इंटरनेट वर पैसे कमावण्याचे ७ “विश्वासार्ह” मार्ग

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजच्या जगात इंटरनेट सगळ्यांसाठीच एक अतिशय महत्वाची गोष्ट झाली आहे. आता इंटरनेट हे केवळ एक करमणुकीचे साधन राहिलेले नसून त्याद्वारे लाखो लोक आज पैसा कमवत आहेत. कित्येक बिसनेस या इंटरनेटच्या भरवश्यावर चालत आहेत. इंटरनेट हा पैसे कमवण्याचा खूप चांगला मार्ग आहे. अनेक लोक शिक्षण घेऊन पण बेरोजगार आहेत. अशा लोकांसाठी तर ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.

इंटरनेट आता एक ग्लोबल प्लॅटफॉर्म झालंय ज्याच्या माध्यमातून तुम्ही लाखो-करोडो लोकांन्पर्यंत सहज पोहोचू शकता. यामुळे तुमच नेटवर्क मजबूत होतं आणि त्यामुळे तुमच्या बिझनेसला चालना मिळते. ऑनलाईन पैसा कमविण्याच्या सानेक पद्धती आहेत, त्यापैकी काही पद्धती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही देखील पैसे कमवू शकता.

१. ई-बुक लिहिणे :

 

ebook-writing-inmarathi
newmediawords.biz


ऑनलाईन पैसे कमविण्यात ई-बुक तुमची मदत करू शकते. आज जगातील कित्येक लेखक याच माध्यमातून पैसे कमवत आहेत. जर तुम्हाला लिहिण्याच छंद असेल आणि तुम्हाला हे वटत असेल की ते इतरांना आवडेल तर तुम्हाला ई-बुक नक्की लिहायला हवी.

तुम्ही तुमची ई-बुक अॅमाझॉन किंडल आणि अॅपल आय-ट्युन्स कनेक्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता. ई-बुक लिहिण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, त्यसाठी तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागत नाही, जो की एका पुस्तकावर होत असतो. तुम्हाला बस तुमची लिहिण्याच्या शैलीवर फोकस करायचा असतो आणि त्यानंतर तुमच्या बुकच्या मार्केटिंगवर. जर हे तुम्हाला जमल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि खूप पैसा कामवाल. सध्यातर लोकं जास्तकरून ई-बुक वाचण्यालाच प्राथमिकता देतात त्यामुळे तुम्हाला काही खूप जास्त मेहनत घ्यायची गरज नाही.

२. ब्लॉगिंग :

 

blogging-business-inmarathi
financialsamurai.com

हा इंटरनेटद्वारे पैसे कमविण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. आजच्या युगात दर दुसरी वव्यक्ती ही स्वतःला ब्लॉगर मानते, कारण त्यांचा इंटरनेटवर ब्लॉग असतो. पण नुसताच ब्लॉग असल्याने काही होत नसत, जर तुम्हाला हे कळाल असेल की त्या ब्लॉगच्या भरवश्यावर तुम्ही जगू शकता आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तरच तुम्ही एक ब्लॉगर आहात. केवळ स्वतःचा एक ब्लॉग असणे याने काहीही साध्य होत नाही, पण जर तुम्ही तुमच्या वाचकांना तुमच्या ब्लॉग्सच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन पटवून दे असाल तरच तुम्ही अॅक्च्युअल ब्लॉगर आहात.

जर तुम्ही तुमच्या ब्लॉग्स मुळे तुमच्या वाचकांना स्वतःच्या ब्लॉगवर येण्याकरिता आकर्षित करू शकत असाल, जर तुम्ही त्यांच्या फायद्याच काही त्यांच्या समोर मांडू शकत असाल तर नक्कीच तुमच्या ब्लॉगद्वारे तुमच एक मोठं नेटवर्क तयार होऊ शकत. यामुळे जाहिरातदरही तुमच्या ब्लॉगवर त्यांच्या जाहिराती देण्यासाठी आकर्षित होतील आणि तुम्ही पैसे कमावू शकाल.

ब्लॉग बनविण्याआधी हे सुनिश्चित करा की तुम्ही तुमच्या ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांना तुमच्या ब्लॉग वर रोज खिळवून ठेवू शकाल. कारण हे इंटरनेटच युग आहे इथे दर सेकंदाला वाचक बदलतात.

