्या गटाने या आकर्षणावर नवा प्रकाश टाकला आहे. हे आकर्षण मेंदूच्या एका विशिष्ट भागाशी निगडित आहे व त्यातून निर्माण होणा-या ओपियनमसदृश रसायनाचा तो प्रताप आहे. मेंदूत निओस्ट्रायटम नावाचा एक भाग असतो. त्या भागाचा इन्केफेलिन नावाच्या रसायनांशी संबंध आला की चॉकलेट खाण्याची भूक वाढते, असं या संशोधकांना आढळून आलं आहे. हा प्रकार जाड्या लोकांबाबत किंवा ड्रग्ज घेणाऱ्या लोकांबाबत सुद्धा घडताना दिसून येतो. त्यामुळे या शोधाचा वापर करून लठ्ठपणावर तसंच ड्रग्ज घेण्यावर आळा घालता येईल, असं संशोधकांना वाटत आहे.

तर मग आता बिनधास्त Chocolate खा आणि healthy राहा…!


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?