“नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलीसाने राष्ट्रवादी आमदाराला सुनावले! पहा व्हिडीओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे राजकारणी लोकांशी असलेले संबंध, त्यांच्यात होणारे वाद यावर खमंग चर्चा रंगल्याचे आपण पाहतो. राजकारणी आपली राजकीय ताकद वापरून अनेकदा पोलीस अधिकार्यांचा हवा तसा वापर करून घेतात हेही काही काही नवीन नाही.

कोल्हापुरात महानगर पालिकेत महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

या निवडीसाठी शहरातील सर्व नगरसेवक मतदान करायला महापालिकेत येत आहेत. या नगरसेवकांचे ओळखपत्र तपासून त्यांना गेटवरून आत मतदानासाठी सोडले जाते. पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव हे या कामासाठी महानगरपालिकेच्या गेटवर उभे होते.

 

kolhapur-inmarathi

सर्व कामकाज सुरळीत चालू असताना राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. ओळखपत्र तपासणीच्या कामात त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यावर उपअधीक्षक सुरज गुरव आणि हसन मुश्रीफ यांच्यात वाद झाला.

या वादात मुश्रीफ यांनी गुरव यांना थेट “गडचिरोलीची हवा दाखवेन” अशी धमकी दिली. या धमकीला न घाबरता सुरज गुरव यांनी

“गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही.आम्ही नोकरी करतोय राजकारण करत नाही. सायेब, आम्ही नोकऱ्या करतोय, राजकारण करत नाही, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा” असे निर्भीड उत्तर दिले.

मुळचे इस्लामपूरचे असलेल्या सुरज गुरव यांनी २०१३ साली माराष्ट्र पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली.

 

suraj-gurav-inmarathi

 

नाशिकच्या पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जळगाव येथे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून काम पाहिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात उपअधीक्षक म्हणून समर्थपणे काम पाहिल्यानंतर सध्या ते करवीर तालुका पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहत आहेत.


हसन मुश्रीफ यांना त्यांनी  दिलेल्या या निर्भीड उत्तरानंतर हा विडीओ व्हायरल झाला आहे.

 

 


त्यानंतर सुरज गुरव यांच्या हिमतीची जिकडे तिकडे चर्चा होत आहे.

कोल्हापूरची महापौर निवडीची निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हाच ही निवडणूक गाजणार याबाबत शंका नव्हती.

 

kolhapur-inmarathi

कोणताही अनुचित प्रकार महापालिकेच्या आवारात घडू नये म्हणून पोलीस दलाने जय्यत तयारी करून आवारात बंदोबस्त लावला होता. त्याचाच एक भाग म्हणून सुरज गुरव हे मतदानासाठी येणाऱ्या नगरसेवकांचे ओळखपत्र तपासण्याचे काम करत होते.

आमदार हसन मुश्रीफ यांना आत सोडण्यास गुरव यांनी नकार दिल्यानंतर मुश्रीफ यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला.

नेत्यांचा मुजोरीसमोर सहसा पोलीस अधिकाऱ्यांचे काही चालत नाही, पण सुरज गुरव या मुजोरीसमोर बधणार नाहीत याचा अंदाज हसन मुश्रीफ यांना नसावा.

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे “गडचिरोलीची हवा खायला लागेल” ही प्रसिध्द धमकी त्यानीन गुरव याना दिली. आणि सुरज गुरव यांनी प्रश्न वर्दीचा आहे म्हटल्यानंतर परिणामांची परवा न करता मुश्रीफ यांना खडे बोल सुनावले.

 

mushrif-inmarathi

 

प्रशासन, कायद व सुव्यवस्था आणि लोकप्रतिनिधी या तिन्ही व्यवस्था कामकाज सुरळीत चालावे यासाठी बनवल्या गेल्या आहेत. त्यात प्रत्येक स्वतःची जबाबदारी ओळखून आणि एकमेकांच्या जबाबदारीचा आदर करत काम करायचे असते.

पण गब्बर राजकारणी हे तत्व पाळतात असे सहसा दिसत नाही. हसन मुश्रीफ यांनीही यावेळी हेच केले.

पण या धमकीला न जुमानता सुरज गुरव यांनी आपल्या वर्दीची प्रतिष्ठा जपत थेट आणि निर्भीडपणे दिलेले उत्तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वच अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा असे आहे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




24 thoughts on ““नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलीसाने राष्ट्रवादी आमदाराला सुनावले! पहा व्हिडीओ..

  • December 10, 2018 at 3:51 pm
    Permalink

    गुरव यांचे मनापासून अभिनंदन

    Reply
  • December 10, 2018 at 6:02 pm
    Permalink

    हो

    Reply
  • December 10, 2018 at 7:34 pm
    Permalink

    खूप छान सूरज गुरव तुमच्या निर्भीडतेला सलाम…. अभिनंदन

    Reply
  • December 10, 2018 at 8:10 pm
    Permalink

    सुरज

    Reply
  • December 10, 2018 at 8:16 pm
    Permalink

    salute to Gaurav

    Reply
  • December 10, 2018 at 8:17 pm
    Permalink

    मुश्रीफ साहेब अशी दादागिरी बरी नाही नाहीतर जनता सर्व बघतेच आहे

    Reply
  • December 10, 2018 at 8:23 pm
    Permalink

    fantastic suraj gaurav sir

    Reply
  • December 10, 2018 at 8:31 pm
    Permalink

    उर्मट राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल dysp साहेबांचे अभिनंदन

    Reply
  • December 10, 2018 at 8:48 pm
    Permalink

    मस्तच

    Reply
  • December 10, 2018 at 9:40 pm
    Permalink

    महाराष्ट्र पोलीस जय महाराष्ट्र

    Reply
  • December 10, 2018 at 10:30 pm
    Permalink

    नालायक आहेत असले लोकप्रतिनिधी… अभिनंदन गुरव साहेब

    Reply
  • December 11, 2018 at 6:02 am
    Permalink

    हसन मुश्रीफ यांना कोणीतरी जाऊन समजवा

    पोलीस वालो से ना दोस्ती अच्छी और नाही दुश्मनी

    आमदारकी चा माज मोडायला गुरव साहेबां सारख्या पोलीस अधिकाऱ्याला 1 मिनिट सुध्दा लागायचा नाही

    गुरव सर our society need some more police officers like u. But also we dont need any political leader like hasan mushreef who is willing to misuse his power…

    Hasan mushreef sheput ghalun palalas ka? Dum hota tar tevach nadayche na
    Tumchi (rajkarnya chi) jatch kutrya chi aste

    Reply
  • December 11, 2018 at 8:47 am
    Permalink

    असे अधिकारी सर्व क्षेञात तयार झाले पाहिजेत नाहीतर राजकारणी मुजोरी करतच राहतील

    Reply
  • December 11, 2018 at 9:42 am
    Permalink

    जय हिंद

    Reply
  • December 11, 2018 at 11:54 am
    Permalink

    गुरव साहेबाना सलाम, सध्या सर्वच क्षेत्रात राजकीय लोकांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ते आपले नोकर समजत आहेत. गुरव साहेबांनी जे धाडस दाखविले, तेच धाडस इतर सर्वानीच दाखवून राजकीय नेत्यांची हुजरेगिरी थांबविली पाहिजे. अन्यथा यातीलच काही अधिकारी राजकीय नेत्यांशी जवळीक करून त्यांना पुन्हा त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही,,,

    Reply
  • December 11, 2018 at 1:26 pm
    Permalink

    जबरदस्त

    Reply
  • December 12, 2018 at 11:28 am
    Permalink

    एकदम भारी त्या हसन ला चांगला ठेचा साल्याला

    Reply
  • December 12, 2018 at 12:43 pm
    Permalink

    सूरज

    Reply
  • December 12, 2018 at 5:46 pm
    Permalink

    जबरदस्त व्यक्तिमत्व

    Reply
  • December 13, 2018 at 11:46 am
    Permalink

    very nice

    Reply
  • December 13, 2018 at 12:50 pm
    Permalink

    _सूरज गुरव साहेब यांच्या या कार्याला सलामअसाच एक आदर्श ठेऊन सर्व पोलिस कर्मचारी ,आधिकरी आपले कर्तव्य बजावले पाहिजेजय हिंद खूपच छान

    Reply
  • December 15, 2018 at 5:11 pm
    Permalink

    हेच

    Reply
  • December 15, 2018 at 7:01 pm
    Permalink

    Good Sir..

    Reply
  • January 24, 2019 at 5:34 pm
    Permalink

    श्री

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?