स्पर्म काऊंट वाढवण्याच्या १० टिप्स – खुद्द बाबा रामदेवांनी सांगितलेल्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

रस्त्याने  जात असताना आपल्याला अनेक ठिकाणी एक छोटीशी झोपडी दिसते ज्याच्याबाहेर एक वृद्ध व्यक्ती काही जडी-बुटी घेऊन बसलेला असतो. आणि त्यासोबतच एक बोर्ड देखील असतो…

“गुप्तरोग दूर करणार हकिमी बाबा चा नुस्का”, “ह्याचे रोज सेवन करा आणि नावाबांसारखी ताकद मिळवा”, “घोड्यासारखी ताकद मिळवा”.

इत्यादी… इत्यादी…

 

how to increase sperm count-inmarathi
naisadak.org

हे बोर्ड फक्त त्या जडी-बुटी वाल्याच्या झोपडीबाहेर नाही तर बसस्टॉप, रेल्वे स्टेशन इत्यादी सार्वजनिक ठिकाणच्या भिंतींवर देखील रंगवलेले दिसतात.

ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की, आजकालच्या पुरुषांना स्पर्म काउंट आणि अशक्तपणा ह्या समस्यांचा सामना कराव लागतो आहे.

आणि ह्यावर कोणीही मोकळेपणाने बोलायला तयर नाही, किंवा त्यांना आपल्या समस्या सर्वांसमोर मांडता येत नाहीत. म्हणून अनेक पुरुष ह्या अश्या बुवाबाजीला बळी पडतात.

शुक्राणूंची संख्या कमी होणे हे आधुनिक जीवनशैलीचे फलित आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. हल्लीच्या जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमता प्रभावित झाली असून त्यामुळे स्पर्मच्या गुणवत्तेवरही विपरित परिणाम होत आहेत.

 

MALE-INFERTILITY-inmarathi
mylittlesoldiers.net

ब्रिटन येथे झालेल्या अध्ययनात यासंबंधी अतिशय धक्कादायक आकडे समोर आले आहे. ५० वर्षापूर्वी पुरुषांच्या एक मिलीलीटर सीमनमध्ये शुक्राणूंची संख्या ११ कोटी तीस लाख होती जी आता कमी होऊन केवळ चार कोटी ७० लाख झाली आहे.

ताण, लठ्ठपणा, अस्त-व्यस्त जीवनशैली आणि प्रदूषण हे पुरुषांसाठी धोकादायक ठरत आहे.

 

MALE-INFERTILITY-inmarathi03
youtube

ह्याविषयावर विचार करायला लावणारा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. “शुभमंगल सावधान”… ज्यात पुरुषांच्या ह्या समस्येला अगदी मोकळेपणाने मांडण्यात आले आहे.


आपण ज्यावर कधीही मोकळेपणाने चर्चा करत नाही किंवा चर्चा करण्यास टाळाटाळ करतो. तिथे ह्या चित्रपटात ह्या समस्येवर चर्चा करणे किती महत्वाचे आहे आणि त्यात काहीही अश्लीलता नाही हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जे खरं आहे.

 

MALE-INFERTILITY-inmarathi02
ndtv.com

लैंगिक समस्या ह्या सामान्य असतात. आपण उगाचच त्याचा बाऊ करून ठेवतो. पण खरे तर ह्या समस्यांवर बोलायला हवं. चर्चा करून त्यावर उपाय काढायला हवेत तेव्हाच ह्या समस्या सुटू शकतील. नाहीतर भोळेभाबडे लोकं त्या हकिमी बाबांच्या फसवेगिरीला बळी पडत राहतील.

ह्या समस्येवर मात करण्याचे रामदेव बाबांचे काही नैसर्गिक उपाय देखील आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे स्पर्म काउंट वाढवू शकता.


 

increase sperm count ramdev baba inmarathi
newstracklive.com

 

१. अश्वगंधा शतावरी, मुसली आणि कुहिली यांचे बियाणे १००-११० ग्राम घेऊन त्याची पावडर बनवा. रोज सकाळ-सायंकाळ १-१ चमचा याचे दुधासोबत सेवन करा.

 

MALE-INFERTILITY-inmarathi04
cdn.shopify.com

 

२. रोज सकाळ-सायंकाळ गरम दुधाबरोबर २-४ खजूरांचे सेवन करा. हे तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर करून तुम्हाला ताकद देईल. याने तुमचे स्पर्म काउंट वाढण्यास नक्की मदत होईल.


 

dates-inmarathi
naturalsociety.com

 

३. सकाळ-सायंकाळ थोडसं गुळ खाल्ल्यानंतर एक ग्लास दुध घेतल्याने देखील शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

 

jaggeryandmilk-inmarathi
aajtak.intoday.in

 

४. चंद्रप्रभावटी ह्याने स्पर्म काउंट तर वाढतातच त्यासोबतच त्यांची गुणवत्ता देखील वाढते. पण ह्याचं सेवेन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.


 

MALE-INFERTILITY-inmarathi05
chakrapaniayurveda.com

 

५. यौनामृत वटी ही देखील तुमचे स्पर्म काउंट वाढविण्यासाठी अतिशय उपयोगी ठरते. सकाळ-सायंकाळ १ किंवा २ गोळ्या दुधासोबत घेतल्याने तुमच्यात एक वेगळीच ताकद येईल.

तसेच याने तुमचे स्पर्म काउंट देखील वाढतील.

 

MALE-INFERTILITY-inmarathi07
indiamart.com

 

६. शिलाजितची १-१ गोळी सकाळ सायंकाळ घेतल्याने अशक्तपणा कमी होती. आणि शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते.


 

MALE-INFERTILITY-inmarathi06
healthline.com

 

७. व्यायाम करणे हा देखील चांगल्या सेक्स लाईफ करिता आवश्यक आहे.

नियमितपणे कपालभाति प्राणायाम केल्याने शरीरातील खालच्या अंगांना रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि त्यामुळे तुमचे स्पर्म काउंट वाढतात.

 

Baba-Ramdev-inmarathi
stylesatlife.com

 

८. अनुलोम विलोम प्राणायाम नियमित केल्याने शरीतातील रक्त संचार सुधारतो आणि ह्याने तुमचे स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते.


 

Baba-Ramdev-inmarathi01
teatimehealth.com

 

९. रोज शीर्षासन केल्याने देखील शरीरातील रक्त संचार सुधारतो.

त्यासोबतच तुमच्या शरीरातील अशक्तपणा कमी होऊन तुमचे स्पर्म काउंट संबंधी समस्या जवळजवळ दूर होते.

 

Baba-Ramdev-inmarathi02
abplive.in

 

१०. सर्वांगासन केल्याने देखील शरीरातील अशक्तपणा दूर होऊन स्पर्म काउंट वाढण्यात मदत होते.

 

Baba-Ramdev-inmarathi03
youtube

 

रोजच्या जगण्यात काही छोटे बदल केले तरी त्याचा परिणाम तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल. स्पर्म काउंट वाढवण्यासाठी रस्त्यावर बसलेल्या बाबा बुवांच्या कडेजाण्याची गरज उरणार नाही.

===


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?