३. ई-मेल मार्केटिंग :

 

Email_marketing-inmarathi
yoast.com

ई-मेल मार्केटिंग हा तर इंटरनेटवरील व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे. ज्या लोकांना ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे, त्यांना ईमेलद्वारे मजबूत नेटवर्किंग उभारण्याचं ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. जर त्यांचे सबस्क्रायबर त्यांच्या व्यवसायात रस घेत असतील आणि ते सक्रियपणे सहभाग घेत असतील, तर त्यांना यशस्वी होण्यासून कोणीही थांबवू शकत नाही.

हो पण हे सुनिश्चित करून घ्याला की तुमचे सबस्क्रायबर डायरेक्टली तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर साईन इन करतील, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल.

४. ऑनलाईन ट्युटोरिअल :

 

online tutorials-inmarathi
niu.edu

ऑनलाईन ट्युटोरिअल हे घर बसल्या कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही एखाद्या विषयात चांगले असाल किंवा तुम्ही काही असं करू शकत असाल जे इतरांना शिकायला आवडेल तर तुम्ही देखील ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करू शकता. यामध्ये शालेय अभ्यासक्रम, ब्युटी ट्युटोरिअल, डान्सिंग, फिटनेस आणि बरच काही तुम्ही शिकवू शकता.

५. यूट्युबर :

 

youtubers-inmarathi

सध्याच्या पिढीला युट्युबचं जाम वेड लागलंय! प्रत्येकजण युट्युब चा चाहता झालाय…कधी गाणी, कधी फनी विडीओ आणि बरंच काही. त्यासोबतच तुम्ही तुमच्या बॉडीला परफेक्ट कसं बनवू शकता याच्या टिप्स, फिटनेस ट्युटोरिअल, जिम ट्युटोरिअल ज्यामध्ये ते स्वतःची आकर्षक बॉडी दाखवून तुम्ही देखील अशी बॉडी/पर्सनॅलिटी मिळवू शकता हे सांगतात आणि आपण मोठ्या इंटरेस्टने ते बघतो.

तुम्ही एक यूट्युबर बनून खूप पैसे कमवू शकता. बस त्यासाठी तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग असण्याची गरज आहे. जर तुम्ही लोकांना काहीतरी इंटरेस्टींग, एन्टरटेनिंग आणि कधी कधी काहीही विचित्र देऊ शकत असाल तर लोकं तुम्हाला वेड्यासारखे फॉलो करतील. (याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘ढिंच्याक पूजा’ 😉 )

६. अॅफिलीएट मार्केटिंग :

 

affiliate-marketing-inmarathi

 

अॅफिलीएट मार्केटिंग ही वेबसाईट बिझनेससाठी देवाहून कमी नाही. एक अॅफिलीएट असणे हा सर्वात लोकप्रिय आणि सोप्या पद्धतीने इंटरनेटवर पैसे कमविण्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला कुठेही भटकायची, काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या क्लायंटला आणि त्याच्या कामाला सोशली प्रमोट करायचं असतं. ह्या प्रमोशमध्ये वाचकाने किंवा तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्याने खरेदी केली किंवा  असलेली कुठलीही कृती केली (कधी सब्स्क्रिप्शन, तर कधी अकाउंट क्रिएशन…काहीही असू शकतं) तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.

ऑनलाईन पैसे कमविण्याचा हा एक सोपा, इंटरेस्टिंग आणि सर्वात उत्तम समजला जाणारा मार्ग आहे.

७. फ्रीलान्सर म्हणून काम करणे :

 

Make-money-freelancing-inmarathi
livesmartly.net

इंटरनेटवरून पैसे कमविण्याचा हा आणखी एक मार्ग आहे. हे खूप सोप असत, म्हणजे जर तुम्ही एखाद्या ब्युटी प्रोडक्टचा रिव्यू चांगल्याप्रकारे देत असाल तर कुठलीही ब्युटी कंपनी तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट्सचे रिव्यू देण्यासाठी विचारू शकते आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे किंवा फ्री प्रोडक्ट्स मिळू शकतात. असच इतर गोष्टींच्या बाबतीतही असत, जर तुम्ही एक चांगले फोटोग्राफर असाल तर तुमच्या फोटोसाठी देखील तुम्हाला पैसे दिले जाऊ शकतात, जर तुम्ही चांगले लेखक असाल तर तुम्हाला फ्रिलान्सर ब्लॉगर किंवा लेखक म्हणून काम करू शकता.

मग इंटरनेटवर उगाचच टाईमपास करण्यापेक्षा जर त्यातून तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर काय हरकत आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *